My Followers

Monday 16 July 2012

' आता ओबीसी बांधव बुध्द धम्माच्या वाटेवर...!!!

"आता ओबीसी बांधव बुध्द धम्माच्या वाटेवर".......!!!
"हिंदू धर्मात ओबीसींचा कोंडमारा होतो आहे. हिंदुंच्या छावणीत ओबीसी गुदमरताहेत" असा घणाघाती हल्ला बीड येथील सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी केला. २०१५ पर्यंत ५ लाख ओबीसी बांधव बौध्द धर्म स्वीकारतील अशी घोषणाही त्यांनी केली...!!!
         "आता ओबीसी बांधव बुध्द धम्माच्या वाटेवर... याअंतर्गत रविवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजीत कार्यक्रमात ते आपल्या ३० -३५ वर्षाच्या चळवळीतील अनुभवाचे विवेचन केले. ते म्हणाले ओबीसी म्हणजे मुळचे नागवंशी. नाथसंप्रदाय हा पुर्वाश्रमीचा नागवंशी होता. त्यात नालंदाचे हे नागवंशी होते. त्यांना मच्छिंद्रनाथांनी गुरू मानले. तर गोरकनाथांनी मच्छिंद्रनाथंना गुरू मानले. गोरकनाथांचे शिष्य गहनीनाथ होते.अशी नाथाचा संप्रदाय म्हणजे बुध्द धम्माच्या विचारांची झिरपण झालेली आहे. ज्या नागवंशीय बौध्दांनी भारतच काय भारताबाहेरील अनेक देश बौध्दमय केले होते. त्यांचेच आजचे वारस भारताच्या आजच्या व्यवस्थेत गुलाम आहेत. ही गुलामी नष्ट करण्यासाठी देशातील ३७४४ ओबीसी जातींनी जे मुळ नागवंशीय आहेत त्यांनी आपल्या स्वगृही अर्थात बुध्द धम्मात येणे गरजेचे आहे. आरक्षणामुळे देशातील १८०० अस्पृश्य जातील व ओबीसीच्या ३७४४ जाती एकसुत्रात बांधता येणे शक्य आहे. त्यादिशेने उपरे यांनी बुध्द धम्मात येण्याची जाहीर केलेली वाट त्या दिशेने ऐतिहासीक अशीच आहे असे गौरवोद्गार कार्यक्रमाला उपस्थ्ति अनेक मान्यवरांनी काढले.

         प्रारंभी माजी सनदी अधिकारी मुंशीलाल गौतम यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. माजी आमदार अॅड. एकनाथ साळवे हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. आंबेडकरी विचारवंत व सम्यक प्रकाशन नवी दिल्ली येथील संचालक शांतीस्वरूप बौध्द यांनीही हिंदु मानसिकतेवर कडाडून हल्ला चढविला. त्यांनतर हनुमंत उपरे यांनी आम्ही हिंदू धर्म त्यागून स्वगृही अर्थात बुध्द धम्मात का येतो आहोत! या विषयावर मनोगत-विचार-विवेचन-अनुभव सभागृहाशी शेअर केले. आयोजनामागची भूमिका राहुल वानखेडे यांनी मांडली. संचालन अॅड. संजय पाटील यांनी केले. आभार राजेश वालदे यांनी मानले. दुसऱ्या सत्रात ज्या ओबीसी बांधवांनी बौध्द धर्मस्विकारला आहे त्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर उपस्थ्ति श्रोत्यांकडून विषयानुषंगाने प्रश्नोत्तरे झाली.

मी ओबीसी आहे, पण मला ते हक्कच मिळत नसतील तर मी का म्हणून ओबीसी रहावे. उच्चवर्णीय हिंदूच ओबीसी हिंदूच्या विकासाला आडवे येतात. त्यांची ‘वोट बँक’ विभागल्यावर त्यांना परिणाम कळतील त्यामुळे मी धर्मांतराचे हत्त्यार उपसले असल्याचे सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष हनुमंत उपरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सोमवारी सांगितले. बौद्ध धम्माच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे उपरे म्हणाले असले तरी प्रत्यक्ष धर्मांतराचा मुहूर्त ठरला नसल्याचे त्यांनी सांगितले.

      हनुमंत उपरे यांनी सत्यशोधक ओबीसी परिषदेच्या माध्यमातून राज्यभर ओबीसीचे नेटवर्क तयार केले आहे. ओबीसीच्या कुठल्याही कार्यक्रमात उपरे उपस्थित असतात. मात्र त्यांनी धर्मांतराची घोषणा करून एकच खळबळ उडवून दिली आहे. आतापर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर, उपराकार लक्ष्मण माने यांनी धर्मांतर करून बौद्ध धम्म स्वीकारलेला आहे. त्यांना जातीय व्यवस्थेचे प्रचंड चटके बसले होते.                   

    बौद्ध धम्माला न्याय देण्यासाठी व अस्पृश्यतेचा शिक्का पुसण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी प्रयत्न केले. आपल्याला अशा कोणत्या आणि किती अडचणी आल्या याबाबत विचारले असता ते म्हणाले की, मी केवळ ओबीसी असल्यामुळे प्राध्यापकीत कायम होऊ शकलो नाही, माझ्यासोबतचे सवर्ण प्राचार्य होऊन गेले. विमा प्रतिनिधी असताना मला पदोपदी जातीची जाणीव करून दिली जात होती. दत्त प्लास्टिक उद्योग उभारल्यानंतरही माझा माल विकला जात नव्हता. मला ‘सीड मनी’ सुद्धा मिळू नये यासाठी उच्चवर्णीयांनी प्रयत्न केले. पुढे जागतिकीकरण झाल्यामुळे माल विकला जाऊ लागला.आतापर्यंत ५00 ते ६00 लोकांशी मी चर्चा केली आहे. रिस्पॉन्स चांगला असून राज्यभर दौरा केल्यावर अनेकांची मते जाणून घेतल्यावर पुढील दिशा ठरविणार आहे. आम्ही सर्वांना सांगणार आहोत की आमचा धर्म हिंदू नाही. येथे आम्हाला हक्क मिळत नाहीत. मी आतापर्यंत हिंदू धर्माला ‘क्यूट’ केलेय. शत्रूच्या घरात प्रगती नसल्यामुळे कोंडमारा होण्यापेक्षा वेगळा मार्ग स्वीकारलेले कधीही चांगले राहिल, असे त्यांनी सांगितले..!!! 

1 comment:

  1. "आता ओबीसी बांधव बुध्द धम्माच्या वाटेवर... '

    ReplyDelete