My Followers

Friday 17 August 2012

संदेश - बाबासाहेबांचा....!!!

संदेश -  बाबासाहेबांचा....!!! 


हिंदू धर्मात व्यक्तीला काहीही स्थान नाही. हिंदू धर्माची रचना कल्पनेच्या आधारावर आहे. एक माणसाने दुसऱ्याशी कसे वागावे याची शिकवण हिंदू धर्मात नाही. एका वर्णाने दुसऱ्या वर्णाशी कसे वागावे याची बंधने हिंदू धर्मात आहेत. 

व्यक्तीच्या जीवनाला समाजाची जरी आवश्यकता असली तरी समाजाची धारणा हे धर्माचे अंतिम ध्येय होऊ शकत नाही. व्यक्तीचा विकास हे धर्माचे खरे ध्येय आहे.

माणूस हा समाजाचा एक घटक असला तरी त्याचा आणि समाजाचा संबंध शारिर आणि अवयव, गाडा आणि त्याचे चाक यांचा जसा संबंध आहे, तसा न्हवे. पाण्याचा थेंब समुद्रात टाकला कि त्याचा लोप होतो. तसा माणसाचा  तो केवळ समाजात राहिला म्हणून लोप होऊ शकत नाही. त्याचे जीवन स्वतंत्र असते. त्याचा जन्म सेवेकरताच नसून आत्योन्नती साठी आहे. म्हणून सुधारलेल्या राष्ट्रात एका माणसाला दुसऱ्या माणसाला आपला गुलाम करून ठेवता येत नाही. म्हणून "ज्या धर्मात व्यक्तीला प्राधान्य नाही तो धर्म मला मान्य नाही."   
  
वरील बाबासाहेबांचा संदेश वाचून म्हणावेसे वाटते - "त्या’ सूर्योदयावर होता बाबासाहेबांचा संदेश...नि सूर्यास्तावर होती बाबासाहेबांची सही....!!!"
अँड.राज जाधव

No comments:

Post a Comment