My Followers

Saturday, 23 January 2016

पुन्हा पुन्हा तोच गुन्हा...

पुन्हा पुन्हा तोच गुन्हा...

पुन्हा आमचे चारित्र्य तपासले जाणार,
पुन्हा त्यावर शिंतोडे उडवले जाणार,


पुन्हा आम्ही दंगेखोर, नक्सली ठरणार,
पुन्हा आमचे संबंध अनैतिक ठरणार,


पुन्हा तुमचा खुन ? खुन, आमचा आत्महत्या ठरणार,
पुन्हा आमचे चारित्र्य, आमचे नैराश्य समोर येणार,


पुन्हा शिकणे, संघटीत होणे, संघर्ष करणे,
जगण्यास मज्जाव करणारा, गुन्हा होणार,


पुन्हा कुठे खर्डा, तर कुठे जवखेडा होणार,
दोन दिस दुखवटा, चार दिस निषेध होणार,


तुम्ही याल जामीनावर छातीठोकपणे,
आमचा माञ कायमचा भोतमांगे होणार


पुन्हा तुमचा जातीवाद ? नुसता वाद ठरणार,
पुन्हा आमचा निषेधही, जातीयवाद ठरणार,


पुन्हा न्यायाचा बाजार भरणार,
ज्याची बोली मोठी, त्याचाच नफा होणार,


एक निरपराधी जगविण्याच्या अट्टाहासात,
पुन्हा शंभ्भर अपराधी सोडले जाणार,


शंभरातले हे असे बेगडी निरपराधी सुटत राहणार,
पुन्हा पुन्हा नव्याने, नवनवे जीव घेतचं राहणार...


- अॅड. राज जाधव, पुणे....!

वाह्ह रे दुटप्पी फुरोगामी...

वाह्ह रे दुटप्पी फुरोगामी...

यांना हिंदू मुस्लिम एकता हवीय, 
यांना सर्वधर्म समभाव हवाय, 

यांना स्वच्छ भारत हवाय, 
यांना भ्रष्टाचारातुन मुक्तता हवीय, 

आरक्षणमुक्त भारत हवाय, 
यांना गांधी हवाय, नेहरु हवाय, 

भगतसिंह, आझाद, बोस, सर्व चालतील, 
वंदे मांतरम चालेल, जनगणमण तर सक्तीचेच, 

यांना गुलामअली चालेल, राहतफतेहअली चालेल,
मार्क्स चालेल, लिंकन चालेल,

यांना दामीनी, अखलाक, सोहराबुद्दीन चालेल,
यांना दादा, दीदी, आयला मायला...
एक्सवायझेड सर्व चालेल....

शेवटी..."फुले-शाहु-आंबेडकर" ही चालतील... 
पण...प्रतिमेतले, पुतळ्यातले, स्मारकातले....


यांना....

नकोय....तो फक्त आंबेडकरवाद....
नकोयेत... ते फक्त आंबेडकरवादी....

- अॅड. राज जाधव, पुणे...!

कायदा भिमाचा...


कायदा भिमाचा...

कायदा जरी असला बापाचा,
मालकी सांगून मोडु नका...


आहे संविधान सर्वश्रेष्ठ,
विश्वासहार्यता तयाची तोडु नका...


टपुन बसलीत हिंस्र गीधाडे,
तोडण्या लचके तुमच्या आयुष्याची...


भावनेचा खेळ, भावनेने खेळुन,
चक्रव्युहात स्वतःला ओढु नका...


आहेत दोषी जात्यंध हे भडवे,
शिकविण्या धडा नरभक्षकांना....


मार्ग भिमाचा सोडु नका,
मार्ग भिमाचा सोडु नका....!


- अॅड. राज जाधव....!


Tuesday, 5 January 2016

शूरा... मी वंदिले....


शूरा... मी वंदिले.... 

"तुम्ही शुर वीरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे, भिमा कोरेगावला जावून बघा, तुमच्या पुर्वजांची नावे तेथील विजयस्तंभावर कोरलेली आहेत...तो पुरावा आहे की, तुम्ही 'भेड बकरींची संतान' नसून "सिंहाचे छावे" आहात"....!

-  डॉ. बाबासाहेब आंबेडकर -
भीमा कोरेगाव जिंकण्या
होते किती साथी 
पेशवे ब्राम्हण विझले 
महारांच्या पेटल्या वाती...!!! 

नदीकाठी  नदीतीरावर 
पेशव्यांचा केला भंग 
ब्रिटिशही सलाम करती 
महारांचा विजयस्तंभ...!!! 

आले किती अंगावर 
मोजायला अंकच नाही 
पुन्हा वाट्याला जावू नका 
महारांना अंतच नाही...!!! 

भीमा कोरेगावाची 
नाही सांगत खोटी गोष्ट 
पुण्याच्या गादीवरती 
फक्त महारांचीच पोस्ट...!

- अनामिक -