My Followers

Monday, 9 July 2012

बौद्ध तत्त्वज्ञानाचा अमीट ठसा...!!!

बौद्ध तत्त्वज्ञानाचा अमीट ठसा...!!!
          आज निसर्गाशी संबंधित अनेक सणवार आपण साजरे करतो,त्यापैकी जवळपास सगळे सण बौद्ध परंपरेतून आलेले आहेत. अनेक अर्थपूर्णप्रतिकंही याच संस्कृतीने समाजमनात रुजविलेली आहेत. खरेतर बौद्ध धर्म हाचभारतीय मातीतला पहिला आणि खरा मानवधर्म होय. हाच धर्म भारतीय संस्कृतीवरचाआद्य आणि सखोल ठसा आहे!
        बौद्धधर्माचे चेहरे तरी किती लपवणार? ज्यापुरी, शंृगेरी, बद्रीनाथ, द्वारका या ठिकाणी शंकराचार्यानी चार हिंदू धर्मपीठे स्थापन केली, ती ठिकाणे मूळची बौद्ध चळवळीचीच महान केंद्रेहोती! पुरीचे जगन्नाथाचे मंदिर हे पूर्वीचे बौद्धमंदिर होते! (इति. स्वामीविवेकानंद!) शंृगेरीचा शंकराचार्याचा मठच बौद्धस्तुपाच्या जागेवर झालेलाआहे! श्रीशैलमचे मंदिरही पूर्वीचे बौद्धशिल्प होते! तिरुपतीचा बालाजी,बद्रीनाथचा बद्रीकेश्वर ही सध्या हिंदूंची म्हणवली जाणारी धार्मिकक्षेत्रे पूर्वीची बौद्धधर्माची महत्त्वाची स्थाने होती (तिरुपती बालाजीआणि तिथला परिसर नीट न्याहाळला तरी हे लक्षात येते! मुंडन पद्धत ही मूळचीबौद्धपरंपरेची!)
      बौद्ध धर्माची जी चार प्रमुख सेंटर्स होती त्या ठिकाणीचारधाम यात्रा बौद्ध मंडळींनी सुरू केली. या चार धामांचे यथावकाश अपहरणकरण्यात आले. देशातल्या बहुतांश देवदेवता, त्यांच्या मूर्ती आणि मंदिरेमूळची बुद्धिस्टांची आहेत. अगदी कोल्हापूरची महालक्ष्मीची मूर्तीही आणितिचे मंदिरही! (उत्खननाची गरज इथे आहे!) अशी असंख्य ठिकाणे हिंदू-वैदिकसंस्कृतीने हडप केली आणि तिथे ‘..अशी आख्यायिका आहे..’ टाइप पौराणिककथांचा व वैदिक कर्मकांडांचा बाजार मांडला!
     बौद्धधर्म सबंध भारतभर व भारताबाहेर विस्तारला होताच, परंतु महाराष्ट्राच्या अणूरेणूत तो अक्षरश:भिनला   होता. लोकसेवेच्या, समतेच्या, ज्ञानविज्ञानाच्या चळवळीमहाराष्ट्राच्या दऱ्याखोऱ्यातून आणि डोंगरपर्वतातून निनादल्या होत्या!यातूनच महाराष्ट्राचे परमवैभव असलेली बौद्ध लेणी निर्माण झाली आणिमहाराष्ट्राच्या भूगोलावर बौद्ध इतिहासाच्या सर्जनशीलतेचा अप्रतिम ठसाकायमचा कोरला गेला! नंतरच्या काळात या लेण्यांबाहेर कुठल्यातरीचमत्कृतीपूर्ण शिवाची, देवाची किंवा देवीची उभारणी करून बौद्धलेण्यांनाहायजॅक करण्यात आले! त्यासाठी काल्पनिक देवदेवतांच्या सुरस कहाण्यांना ऊतआणला गेला!

    प्रबोधनकार ठाकरे म्हणतात, ‘फारदूर नको, लोणावळ्याजवळची कार्ला लेणी पाहा. ही वास्तविक बौद्धांची!तेथल्या त्या ओटय़ा, ते दिवाणखाने, ते स्तूप, साऱ्या बौद्धांच्यास्वाध्यायश्रमाच्या जागा! तेथे बाहेर एक देवी अचानक प्रगट झाली! तिचे नावएकविरा! हिला वेहेरीची देवी असेही म्हणतात. ही पांडवांची बहीण. हिच्यासाठीभीमाने एका रात्रीत ही लेणी कोरून काढली!’ 

किती उदाहरणे सांगायची? आजशाळा-कॉलेजांमधून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. परंतु हा‘गुरू’ कोण हे कुणाला माहीत नाही! हा गुरू आहे, गौतम बुद्ध! त्याने पाचशिष्यांना केलेल्या पहिल्या उपदेशामुळे पहिली गुरुपौर्णिमा साजरी झाली आणितिथून तो पायंडा पडला! (पण आज गुरुपौर्णिमा बिनबोभाटपणे व्यासमहाशयांच्यानावावर खपविली जातेय!) मंगळसूत्र, मंगलाष्टका असे अगणित शब्दबौद्धपरंपरेतूनच आलेले आहेत. थोडक्यात, आपल्या लोकसंस्कृतीवर असलेलाबौद्धधर्माचा, बौद्ध प्रतिकांचा, बौद्धविचारतत्त्वांचा ठसाच इतका अमीट आहेकी, त्यापासून बाजूला होऊ म्हटले तरी होता येत नाही, अशी परिस्थिती आहे.
     भारताच्याराष्ट्रध्वजावरचे अशोकचक्र हे बौद्धधम्मचक्रप्रवर्तनाचेच प्रतिक आहे!भारताची अधिकृत शासकीय राजमुद्रा ही बौद्धपरंपरेचीच खूण आहे.राष्ट्रपतीभवनात राष्ट्रपतीच्या आसनामागे दर्शनी जागी ठळक अक्षरात‘धर्मचक्रप्रवर्तन’ असे कोरलेले आहे..
          (यात हिंदू धर्माची कुठेही बदनामी केलेली नाही.आपल्या देवांची निर्मिती चे मूळ लक्षात घेऊन ला लेख दिला गेला आहे..याच्या पासून फक्त हेच सिद्ध होते कि आपण प्रेत्येकाकडून काहीना काही घेत असतो,तसेच देतही असू पण ज्या प्रमाणे आपण हिंदू धर्माचा प्रसार करतो त्याचप्रमाणे ज्या मूळ धर्मापासून आपण चालवलो जातो त्या धर्माचा देखील विसर पडता काम नये इतकेच .....)
(By : Avinash Kamble. globalmarathi.com)

No comments:

Post a Comment