My Followers

Thursday, 12 July 2012

जादूटोणा विरोधी कायदा समजून घ्या...!!!

जादूटोणा विरोधी कायदा समजून घ्या...!!!


बहुधा सगळयाच सुजाण नागरिकांना, भारत या राष्ट्राचे नागरिक म्हणून त्यांचे हक्क माहीत असतात; पण फारसं कुणालाच हे माहीत नसतं, की वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणं, हे भारतीय संविधानाच्या, विभाग 4 अ, कलम 51 अ प्रमाणे, प्रत्येक भारतीय नागरिकाचं कर्तव्य आहे. एवढंच नव्हे तर 1987 पासूनच्या नव्या मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धतीतील ते एक महत्त्वाचं मूल्य आहे.

          वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंतर्भाव राज्यघटनेत कर्तव्य म्हणून आणि शिक्षणपद्धतीत मूल्य म्हणून का केला गेला, याचा विचार आपण वैज्ञानिक प्रगतीच्या संदर्भात केला पाहिजे. पाश्चात्त्य राष्ट्रांमध्ये विज्ञानाची प्रगती आणि सामाजिक सुधारणा, बऱ्याच प्रमाणात जोडीनेच झाल्या. आपल्याकडे आधी विज्ञानाची फक्त सृष्टी आली; पण विज्ञानाची दृष्टी येण्यासाठी आवश्यक संधी, आणि योग्य प्रकारचं शिक्षण, यापासून सर्वसामान्य माणूस वंचितच राहिला. 

          महाराष्ट्र विधानसभेने  जादूटोणा विरोधी कायदा  कोणाच्या धर्मा विरुद्ध आहे कि धर्माच्या बाजूने..? हा कायदा असल्यामुळे नुसते तर्क वितर्क करता येणार नाहीत म्हणून माझे जास्त डोके न वापरता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे  डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्याच शब्दात जाणून घेऊ हा कायदा आहे तरी नेमका काय ? आणि धर्ममार्तंड का याला विरोध करतायेत ?   

महाराष्ट्र विधानसभेने अंधश्रध्दा निर्मूलनाशी संबंधित हा कायदा कोणत्याही प्रकारे कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही. याची पूर्ण कल्पना असूनही 'लांडगा आला रे लांडगा आला' या पध्दतीने स्वत:ला धर्माचे ठेकेदार समजणाऱ्या संघटनांनी आरोळी ठोकली.सत्तारुढ पक्षाचे आमदारही काही प्रमाणात या भूल थापांना बळी पडले. 13 एप्रिल 2005 रोजी सत्तारुढ पक्षाच्या आमदारांनीच स्वत:च्या सरकारने केलेल्या कायद्याचे बिल रोखण्याचा अविवेक केला. खरे तर या बिलात तसे काहीही नव्हते. मात्र याबाबत विरोधकांना ठणकावून सांगण्याऐवजी कायदा सर्वसंमतीने करावा अशी सूचना विलासरावजींनी केली. कायद्याच्या मसूद्यात दूरान्वयानेही धर्मविरोधी काही नाही हे मुख्यमंत्र्यांना पटले होते. परंतु एखादा सामाजिक कायदा सर्व संमतीने झाला तर बरे असे त्यांना वाटत होते. विधानसभेतील चर्चा लक्षात घेऊन कायद्याचे प्रारुप सौम्य करण्यात आले. विरोधी पक्ष नेत्यांशी चर्चा करण्यात आली. मात्र प्रत्यक्ष कायदा मंजूर होताना विरोधकांनी(अकारण) गोंधळ घालावयाचा तो घातलाच. असेच होणार होते तर आधीचे प्रारुपच जे मंत्रीमंडळानेही एकमताने मंजूर केले होते ते ठेवून काय बिघडले असते? असे वाटल्यावाचून राहिले नाही. पण आता जे झाले ते झाले. असलेला कायदा समजून घेणे, त्याप्रमाणे कारवाईचा आग्रह धरणे आणि ज्याबाबी कायद्याच्या कक्षेत येत नाहीत त्याबाबत पुन्हा नव्याने आग्रह निर्माण करणे हे करावे लागेल. यासाठी कायदा समजून घ्यावयास हवा. तो तसा समजून घेणे सोपे आहे. कारण कायद्याच्या व्याख्येत परिशिष्टातील बाबींना अंधश्रध्दा समजावे अशी स्पष्ट व थेट तरतूद आहे. (या लेखा आधीच्या कायद्यावरील लेखातील अनुसूची वाचावी.) याबाबींचे आचरण करणे हा 6 महिने ते 7 वर्षाच्या सक्तमजुरीपर्यंतची शिक्षा गंभीर असलेला गुन्हा होऊ शकतो.

क्रमांक ची तरतूद पहावीआपल्या देशात अजूनही माणसाचे मन आजारी पडते हे माहित नाहीमाणूस वेडयासारखा वागू लागला तर तो अचानक असे वागू लागला याचे कारण बाहेरची बाधा असे मानण्यात येतेत्यावरचा उपाय स्वाभाविकपणेच भगत मांत्रिक देवऋषी करतातहे उपाय केवळ अज्ञानावर आधारित नसतात तर अघोरी व क्रूर असू शकतातमनोरुग्ण व्यक्तीला भूतबाधा झाली असे समजून तिचे केस ओढणेतिला चटके देणे व मारणे या सर्व बाबी व्यक्तीच्या अंगातील भूत उतरवून त्याला पूर्ववत माणूस बनवणेया उदात्त(?) हेतूने केल्या जातातस्वाभाविकपणे मनोरुग्णाला छळ मानहानी सोसावी तर लागतेच परंतु त्याबरोबरच चुकीचा उपाय होतो हे आणखीच घातकबुलढाण्यापासून अवघ्या 30 कि.मी.अंतरावर असलेल्या सैलानी बाबाच्या दर्ग्यावर भूताने झपाटल्याच्या नावाने मनोरुग्ण दोन वर्षापूवी साखळदंडाने बांधून ठेवलेले आढळले होतेअशी ठाणी महाराष्ट्रात ठिकठिकाणी आहेतभूत उतरवण्याचे काम तेथे अमावस्यापौर्णिमेला अथवा काही विशिष्ट दिवशी चालतेया बाबींची माहिती मिळाल्यास अथवा असा उपचार करणाऱ्यांना हा कायदा कळाल्यास प्रतिबंधात्मक म्हणूनही हा प्रकार रोखता येईल.

2) ही तरतूद तथाकथित चमत्काराचा दावा करणे व फसवणे यासाठी आहे. यामध्ये चळवळीने एक महत्त्वाचा विजय संपादन केला आहे. कायद्यात चमत्कारांचा उल्लेख तथाकथित चमत्कार असा आहे. कोणताही चमत्कार तथाकथितच असतो ही याच्यातील महत्त्वाची बाब आहे. भारतीय घटनेत वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे हे नागरिकाचे कर्तव्य सांगीतले आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे म्हणजे कार्यकारणभाव तपासणे आणि चमत्कार घडणे याचा अर्थ कार्यकारणभावाचा विज्ञानाचा नियम ओलांडून काही अद्भूत बाबी घडतात असे मानणे. अर्थात असा तथाकथित चमत्कार करणे हा गुन्हा नाही तर त्याचा प्रचार, प्रसार करुन लोकांना फसवणे, आर्थिक दृष्टया लुबाडणे, स्वत:ची दहशत बसवणे हा गुन्हा आहे. एखादा बाबा महिलेकडे जातो. तिच्याच घरातले कुंकू तिच्याच हातावर ठेवून तिच्याच घरातले पाण्याचे चार थेंब त्यावर टाकतो. बघता बघता लालभडक कुंकू काळेकुट्ट होते.अर्थ उघड आहे. कुंकवाने व्यक्त होणाऱ्या सौभाग्याला धोका आहे. शांती करण्यासाठी काही रकमेची मागणी केली जाते. ती निमूटपणे दिली जाते.पुन्हा घरातलीच हळद बाईच्याच हातावर देऊन घरातलेच पाणी त्यावर शिंपडले जाते आणि हळदीचे कुंकू बनते. घरधन्याचा धोका टळतो बाई खुशीने पैसे देते हे फसवणे आहे आणि दैवी दहशतवादही आहे. हा मी अतिशय प्राथमिक प्रकार सांगितला. यापेक्षा अनेक पातळयावर विविध स्वरूपाच्या कथित चमत्काराद्वारे फसवणूक चालूच असते. अशा सर्व प्रकाराबाबत पोलिसाकडे तक्रार दिल्यास खटला दाखल केला जाईल. यामुळे स्वाभाविकच या प्रकारापासून कायद्याच्या धाकाने परावृत्त होणाऱ्यांची संख्या वाढेल. फसवणुकीचे प्रमाण घटेल. 

3)महाराष्ट्रातल्या अनेक जत्रायात्रात नवस फेडण्यासाठी अनेक अघोरी प्रकार चालतात. देवळाच्या दगडी भिंतीवर टकरा घेणे, पाठीला लोखंडी गळ टोचणे, डोक्यावर वस्ताऱ्याच्या सहाय्याने चिरा मारुन रक्त काढणे वगैरे. याबाबी कोणत्याही धर्माचा भाग असूच शकत नाहीत. या प्रथांचा अवलंब करणे अथवा करावयास भाग पाडणे हा गुन्हा आहे. मात्र मसूद्यात 'जीवघेणा' असा शब्द आहे. या स्वरुपाचे कृत्य जीव घेणे आहे की नाही याचा निर्णय कोर्टच देऊ शकेल. आणि केस लॉ तयार होईल व मग परिणामकारकता वाढेल.

4) या प्रकाराशी संबंधित बाबी मानव हत्येपर्यंत गेल्यानंतर आजही गुन्हाच बनतात. मात्र या तरतूदीमध्ये अशा प्रकारांना प्रवृत्त करणे व प्रोत्साहन देणे हा देखील गुन्हा आहे. हा कायदा अस्तित्वात असता तर पैशाचा पाऊस पाडण्याच्या लोभातून झालेले सिंधुदूर्ग जिल्ह्यातील नांदोशीचे हत्याकांड रोखणे सोपे गेले असते. 5)

अंगात संचार होणे आणि तो दैवी आहे असे सांगून इतरांच्या मनात भीती निर्माण करणे हे प्रकार आजही अनेक ठिकाणी चालू असतात. अंगात येणाऱ्या बायका जे बोलतात त्याला दैवी उद्गाराचे प्रामाण्य लाभते. आणि त्यामुळे अशा बाईच्या वा व्यक्तीच्या मुखातून जो निर्णय येतो तो पाळणे सक्तीचे बनते. अशा सर्व बाबींना या कलमातील तरतुदींद्वारे रोखता येईल.

6) ही तरतूद प्रामुख्याने आदिवासी भागातील डाकीण व भुताळी या अघोरी प्रथेबद्दल आहे. गावात काही मुले आजारी पडतात. लवकर बरी होत नाहीत. त्यातील काही दगावतातही. काही वेळा गावात रोगराई निर्माण होते. या सर्वाचे खापर अंधश्रध्द बहुसंख्य जनमानस व काही मतलबी लोकांचे कटकारस्थान यातून गावातील एखाद्या व्यक्तिवर डाकीण व भुताळी या नावाने ठेवले जाते. या व्यक्तीला गावात जगणे तर अवघड बनतेच परंतु प्रसंगी जीवालाही मुकावे लागते. महाराष्ट्र राज्याच्या आदिवासी बहुल जिल्ह्यात हा प्रकार आजही मोठया प्रमाणावर चालतो. त्याला थेट आळा घालणे कलमातील या तरतूदीमुळे जमू शकेल. 7)

या कलमातील तरतूद करणी, मूठ मारणे या स्वरुपाच्या प्रकाराबद्दल आहे. अशा बाबी असतात व त्या खऱ्या असतात असा मानणारा एक मोठा वर्ग आहे. यामुळे घरावर कोणी करणी केली किंवा मूठ मारली हे सांगितले गेले की, संबंधित व्यक्तिच्या मारहाणीपर्यंत प्रकरण जाते. दोन व्यक्तींची मारामारी ही किरकोळ बाब मानली जाईल. पण करणीच्या नावाने होणारी मारहाणही मात्र आता त्यातील अंधश्रध्देच्या घटकामुळे गंभीर बाब मानली जाईल. शिक्षाही जबर होऊ शकेल आणि त्यामुळे असे प्रकार थांबण्यासच या कायद्याची मदत होईल.

8) पश्चिम महाराष्ट्रात आजही मोठी आई किंवा बाई हा प्रकार विशेषत: डोंगराळ भागात आढळतो. व्यक्तीला कोणत्याही स्वरुपाची गाठ उठते. ती कधी करट असते तर कधी कॅन्सरचे टयुमरही असू शकते तर कधी क्षयरोगाच्या गंडमाळा असतात. या गाठीकडे बोट दाखवून असे सांगीतले जाते की हा मोठया आईचा(अथवा बाईचा) कोप आहे. यावर डॉक्टरांचे उपाय त्वरीत बंद करा. त्यानंतर मांड भरणे नावाचा एक भरपूर खर्चिक विधी करावयास लावला जातो याची परिणीती शेवटी केवळ कर्जबाजारीपणातच होते असे नाही तर योग्य उपचाराच्या अभावी व्यक्तीला जीवही गमवावा लागतो. चळवळीच्या प्रभावाने असे प्रकार आम्ही मर्यादित प्रमाणात रोखले आहेत. मात्र या कायद्याने अशा बाबींवर थेट आघात होऊन त्या पूर्णपणे बंद होण्याची शक्यता वाढेल. 9)

पिसाळलेले कुत्रे चावल्यानंतर एकमेव उपाय असतो प्रतिबंधात्मक इंजेक्शन घेण्याचा. अन्यथा रेबीज हा रोग होऊ शकतो आणि आजही जगात त्याला उपाय नाही. 100 टक्के मृत्यू हीच सुटका. पिसाळलेला कुत्रा चावल्यानंतर घ्यावयाची पारंपारिक इंजेक्शन्स प्रचंड दुखतात. हल्ली निघालेली नवीन इंजेक्शन्स खूप महाग आहेत. यावरचा उपाय म्हणून काही ठिकाणी पोटात घेण्याचे अत्यंत स्वस्त औषध दिले जाते. सांगली जवळील कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावातील रमजान गुंडू शेख यावर याबाबत समितीने खटला घातला होता. आठवडयातील ज्या दिवशी तो औषध देई त्यावेळी दूरदूरहून शेकडयांच्या संख्येने गर्दी होई. न्यायालयात आम्ही खटला हारलो होतो. आता तसे होणार नाही. अशी मंडळी थेट गजाआड जातील. विषारी नागाचा दंश झाल्यानंतर त्यावर एकच उपाय म्हणजे त्वरीत प्रतिविषाची इंजेक्शन घेणे. परंतु याही बाबतीत मंत्र टाकून विष उतरवणाऱ्या मांत्रिकांची चलती आहे. अनेकदा सर्प बिनविषारी असतो आणि श्रेय मांत्रिकाला जाते. यापुढे अशी उपचार करणाऱ्या केंद्रावरील व्यक्ती आणि त्यांना तेथे नेणारे हे दोघेही थेट तुरुंगात जातील. साप विषारी की बिनविषारी हा मुद्दाच रहाणार नाही. योग्य वैद्यकीय उपचाराऐवजी दिशाभूल करणे व योग्य उपचार रोखणे हा गुन्हा मानला गेला आहे. (अर्थात यासाठी सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात पुरेशा प्रमाणात प्रतिविषाची इंजेक्शने उपलब्ध असणे याची गरज आहे. हे लक्षात ठेवायला हवे.)

10) हाताच्या बोटाने पोटाची अथवा हृदयाची अवघड शस्त्रक्रिया करण्याचा दावा करणाऱ्या अस्लमबाबाने महाराष्ट्रातील जनतेला मजबूत लुटले.आता त्याला त्वरीत अटक व भरभक्कम शिक्षा होऊ शकेल.(कारण त्याने स्वत:च्या प्रचाराच्या सी.डी. काढल्या होत्या. त्यामुळे पुरावा आयताच उपलब्ध आहे.) मुलगाच हवा या हव्यासापोटी गर्भवती स्त्रीवर काही विधी करुन गर्भाचे लिंग बदलण्याचा दावा करणाऱ्या जाहिराती काही वर्षांपूर्वी दिसत. त्या आता दिसत नाहीत. परंतु मुलगा होण्याची आकांक्षा असे विधी करवून घेण्यास प्रवृत्त करते. या स्वरुपाच्या प्रकारांना यामुळे आळा बसेल.11)
बुवा तेथे बाया असे एक दु:खदायक समीकरण बऱ्याच ठिकाणी दिसते. विवंचनेनी ग्रासलेल्या आणि पारंपारिक विचारातून आलेल्या अवतार कल्पनेने भारलेल्या वास्तवामुळे स्त्रियांना कथित अवतार असलेल्या बाबा, बुवा, महाराजांचा आधार वाटू लागतो. शिवाय अशा ठिकाणी अशा व्यक्तीकडे वारंवार जाणे हा धार्मिक आचरणाचा भाग मानला जात असल्यामुळे याबाबतीत अडथळाही येत नाही. यातूनच स्त्रियांचे लैंगिक शोषण जन्म घेते.पुणे येथील काही वर्षांपूर्वी गाजलेली वाघमारेबाबाची केस ही याबाबत कुप्रसिध्द आहे. अनेक स्त्रियांशी शरीरसंबंध करुनही तो कायद्याच्या चौकटीत फारसा अडकला नाही. नव्या कायद्याने ही त्रुटी भरुन निघेल.
12) बुवाबाजी हा अत्यंत बरकतीला आलेला धंदा आहे. त्यातील एक अफलातून युक्ती अशी की, मंद बुध्दीची एखादी व्यक्ती निवडावयाची ती जितकी जास्त मंद बुध्दीची असेल तितके अधिक बरे. अशी व्यक्ती ही अवलिया महाराज आहे. तिच्यामध्ये काही विशेष शक्ती आहे असे भासवून तिच्या नावाचे धंदा उभारला जातो. अशा बाबाला काहीच कळत नसल्यामुळे टोळक्यांचे चांगलेच फावते. या बाबींच्यात आता त्वरीत हस्तक्षेप करता येईल.
मूळ कायदा यापेक्षा कडक होता. त्यामध्ये अंधश्रध्देची एक व्यापक व्याख्या होती. त्यामुळे परिणामकारकता वाढली होती. स्वयंसेवी संस्थांच्या सहभागाची तरतूद होती. त्यामुळे कायदा केवळ पोलिसांवर अवलंबून राहिला नसता. पोटावर हात फिरवून मुले देणारी पार्वती माँ डोक्यावर फरशी ठेवून निदान करणारा फरशीवालेबाबा यांचा थेट समावेश होता. या सर्व बाबी आता वगळल्या आहेत. एक मागणी अशीही आहे की कायद्यात नारायण नागबळी, वास्तूशास्त्र, तोडगे विधी सांगणारे ज्योतिषी यांचा समावेश करा. मागणी रास्तच आहे पण अवघडही. पहिले पाऊल तर पडले आहे. कायदा अधिक कडक करण्याच्या मागणीमागील जनतेचा आवाज जेवढा बुलंद आणि सक्रिय होईल त्याप्रमाणात पुढच्या टप्प्यांच्याकडे वाटचाल होईल. मात्र त्याआधी खूप प्रबोधन लागेल आणि संघर्षही. या कायद्यातील सर्व तरतूदी या ग्रामीण, अडाणी, अशिक्षीत लोकांसाठी आहेत. पांढरपेशी शहरी उच्चभ्रू लोकांच्या अंधश्रध्दांना यात हातच लागलेला नाही हा आक्षेप बरोबर आहे. याबाबतची स्पष्ट भूमिका अशी की, अंधश्रध्दा ही प्रामुख्याने गरीबाला गरीब ठेवण्याचे कारस्थान आहे. ज्यामुळे ज्यांचे या अंधश्रध्दातून शोषण, नुकसान होऊन जीवन उध्दवस्त होते त्यांनाच प्रथम वाचवणे आवश्यक आहे. अंधश्रध्दा वाईटच पण त्या आघाटाने मोडून पडू शकणाऱ्या दुर्बल घटकांना संरक्षणाची गरज अधिक म्हणून कायदाही प्रथम त्यांच्याकरता....!!!
(संदर्भ - डॉ.नरेंद्र दाभोलकर)
सनातनं प्रभात च्या मते - 
भुतांना थोतांड समजणे, ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीची अंधश्रद्धाच !
‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’वाले ‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पा’च्या अंतर्गत विद्यार्थ्यांना ‘भुते नसतात’, असे सांगण्यासाठी ‘शोध भुतांचा’, या कार्यक्रमाचे आयोजन करतात. या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना रात्री १२ वाजता स्मशानभूमीच्या ठिकाणी नेण्यात येते आणि ‘भुते कुठे आहेत’, हे विचारण्यात येते. ‘शोध भुतांचा’, हा कार्यक्रम कोणत्याही वैज्ञानिक निकषांत बसणारा नाही; कारण 
१. भुते वायुरूप असतात. ज्याप्रमाणे वारा वहातांना डोळ्यांना दिसत नाही; पण थंडी वाजण्याने तो जाणवतो, त्याप्रमाणे वायुरूप भुते दिसत नाही; पण त्यांचे अस्तित्व स्मशानभूमीत गेल्यावर अस्वस्थ वाटणे, मळमळणे आदी त्रासांवरून जाणवते. 
२. ‘शोध भुतांचा’ हा कार्यक्रम ‘वैज्ञानिक जाणिवा प्रकल्पा’च्या अंतर्गत घेणारी अंनिस स्मशानभूमीत ‘भुते नाहीत’, हे सिद्ध करण्यासाठी एकही अत्याधुनिक वैज्ञानिक उपकरण घेऊन जात नाही. भुते शोधण्याचे डोळे हे प्रमाण असू शकत नाही; कारण सूक्ष्मजंतूही डोळ्यांना दिसत नाहीत, ते पहाण्यासाठी सूक्ष्मदर्शकाची आवश्यकता लागते.
३. जगात भुतांविषयी माहिती देणारी ४९ कोटी ३० लाख संकेतस्थळे आहेत. त्यांपैकी भुतांविषयी शास्त्रशुद्ध संशोधनाची माहिती असलेली १० कोटी ३० लाख संकेतस्थळे आहेत. म्हणजे भुते असण्याविषयी जगात मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक स्तरावर संशोधन उपलब्ध आहे. असे असतांना या संशोधकांपेक्षा ‘भुते नाहीत’, असे सांगणारी अंनिस स्वतःला त्यांच्यापेक्षा मोठी विज्ञानवादी समजते का ? 
‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ने ‘भुते नाहीत’, असा विज्ञानविरोधी प्रचार करणे म्हणजे समाजात अंधश्रद्धा पसरवणे होय. शासन त्याविरुद्ध अंनिसवाल्यांवर कार्यवाही करणार का ?
    कायद्याने समाज बदलत नाही हे अर्धसत्य आहेजागृत जनशक्तीला दंडशक्तीची जोड उपयोगी ठरतेमात्र अंधश्रध्दांना कायद्याच्या क्षेत्रात आणणे हे अधिकच संवेदनशीलअंधश्रध्दा कोणती व श्रध्दा कोणती हे व्यक्तिनिहाय बदलतेएकाची पूजनीय श्रध्दा दुसऱ्याला जीवघेणी अंधश्रध्दा वाटते.माणसे याबाबत एकाच वेळी हळवी व आक्रमक असतातअशावेळी दोन प्रमुख वृत्तपत्रांनी 'या कायद्याने अंधश्रध्दा जातील काया विचारलेल्या वाचक कौलाला 35% व 54% मते मिळावीत हे ही आश्वासकचपण मुख्य प्रश्न तसाच राहतोमते देणाऱ्यांनी अंधश्रध्दा कशाला मानले आहेआणि कायद्यात खरोखर काय आहेमी इथे दोघांचेहि म्हणणे मांडले आहे. आता तुम्हीच तुमच्या सदसद विवेक बुद्धीने ठरवा कि हा कायदा आला पाहिजे कि नाही ? चांगला सुशिक्षित समाज  घडविण्यासाठी किती उपयोगी आहे आणि किती नाही ?

अँड.राज जाधव

6 comments:

 1. दुर्दैव असे की आपल्या एवढ्या मोठ्या उत्तम लेखाला एकही कॉमेंट नाही !
  मी आयुर्वेदीक चिकित्साकरणारा वैद्य आहे !
  सर्व लेख व विधेयकातले मसुदे उत्तम !
  परंतु...
  ह्यात अपेक्षित सर्पदंश चिकित्सा व पुमान्‌ गर्भधारणा किंवा स्री गर्भधारणा हे शास्रोक्त चिकित्सेतील एक भाग असून आधुनिक शास्राबरोबर संयुक्तिक संशोधन पुर्ण होणे आवश्यक आहे ! तो पर्यंत ह्या मुद्द्यांना पुर्णपणे नाकारणे चुकीचे ठरेल परंतु कायद्यात त्याचा समावेश करावा... सद्यजनस्थितीत ते उपयुक्त आहे ! परंतु हे लक्षात ठेवावे की आयुर्वेद हे शास्र ह्याचा उल्लेख व स्विकार करते !

  अपस्मार उन्माद ह्या व्याधींमध्ये रुग्णास साखळदंडाणे बांधणे , मारणे , घाबरवणे ह्या "त्रासन चिकित्सा" होत ! परंतु ह्या कधी कराव्यात व का कराव्यात हा भाग वैद्याकडे असायला हवा... भोंदू बाबा ह्याचा गैरफायदा घेतात त्यांना आळा बसण्यासाठी कायदा हवाच...
  परंतु ह्या मागे ही काही शास्रीय विचार आहे व ही चिकित्सा आयुर्वेदात सांगितली आहे म्हणजे आयुर्वेद ही थोतांडाचा अनुग्रह करते असे समजू नये !

  "भूत-चिकित्सा" किंवा "ग्रहबाधा" ही आयुर्वेदात एकेकाळी सुप्रसिद्ध व अद्यावत परिपुर्ण शाखा अष्टांग आयुर्वेदापैकी एक होती !
  अष्टांग आयुर्वेद = काय बाल ग्रह उर्ध्वांग शल्य द्रष्टा जरा वृषै !
  परंतु मध्यंतरीच्या ३०० मुसलमानी आक्रमणे / राजवटी + १५० वर्षे ब्रिटीश राजवट + ६० वर्षे भारतीय राजवट ह्या काळात आय्रुर्वेदास राजाश्रय न मिळाल्याने व इतर शास्र पुरस्कार झाल्याने संशोधन व कर्माभ्यास कमी पडला त्यामुळे आता ह्या बद्दल चे परिपुर्ण ज्ञान असलेले वैद्य कमी आहेत... तरी हा पुर्णतः अंधश्रद्धेचा विषय आहे असे समजू नये !!

  अधिक शंका असल्यास संदर्भ मिळतील...
  परंतु हे मुद्दे लक्षात घ्यावेत व तश्या दुरुस्ती विधेयकात असाव्यात ही विनंती !!

  वैद्य म्हणून पाठिंबा !!!

  ReplyDelete
 2. अंधश्रध्दा निर्मूलन करतांना श्रध्देचे संवर्धन केले पाहिजे

  ReplyDelete
 3. अंधश्रध्दा निर्मूलन करतांना श्रध्देचे संवर्धन केले पाहिजे

  ReplyDelete
 4. जुन्नर तालुक्यातील उसरान या गावामध्ये हाताला चुना लावून नंतर हात धुतल्यावर पिवळे पाणी निगते व माणसाला झालेली कावीळ निघून जाते येतील बऱ्याच वर्षापासून कावीळ वाला बाबा प्रसिध्द आहे असे खरंच कावीळ बरी होत असेल का

  ReplyDelete