My Followers

Wednesday 29 August 2012

देव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...!!!

देव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते.....!!!

Gadgebaba.jpgएका गावात एक नवीन मंदिर बांधण्यात आले. त्यानिमित्त गाडगेबाबांना कीर्तनासाठी बोलावण्यात आले. कीर्तन असे झालेः
 
गाडगेबाबा - गावात मंदिर बांधलं वाटतं, नाही रे ?

लोक - हो जी. गाडगेबाबा - आता काय करान? 

लोक - देव आणून बसपू जी. गाडगेबाबा - देव आनान कुठून?

लोक - बाजारातून. गाडगेबाबा - बाप्पाए, बाजारातून? इकत का फुकट?

लोक - इकत.गाडगेबाबा - बाप्पा, देव इकत भेटते? थो का मेथीची भाजी हाये का, कांदे-बटाटे होये बाजारात इकत भेटाले ? बरं आणला कत, मग काय करान ?

लोक - देवाची आंघोय करून देऊ जी. गाडगेबाबा - बाप्पा तुमच्या देवाले सोताची आंघोय नाही घालता येत? वा रे तुमचा देव ! बरं, मग काय करान ?

लोक - त्याच्यासमोर निवद ठेवू आन् काठी घेऊन बसू दरवाज्यात 

गाडगेबाबा - काहून?

लोक - एकादं कुत्रं येऊ नये आन् देवाच्या निवदाला खावू नये म्हणून जी. 

गाडगेबाबा - बाप्पा तुमच्या देवाले सोताच्या निवदावरलं कुत्रं नाही हाकलता येत, थो तुमच्यावर आलेलं गंडांतर कसं दूर करंन रे? म्हणून म्हनते, "देव देवळात नसते. देवळात पुजाऱ्याचं पोट असते.....!!!"

असे हे गाडगेबाबा उर्फ डेबूजी झिंगराजी जानोरकर, यांचा जन्म फेब्रुवारी २३१८७६ रोजी अमरावती जिल्ह्यातील शेणगाव येथे झाला. लहानपणापासूनच त्यांना डेबू किंवा डेबूजी म्हणत.
घरची परिस्थितीत्यामुळं मामाचीगुरं सांभाळणं नि शेतीची कामं करण्यातच त्यांच्या आयुष्याचा सुरुवातीचा काळ गेलाअशा बिकट परिस्थितीत शिक्षण तरी कसं घेता येणार ? मात्रकष्टाळू प्रवृत्तीमुळं ते शेतीचीकामंही अत्यंत चांगल्याप्रकारे करू लागलेशेतकरीकामकरी यांना किती कष्ट नि परिश्रमकरावे लागतात नि किती हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागतंयाचीही कल्पना त्यांना येत गेलीश्रमप्रतिष्ठेचं महत्त्व त्यांना कळलं  जनसामान्यांच्या वास्तव समस्या नि दु:खं त्यांनातीव्रतेनं जाणवली

एकदा त्यांच्या मुलीच्या बारश्याच्या दिवशी त्यांनी त्या काळातील परंपरेला छेद देवून रूढीप्रमाणे दारु व मटणाच्या जेवणाऐवजी गोडाधोडाचे जेवण देवून पारंपारिक रूढीवर पहिला  प्रहार केला होता.

दिनांक १ फेब्रुवारी, १९०५ रोजी त्यांनी घरादाराचा त्याग करून संन्यास स्वीकारला. त्यांनी तीर्थाटन केले, अनेक ठिकाणी भ्रमण केले. वनवासातही त्यांनी लोकसेवेचे व्रत सोडले नाही. कोठे कोणी अडचणीत सापडलेला असल्यास त्याला आपण होऊन मदत करायला धावायचे, मदत करून कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता आपल्या वाटेने निघून जायचे हा त्यांचा खाक्या असायचा. ते सतत एक खराटा जवळ बाळगायचे. अंगावर गोधडीवजा फाटके-तुटके कपडे आणि हातात एक फुटके गाडगे असा त्यांचा वेष असे. त्यामुळेच लोक त्यांना ‘गाडगेबाबा’ म्हणू लागले. ते ज्या गावात जात तो गाव झाडून स्वच्छ करीत. सार्वजनिक स्वच्छता,अंधश्रद्धा निर्मूलन ही तत्त्वे समाजात रुजविण्यासाठी त्यांनी स्वतः सातत्याने सक्रिय राहून जिवापाड प्रयत्न केले.

समाजातील अंधश्रद्धाकर्मकांडबुवाकाजीधर्माविषयीच्या चुकीच्याकल्पना यांच्या विरोधात समाजजागरण करायला हवंयाचीही त्यांना जाणीव होऊलागलीअशाप्रकारे त्यांच्या विचारांची जडणघडण बालपणापासूनच होत गेली.समाजजीवनाचं सूक्ष्म निरीक्षण  समाजाला योग्य शिकवण देऊन चांगल्यासुसंस्कृत,बुद्धिवादीविवेकनिष्ठसुसंस्कारयुक्त समाजाचं नवनिर्माण करण्याची आवश्यकताही त्यांनातीव्रतेनं भासलीयासाठी केवळ बघ्याची भूमिका घेऊन स्वस्थ बसणं गाडगेबाबांसारख्या सत्पुरुषाला आवडणं शक्यचं नव्हतं

समाजातील दारिद्र्य नि जातिभेदांमुळं निर्माण होणारी विषयतात्याचप्रमाणंदेवभोळेपणा हेच समाजाच्या कल्याणातले  प्रगतीतले अडसर आहेतते काढून टाकायलाहवेतया त्यांच्या मनातील विचार-बीजालाच पुढं अंकुर फुटले नि त्यांनी कीर्तनाच्यामाध्यमातून या कार्यास प्रारंभ केलादेव दगडात नसून माणसात असतोयासाठीच माणूसघडविणंहेच आपलं ब्रीद असायला हवंत्यासाठी शिक्षण घ्यायला हवंया मताचापुनरुच्चार त्यांनी वेळोवेळी केलाज्या दलितांच्या मुलांना शिक्षण मिळत नाही त्यांच्याशाळांसाठी आपल्या जागा दिल्याजागोजागी गरीबांसाठी धर्मशाळा बांधल्याकीर्तनाच्याप्रभावी माध्यमातून देव दगडात नसतो तर तो माणसात असतोत्या माणसाचीच आपणसेवा करायला हवी या बुद्धिप्रामाण्यवादी विचाराचे सुसंस्कार गाडगेबाबांनी सर्वसामान्यांवर केले.



तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी |" असे सांगत, "देवळात जाऊ नका, मूर्तीपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू  नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवर्षी, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेऊ नका." अशी शिकवण आयुष्यभर त्यांनी लोकांना दिली. माणसात देव शोधणार्‍या या संताने लोकांनी दिलेल्या देणग्यांतील पैशातून रंजल्या-गांजल्या, अनाथ लोकांसाठी महाराष्ट्रात ठिकठिकाणी धर्मशाळा, अनाथालये, आश्रम बांधले व विद्यालये सुरू केली. रंजले-गांजले, दिन-दुबळे, अपंग-अनाथ हेच त्यांचे देव. या देवांतच गाडगेबाबा अधिक रमत असत.

त्यांचे खरे सामर्थ्य कीर्तनात होते. वास्तविक संत गाडगेबाबा अडाणी होते, शिकलेले नव्हते. त्यांना आपली स्वाक्षरीसुद्धा करता येत नव्हती. पण त्यांच्या जिभेवर मात्र तुकोबांचे अभंग नाचत असत. त्यांचा वेशही साधाच होता. अंगावर फाटक्या चिंध्या, एका हातात खराटा आणि दुसर्‍या हातात मडक्याचे फुटके खापर घेऊन संत गाडगेबाबा गावोगावी कीर्तन करत फिरत असत.

ते ज्या गावात जात त्या गावातले रस्ते पहिल्यांदा खराट्याने साफ करत आणि रात्रीच्या वेळेला कीर्तनातून लोकांच्या डोक्यातील घाण साफ करत. एरवी कोणाशी न बोलणारे बाबा कीर्तनासाठी उभे राहिले की; शब्दांचा, साहित्याचा सद्विचारांचा असा काही मारा करत की; ऐकणारा मंत्रमुग्ध होत असे. मुखाने देवाचे नाव घेत गावोगाव बाबा फिरत, दिसेल त्या गावातील रस्ते, गटारे, देवालये, नद्यांचे घाट कोणाशीही न बोलताच ते स्वच्छ करू लागत. तसे करताना त्यांना पाहिल की , गावातील इतर माणसे आपापली कुदळ, फावडी, टोपल्या, खराटे घेऊन बाबांच्या मदतीला येत असत.

संत गाडगेबाबांनी जाणले होते की, समाजातील लोक अज्ञानी, अंधश्रद्धाळू आहेत. त्यांना दगडात परमेश्वर दिसतो, परंतु माणसातला देव दिसत नाही. भूत, भानामती, करणी, जादूटोणा यावर लोकांचा दाट विश्वास आहे. समाजात अनेक अंधश्रद्धा आहेत. भयाण दारिद्र्याची कारणे केवळ व्यसन व रोगराई नसून निरक्षरता, अंधश्रद्धा हीच आहेत. म्हणून रोग, गरिबी, अंधश्रद्धा यांच्याविरुद्ध गाडगेबाबा जन्मभर लढले. व्यसन संपले की गरिबी संपणार, व्यसन संपले की रोगराई संपणार म्हणून प्राण्यांची हत्या करू नका, कर्ज काढू नका, भोंदू गुरूकडून मंत्र घेऊ नका, हाच मंत्र गाडगेबाबांनी दिला. 

संत गाडगेबाबांनी आपले सारे आयुष्य समाजासाठी खर्ची घातले. त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी धर्मशाळा, गोरक्षण संस्था व शाळा- कॉलेजेस काधली. त्यांच्याजवळ पोथी नव्ह्ती. पूजा-अर्चा करा, असा उपदेश नव्हता. त्यांचे कीर्तन दु:खितांसाठी व अज्ञानासाठी होते. परखड कीर्तनातून सार्‍या महाराष्ट्राला उपदेश केला. अनेक धर्मशाळा बांधून यात्रेकरूंसाठी सोय त्यांनी केली. दु:ख , दारिद्र्य व अज्ञान दिसताच तिथे ते धावून जात. त्यांनी देशाला व समाजाला स्वच्छतेचा मूलमंत्र दिला. ' गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला' या भजनाने ते लोकांना मंत्रमुग्ध करत. 

संत गाडगेबाबा म्हणजे एक क्रांतिसूर्य होय. माणसाने माणसाला कमी लेखावे यासारखा अधर्म नाही. ब्राम्हणापासून महारापर्यंत सगळी माणसे एकच आहेत. ' कोंबडे- बकर्‍या खाणारा देव नसून सैतानच आहे' हे बाबांचे मत. गाडगेबाबा म्हणजे मानवतावादी स्वाभिमान शिकवणारे अदभूत संत! भोळ्याभाबड्या लोकांच्या मनातून अंधश्रद्धा दूर करण्याचे महत्त्वाचे कार्यही त्यांनी केले ते म्हणतात,' देव देवळात नाही, दगडात नाही. माणसात आहे.' पन्नास वर्षे गाडगेबाबांनी लोकांना आवर्जून सांगितले की, बाबांनो, दगडधोंड्यांची पूजा करून काहीही मिळणार नाही. माणसांची पूजा करा. मानवतेची पूजा करा.

बाबांचे कीर्तन अशिक्षितांसाठी होते. तसेच तथाकथित सुशिक्षितांसाठीही होते, दु:खितांसाठी होते. त्यात योग नव्हता, अध्यात्मवाद नव्हता, पोथी नव्हती, पुराण नव्हते, देवांची वर्णने नव्हती, त्यात पूजा-अर्चा यांचा उपदेश नव्हता. त्यात शुद्ध जीवन होते. हजारो वर्षे समाजाच्या आर्थिक सत्तेखाली आणि धार्मिक रुढीखाली भरडून निघालेल्या दूधखुळ्या, भोळ्या आणि हीन-दीन समाजांच्या उद्धाराचा धगधगीत प्रकाशझोत म्हणजेच गाडगेबाबांचे कीर्तन.

बाबा म्हणजे माणसात देव पाहणारा मानवतापूजक संतश्रेष्ठ. अमरावती येथे गाडगेबाबांच्या जन्मशताब्दी समारोहात मदर तेरेसा म्हणाल्या, 'परमेश्वराने संत गाडगेबाबांसारख्या व्यक्ती निर्माण करून मानवतेवर अनंत उपकार केले आहेत.' मात्र मानवतावादी गाडगेबाबांकडे आणि त्यांच्या परखड तत्त्वज्ञानाकडे म्हणावे तसे देशाने, त्यांच्या अनुयायांनी, लोकांनी आणि इतिहासानेही लक्ष दिल्याचे दिसत नाही.

अशा या मानवतावादी युगप्रवर्तक संताबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,' ते खरे संत आहेत. इतर बुवांपेक्षा गाडगेबाबांसारखे संत आपल्या देशात अधिक  झाले पाहिजेत. त्यांना तुमच्या धनाची, मानाची पर्वा नाही. त्यांना समाजपरिवर्तनाचा विचार श्रेष्ठ वाटतो, तेच खरे मानवतादी संत आहेत.'

रंजल्या-गांजल्यांना 'आपुले' म्हणणारा आणि अनाथ -अपंगांना हृदयाशी धरणारा तो खरा साधू ही तुकोबांची व्याख्या गाडगेबाबांना तंतोतंत लागू पडते. बाबानी आपल्या उपदेशात म्हटले की,
"बाबांनो, दया हा जगातल सर्वात मोठा धर्म आहे.' 
कबीर कहे कमालकू सबसे बडी दया |
तीर्थ जावो, काशी जावो, चाहे जावो गया ||


"देव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते" सदा सर्वदा सामान्य जनतेचे  प्रबोधन  करण्याऱ्या, अशा या महामानव युगप्रवर्तकाची प्राणज्योत २० डिसेंबर १९५६ रोजीच्या रात्री मावळली. 

अँड. राज जाधव...!!! 
(संदर्भ - विकिपीडिया, मान्यवरांचे ब्लोग, गाडगे बाबांवरील पुस्तके, लेख )  

6 comments:

  1. देव देवळात नसते, देवळात पुजाऱ्याचं पोट असते...!!! Nice...

    ReplyDelete
    Replies
    1. वा खूप छान

      Delete
    2. सर्व संतानी माणसांच्या डोक्यातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी आयुष्य वेचले; पण शिक्षण घेऊनही ही अंधश्रद्धा अजूनही दूर झाली नाही. जगातील लोकसंख्येच्या तुलनेत भारतीय लोकं शिक्षण घेऊन सर्वाधिक अंधश्रद्धालू आहेत म्हणून भारत अजूनही कितीतरी वर्षे प्रगतशील राष्ट्र राहील ; पण प्रगत राष्ट्र बनू शकला नाही.

      Delete
  2. बाबांनो, दया हा जगातल सर्वात मोठा धर्म आहे.'

    ReplyDelete
  3. तुम्ही स्वतः दैववादी आहात. कारण तुम्हीच तुमच्या ब्लॉग मध्ये तस लिहिलं आहे. गाडगेबाबा ईश्वर वादी नव्हते असं तुम्हीच सांगता आणि परमेश्वराने ..... असंही तुम्हीच म्हणता

    ReplyDelete