My Followers

Wednesday, 4 July 2012

बौध्द धर्म म्हणजे जातीविरहीत समाजव्यवस्था...!!!

बौध्द धर्म म्हणजे जातीविरहीत समाजव्यवस्था...!!! 


                     

जातीविरहीत समाजाच्या उभारणीसाठी आणि समताधिष्ठीत भारताच्या निर्मितीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली. सोबत सात लाख अस्पृश्यांतील महारांना बौध्द धम्माची दीक्षा दिली. संपूर्ण भारत बुध्दमय करण्याची प्रतिज्ञा पूर्वक घोषणा केली. बुध्दमय भारत म्हणजे काय? बुध्दाच्या आचार-विचारांचा भारत होय. ध्येय गाठण्याआधीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर काळाच्या पडद्याआड झाले. डॉ. आंबेडकरांच्या पश्चात काही धर्मांतरीत बौध्द डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयाशी दुर्लक्षित झाले. बरीच वर्षे धम्म कांतीचा रथ जागीच थांबून राहिला.
          इतिहासाचा आढावा घेतला तर  अस्पृश्यांच्या हजारो पिढ्या हिंदू धर्मांनी बरबाद केल्या. आम्हाला जनावरांची वागणूक दिली. जंबूद्विपातील, बुध्दाच्या प्रदेशातील सत्य कधी आम्हाला कळू दिले नाही. एकेकाळचा बुध्दकालीन भारत म्हणजे न्याय,समता, बंधुत्वाचा भारत होता, प्रज्ञा-शील-करुणेचा भारत होता, सत्य-अहिंसा-शांतीचा भारत होता. जातीविरहीत भारत होता, अर्हतांचा भारत होता. सम्यक संबुध्दाचा भारत होता.  आज हाच भारत जातीयतेचा, विषमतेचा, धर्मांधतेचा,जातीय दंग्याचा अनितीचा भारत असा बोलबाला झाला आहे. असा भारत कोणी केला तर भारतात चातुवर्ण व्यवस्था निर्माण करणाऱया वैदीक (मनुवादी) ब्राम्हणांनी भारतीय समाज व्यवस्थाच दूषित केली.
        अनेक धर्मांची निर्मिती कथाकाव्यातून झाली आहे. पण वैदीक धर्म आणि हिंदू धर्म यात विसंगती दिसून येते. वैदीक धर्म वेद मनुस्मृती यातून तयार झाला. पुढे चातुर्वण्य व्यवस्था उदयास आली. चातुर्वण्य व्यवस्थेत हिंदू धर्म बसत नाही. हिंदू धर्माला संस्थापक नाही. प्रमाण ग्रंथ नाही. रामायण, महाभारत हिंदू धर्माचा आधार मानतात. दोन्हीही ग्रंथ राम,रावण, कौरव-पांडव यांचे युध्द प्रसंग दाखवितात. हिंदू धर्माचा आचार विचार यात नाही. हिंदू धर्माचे प्रमाण जाती व्यवस्था आहे. वर्णव्यवस्थेतही ब्राम्हणाचे स्थान श्रेष्ठच राहिले आहे. तर हिंदू धर्मातही ब्राम्हणाचे स्थान श्रेष्ठच राहिले आहे. हिंदू शब्दाचा अर्थ पारशी भाषेत हिन-शुद्र-गलिच्छ सांगितला आहे. यावरुन भारतातील चातुर्वर्ण्य व्यवस्थेने शुद्र मानलेला समाज आजचा ओबीसी हाच हिंदू होय. यावरुन हिंदू हा धर्म नाही. एक समुह आहे. अनेक जातीचा समूह आहे.जगमान्य अशा धर्मात शुदांनी प्रवेश करु नये म्हणून ब्राम्हणांनी हिंदू हा धर्म बनविला. ब्राम्हण हा हिंदू होऊ शकत नाही.हिंदू (शुद्र) वैदीक होऊ शकत नाही. हिंदू धर्माच्या नावाखाली शुद्रांचे (ओबीसी) शोषण होत आहे. म्हणून म्हणतात कि , शोषकांचा आणि शोषितांचा धर्म एक होऊ शकत नाही. हिंदू धर्मांचे ठेकेदार ब्राम्हण आहेत. म्हणून ते धर्मांतराला व धर्म परिवर्तनाला विरोध करतात. आणि `परधर्म भयावह' असे हिंदू धर्मियांना सांगत असतात. हिंदू धर्माची पकड जातीयता, विषमता, धर्मांधता (अंधश्रध्दा) या तीन तत्वांवर आहे. म्हणून हिंदू धर्माने माणसात जाती मजबूत केल्या आहेत. 
          समताधिष्ठीत भारत निर्माण करण्यासाठी भारतीय संविधानाने हजारो वर्ष हक्क वंचीत राहिलेल्या दुबळ्या समाजाची गटवार रचना करुन भारतीय राज्य घटनेच्या कलम 340 प्रमाणे ओबीसी, 341 प्रमाणे अनु.जाती, 342 प्रमाणे अनु. जमाती अशी नोंद करुन अधिकार त्यांचे समाविष्ट केले आहे. यास्तव अप्पर जाती, ब्राम्हण, बनिया, राजपूत, ठाकूर, मराठा अन्य उच्च जाती खुल्या प्रवर्गात समाविष्ट केल्या आहेत. कारण याचा आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, बौध्दिक , राजकीय सर्वांगिण विकास झाला आहे. मागासलेल्या व अविकसीत जाती, जमाती, ओबीसी यांना तशा सोयी सवलती देऊन वर आणण्यासाठी वरिल कलमान्वये राखीव हक्क ठेवले आहेत. 
          हजारो वर्षापूर्वी भारतात वर्णव्यवस्था होती तेव्हा कर्मावर आधारित जाती होत्या. मंदिराचा पूजारी ब्राम्हण, जोडे चप्पला बनविणारा चांभार, कपडे शिवणारा शिंपी, पुढे व्यवस्था बदलली तेव्हा जन्मावर आधारित जाती तयार झाल्या शिंप्याच्या मुलाने जोडे चप्पला बनविल्या तरी तो चांभार झाला नाही. अठराव्या शतकात व एकोणिसाव्या शतकात पेशवाईने शुद्र अतीशुद्रावर व स्त्रीयावर अन्याय केला. समाजव्यवस्था फारच बिघडली होती. अशातच अनेक समाज उदयास आले. आर्य समाज, ब्राम्हणसमाज, महात्मा फुलेचा सत्यशोधक समाज, यातून थोड्या प्रमाणात समाज सुधारणा होत गेल्या पण जातीव्यवस्था संपविता आली नाही. तसा प्रयत्नही झाला नाही. बौध्द धर्मियांना जाती व्यवस्थाच मान्य नाही. कारण बौध्द धम्मात जात नाही, समता आहे. जात आहे तेथे नीती नाही. जात नाती तोडते, द्वेष भावना पसरविते. म्हणून बौध्दांना जातीव्यवस्थाच मान्य नाही.
         आता 2011 च्या जनगणनेत बौध्दांनी (धर्मांतरीत) जात लिहावी  की, नाही हा नवा वाद आहे. काहींच्या मते जातीच्या रकान्यात बौध्द  लिहावे व धर्मांच्या रकान्यात बौध्द लिहावे. काहीच्या मते जातीचा रकाना कोरा सोडावा व धर्मांच्या रकान्यात बौध्द लिहावे. तर काहीच्या मते जातीच्या रकान्यात महार लिहावे व धर्माच्या रकान्यात बौध्द लिहावे. खरे तर बौध्द ही जात नाही. बौध्द हा धम्म आहे. जातीचा संस्थापक गौतम बुध्द नाही. धम्म म्हणजे जीवन जगण्याची पध्दत किंवा जीवन जगण्याचा मार्ग आहे. आनंदानी एकदा तथागत बुध्दाला विचारलं तथागत तुमच्या पश्चात आमचा शास्ता कोण? तेव्हा तथागत बुध्दांनी उत्तर दिलं तथागताच्या पश्चात धम्मच तुमचा शास्ता आहे. मार्गदाता आहे. बौध्द ही जात होऊ शकत नाही.
        आजची भारतीय संवैधानिक व्यवस्था व त्यानुसार देशाचा चालणारा राज्य कारभार यानुसार जात राहणार आहे. आता जातीव्यवस्था बदलवायची झाल्यास घटना दुरुस्ती करावी लागेल. हे शक्य नाही. चीन, जपान, ब्रम्हदेश या देशात बुध्द धम्मातील कायदे पाळतात. भारतात संविधानावर आधारित कायदे आहेत आणि हे  सर्वांना बंधनकारक आहेत. संविधानाला प्रथम मानावे लागते,संविधानाचा आदर करावा लागतो. आज धर्मांतरीत बौध्द असतील त्यात कोणी कुणबी, बौध्द असेल, कोणी महार बौध्द असेल, कोणी ब्राम्हण बौध्द असेल, बौध्द धम्मात प्रवेश केल्यावर मात्र सगळ्याचे व्यवहार धर्माप्रमाणे चालतात. कोणी जात पाळत नाहीत. जात व भेद विसरुन जातात. एवढं नक्की.
         प्रत्युत-समुत्पादात बुध्दाने जातीचा अर्थ केलेला आहे. जसे `उत्पादान पच्चया भवो, भवो पच्चया जाती, जाती पच्चया जटा मरण, शोक परिदेव दुःख दोमनस्य पायासा संभवंती.'
         अर्थ : उत्पादानामुळे भवाची उत्पत्ती होते, भवामुळे जातीचा उदय होतो. जातीमुळे म्हातारपण आणि मरण येते. जाती म्हणजे जन्म,जन्मालाच बुध्दानी जाती म्हटले आहे. म्हणून आपली जात महार, मांग, कुणबी, ब्राम्हण नाही. मनुष्य ही जात आहे. म्हणजेच मनुष्य जन्म आहे. पृथ्वी तलावर जाती विषयीचे वर्गीकरण केले तर तीन जाती (जन्य) संभवतात. मनुष्य, प्राणी, पशु म्हणजेच मनुष्य जन्म, पशु जन्म, पक्षी जन्म यात नर-मादी वेगळा जन्म (जाती) दाखविला नाही.
        हिंदू धर्म हा धर्म नाही. जाती जातींचा समुह आहे. बौध्द धर्मात जाती नाही. आमची संवैधानिक जात महार आहे. पण धर्माने आम्ही महार नाही. आमची जात मनुष्य आहे व धर्म आमचा बौध्द आहे. मार्गदर्शक धम्म आहे. गुरु किंवा शास्ता तथागत भगवान बुध्द आहे. आमचा धम्म गंथावरुन नाही. आचारा-विचारांवरुन सिध्द करु या. कोणी काहीही लिहावे त्यांचा  तो संवैधानिक स्वतंत्र अधिकार आहे.
(संदर्भ - राजजीवन वाघमारे)

6 comments:

 1. जर अस असेल तर जो माणूस नवीन बौद्ध धर्मात प्रवेश करतो त्याला नव-बौद्ध असे का म्हणतात. आणि आजन्म नव-बौद्ध असेच लावतात. असे का ???

  ReplyDelete
 2. मित्रा.. बबन नवीन बौद्ध धम्मात प्रवेश केलेल्या व्यक्तीला नवबौद्ध म्हणतात.असे तुम्हास कोणी सांगितले ? या जातीवादी सरकारने बौद्ध धम्मात सामील झालेल्या समाजाला तुम्ही वेगळे आहात असे दर्शवण्यासाठी खेळलेली ती एक चाल आहे. मूळ शुद्ध बौद्ध धम्मा मध्ये जातंच अस्तित्वात नाही. ज्या महार जातीने बौद्ध धम्म स्वीकारला ते नवबौद्ध...असे घटनेत देखील नाही आणि त्याला कोणताही कायदा लागू नाही. बौद्ध हे फक्त बौद्धच आहेत.

  ReplyDelete
 3. सनातन हिंदू28 July 2012 at 06:34

  फक्त बौद्ध धर्मामधेच जात अस्तित्वात नाही असे थोडेच आहे! इस्लाम,ख्रिश्चन इत्यादी धर्मांमध्ये सुद्धा जात अस्तित्वात नाही. मग तुमचा धम्म त्यांच्यापेक्षा चांगला कसा? ते बौद्ध धम्मात का येत नाहीत? त्यांनी तुमच्या धर्मातील लोकांना त्यांच्या धर्मात आमंत्रित केले तर तुम्ही तयार आहात का?
  तुम्ही त्यांच्या देशात (देशात सोडा, गल्लीत जाऊन) बौद्ध धम्माचा प्रसार करून दाखवा. केवळ भारतच नव्हे तर पाकिस्तान आणि बांगलादेश या देशांनाही बौद्धमय करण्याची जिद्द बाळगा. तसेच सध्या म्यानमार येथे बौद्ध मुस्लिम संघर्ष पेटला आहे. तुम्ही तेथील बौद्धांची बाजू घेणार की मुस्लिमांची? मुस्लिमांच्या सामूहिक हत्या करणे हे बौद्ध धम्मात बसते का? नसेल तर तुम्ही तेथील बौद्ध समाजाचा जाहीर निषेध करणार का?

  ReplyDelete
 4. @ सनातन हिंदू.... बौद्ध धम्म म्हणजे धर्म नाही... बौद्ध धम्म हे एक आचरण आहे.. भारत बुद्धमय करणे म्हणजे...केवळ धर्मांतर करणे नव्हे.... बौद्धमय करणे म्हणजे बुद्धाला आपल्या वागण्यात आचरणात आणणे होय...केवळ धर्मांतर करून कोणी बौद्ध होत असेल आणि आचरण जर बुद्ध सारखे नसेल तर तो बौद्ध नाही...!!! बौद्ध धम्मात हिंसेला स्थान नाही.... नावाने बौद्ध असणे म्हणजे बौद्ध नाही तर जो आचरणाने प्रज्ञावान, शीलवान, वीर्यवान असेल तोच खरा बौद्ध...मग तो कुठल्याही धर्माचा का असेना ?

  ReplyDelete
 5. This comment has been removed by the author.

  ReplyDelete
 6. स्वातंत्र्य भेटून ६० वर्षे च्या वर झाले तरी तुम्ही आपले अतीत विसरले नाहीत याने विकास होईल का जखमेवर मीठ चोल्याने दुख कमी होईल का आपले लक्ष भविष्य कडे का नसते .प्रत्येकाला आपला धर्म प्रिय असतो त्यांची मने दुखवणे हि हिंसा नाही का

  ReplyDelete