My Followers

Friday, 3 August 2012

चला निषेध नोंदवूयात....!!!

चला निषेध नोंदवूयात....!!! 
बुधवारी साखळी बॉम्बस्फोटामुळे पुणे हादरून गेलं…त्या स्फोटानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत…हे ब़ॉम्बस्फोट कुणी आणि का केले ? पुणे बॉम्बस्फोटांमागचा मास्टर माईंड कोण आहे ?
त्यांनी बॉम्बस्फोटासाठी सायकलचा वापर का केला असे अनेक प्रश्न अद्यापही अनुत्तरीत असून  मुळचा खरा खुरा प्रश्न आहे... पुण्याचे गुन्हेगार कोण ?  बॉम्बस्फोट घडवणारे कि घडू देणारे ?
       बुधवारी पुण्यात साखळी बॉम्बस्फोट झाले….त्या प्रकरणाचा आता पोलिसांकडून तपास केला जात आहे…या बॉम्बस्फोटात जखमी झालेला दयानंद पाटील याचीही कसून चौकशी केली जातं आहे…तसेच सायकल विक्रेत्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस आरोपींपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत..
तारीख : 1ऑगस्ट 2012
ठिकाण :बालगंधर्व रंगमंदिर,पुणे
वेळ : 7.30 वा.
बालगंधर्व रंगमंदिराच्या मागच्या गेटजवळ पहिला स्फोट झाला…या स्फोटाची तिव्रता मोठी नसली तरी त्यामध्ये दयानंद भाऊराव पाटील हा जखमी झाला… एका क्षणात तिथलं सगळं चित्रच बदलून गेलं होतं….
ठिकाण : मॅक्डोनाल्ड वेळ
:7.35 वा
जंगली महाराज रोडवरील मॅक्डोनाल्ड समोरच्या कचरा पेटीत स्फोट झाला… मात्र या स्फोटात कोणीही जखमी झालं नाही..
ठिकाण :देना बँक
वेळ :7.45
जंगली महाराज रोडवर असलेल्या देना बँके समोर उभ्या केलेल्या एका सायकलवर स्फोट झाला…हा स्फोट होतो न होतो तोच स्फोटाची आणखी एक घटना घडली…
ठिकाण :गरवारे पूल
वेळ :8.25
पुण्यातल्या जंगली महाराज रो़डवर बुधवारी एकपाठोपाठएक स्फोट झाल्यामुळे पुणे शहर अक्षरश: हदरुन गेलं होतं…

  स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला…ज्याठिकाणी स्फोट झाला होता त्या ठिकाणची बॉम्बशोध पथकाने पहाणी केली…
     अवघ्या पाऊन तासात शहरात एकाच रस्त्यावर चार ठिकाणी स्फोट झाले होते…या स्फोटांची बातमी वा-यासारखी शहरभर पसरली त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं…. चार ठिकाणी झालेल्या स्फोटांची तिव्रता जरी कमी असली तरी ते अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आले होते….
      चारपैकी तीन स्फोटांसाठी सायकलचा वापर करण्यात आला होता.. पुण्यातल्या कसबा पेठेतून त्या सायकल्स विकत घेण्यात आल्या होत्या… त्यापार्श्वभूमीवर क्राईम ब्रांचच्या टीमकडून कसबा पेठेतल्या साय़कल विक्रेत्यांची कसून चौकशी केली जातेय….तसेच बालगंधर्व परिसरात स्फोटात जखमी झालेल्या दयानंद पाटीलचीही चौकशी केली जातेय… पाटील हा पुण्यातल्या उरूळी कांचन भागातील रहीवासी असून त्याच्या जवळ असलेल्या पिशवीत बुधवारी रात्री स्फोट झाला होता…दयानंद पाटीलच्या जबाबात विसंगती आढळून आल्यामुळे त्याची सखोल चौकशी करण्यात येत असल्याचं पोलीस सुत्रांनी सांगितलंय…दयानंद पाटील हा मुळचा कर्नाटकचा रहिवासी असून तीन वर्षांपासून तो पुण्यातील उरळी कांचन भागात वास्तव्याला आहे…या प्रकरणी दयानंदच्या पत्नीचीही चौकशी करण्यात आलीय….या स्फोटाच्या मालिकानंतर एटीएस बरोबरच एनआयए आणि एनएसजीच्या टीम्सही पुण्यात दाखल झाल्या असून त्यांच्याकडूनही तपास केला जात आहे…
    पुणे साखळी बॉम्बस्फोटाचा वेगाने तपास केला जातोय..बॉ़म्बस्फोटासाठी काही ठरावीक वस्तूंचा वापर करण्यात आल्याचं तपासात आता उघड झालंय…तसेच ज्यांनी सायकल खरेदी केली होती त्यांची रेखाचित्रही तय़ार केली जात आहेत… त्यामुळे पोलिसांच्या तपासाल दिशा मिळणार आहे… 

दोन वर्षांपूर्वी कोरेगाव पार्कमधील जर्मन बेकरीमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटामुळे पुण्यासारखे शांत शहर दहशतवाद्यांचे टार्गेट झाल्याचे स्पष्ट झाले होते. शहराच्या मध्यवस्तीत दगडूशेठ गणपती मंदिरात बॉम्बस्फोटघडविण्याचा कट फसल्यानंतरही साखळी बॉम्बस्फोटामुळे जंगली महाराज रोडसारखा अगदी मध्य पुण्यातील परिसर दहशतवाद्यांचे टार्गेट ठरल्याचे स्पष्ट होत आहे. 
     जर्मन बेकरी ते जंगली महाराज रोड या दोन वर्षांच्या काळात आतापर्यंत केवळ हिमायत बेग या एकाच आरोपीला अटक करणे पोलिसांना शक्य झाले आहे. संशयित म्हणून अटकेत असलेल्या कातिल सिद्दीकीचा येरवडा जेलमधील अंडा सेलमध्ये गळा आवळून काही दिवसांपूर्वी खून करण्यात आला. 

    जर्मन बेकरी येथे १३ फेब्रुवारी २०१० रोजी झालेल्या बॉम्बस्फोटात १७ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर ६४ जण जखमी झाले. जर्मन बेकरी येथे बॉम्बस्फोट झाला त्याच दिवशी दगडूशेठ हलवाई मंदिर उडविण्याचा दहशतवाद्यांचा डाव होता. मंदिर परिसरातील फुलवाल्याच्या सतर्कतेमुळे हा डाव उधळला गेला होता. या प्रकरणी अटक केला गेलेला संशयित दहशतवादी कतिल सिद्दीकीच्या पोलिस कोठडीतील तपासात त्याने दगडूशेठ मंदिराची रेकी केल्याचे तसेच जर्मन बेकरी येथे बॉम्बस्फोट झाला त्याच दिवशी बॉम्ब असलेली बॅग ठेवण्याचा प्रयत्न केल्याचे निष्पन्न झाले होते. 

       येरवडा जेलमध्ये अंडासेलमध्ये असलेल्या कतिल सिद्दीकीचा काही दिवसांपूर्वी गळा आवळून खून करण्यात आला. सिद्दीकीकडून पोलिसांना बॉम्बस्फोटासंदर्भात आणखी धागेदोरे मिळण्याची शक्यता होती. 
जर्मन बेकरी बॉम्बस्फोटामुळे शांत शहराची ओळख पुसली गेली. पुण्यावर परत कधीही हल्ला होऊ शकतो अशी धाकधुक असतानाच बुधवारी पुन्हा एकदा पुणे टार्गेट झाले.
      आणि मनात आले, काल मुंबई, आज पुणे... उद्या....? तुम्ही काळजी घ्या ! आपण करणार तरी काय? टीव्ही वर बातम्या पाहणार, याला त्याला फोन करणार बातमी पहिली का रे हे विचारणार ? फेसबुक वर निषेध नोंदवणार... जास्तीत जास्त मेणबत्त्या घेऊन मार्च काढणार. मग याच्या व्यतिरिक्त आपण करावे तरी काय   ? असा तुमचा माझा उलट सवाल असेलच, पण आपण ज्या षंढ लोकांना निवडून दिलेत त्या षंढ लोकांना खडसावून  कधी विचारणार... त्या १० कोटीच्या सी. सी. टीव्ही चे काय झाले ?  का नाही सगळे  सी. सी. टीव्ही बसवले ? जे बसविले ते बंद का ? गृहमंत्री बदलतात, सरकार बदलते, मंत्री बदलतात,  मग हे चित्रच का नाही बदलत ? मग विचारताय ना, या येत्या निवडणुकात या षंढ लोकांना जाब ?  तूर्तास जे आपण मनापासून करू शकतो ते काम करूयात...चला तर मग पुन्हा एकदा निषेध नोंदवूयात  ? 
या भ्याड हल्ल्याचा सामान्य पुणेकराकडून जाहीर निषेध...!!! या अकार्यषम व्यवस्थेचा जाहीर निषेध...!!!  माणुसकीला काळिमा फासणाऱ्या माणसात जन्मलेल्या त्या दहशतवादी नावाच्या  राक्षसाचा जाहीर निषेध...!!!   

No comments:

Post a Comment