My Followers

Tuesday, 14 August 2012

भारतीय राष्ट्रध्वज....!!!

भारतीय राष्ट्रध्वज....!!!


उत्सव तीन रंगाचा ,
आभाळी आज सजला ,
नतमस्तक मी या सर्वांसाठी ,
ज्यांनी भारत देश घडविला,
भारत देशाला मनाचा मुजरा...


उद्या १५ ओगस्ट २०१२ रोजी भारताला स्वतंत्र मिळून ६६ वर्षे होतील, खरतर देश स्वतंत्र होऊन अनेक 66 वर्षे लोटली आजही अनेक समस्या ना तोंड द्यावं लागतंय. त्याविषयी आपण पुन्हा कधी चर्चा करू, तर दर १५ ओगस्ट  ला आपण लहानपानापासून अगदी शाळेत असल्यापासून स्वतंत्र दिन मोठ्या आनंदात साजरा करतो, मोठ्या इमाने इतबारे आपण आपला राष्टीय ध्वज "तिरंगा" वर आकाशात फडकवतो,   पण आपणास माहित आहे का ? हा "तिरंगा " आपल्या राष्ट्रीय ध्वज आपला जीव कि प्राण, कसा आणि कधी संमत झाला, तर तर मग या स्वातंत्रदिनाच्या निमित्ताने जाणून घेवूयात आपल्या राष्ट्रध्वज....... "तिरंगा"...!!!  
मादाम कामा या राष्ट्रभक्त भारतीय महिलेने २२ ऑगस्ट १९०७ रोजी जर्मनीमध्ये स्टगार्ट येथे भरलेल्या समाजवाद्यांच्या जागतिक मेळाव्यात स्वकल्पनेने तयार केलेले एक तिरंगी निशाण भारताचा राष्ट्रध्वज म्हणून सादर केले. या निशाणात हिरवाकेशरी व तांबडा असे तीन आडवे पट्टे  होते. भारताचे राष्ट्रीय फूल समजल्या जाणाऱ्या  कमळाची आठ चित्रे हिरव्या पट्ट्यातवंदेमातरम् ही अक्षरे केशरी पट्ट्यात आणि हिंदुमुसलमानांची प्रतीके म्हणून अनुक्रमे सूर्य व चंद्र यांची चित्रे तांबड्या पट्ट्यातअसा या ध्वजाचा एकूण साज होता. अशा प्रकारचा ध्वज खुद्द भारतात मात्र कधीच वापरला गेला नाही. १९१६ साली होमरूल चळवळीचे भूखंड म्हणून ॲनी बेझंटलो. टिळक आदींना अटकेत ठेवले असताना त्यांनी पाच तांबडे व चार हिरवे पट्टे असलेला वरच्या डाव्या कोपऱ्यात युनियन जॅकत्याखाली सात तारे व उजवीकडे चांद अशी चिन्हे धारण करणारा राष्ट्रध्वज तयार करून फडकविला. सरकारी अधिकाऱ्यांनी अर्थातच तो फोडून टाकला १९१७ सालच्या कलकत्ता काँग्रेसमध्ये अधिकृत राष्ट्रध्वज ठरविण्यासाठी  एक समिती स्थापन करण्यात आली. 
                                                    
त्यानंतर १९२० पर्यंत काँग्रेसच्या अधिवेशनात ध्वजाबद्दल चर्चा होऊनही निश्चित निर्णय झाला नाही. यंग इंडियाहरिजन या नियतकालिकांतून त्यांनी वेळोवेळी लेख लिहून राष्ट्रध्वजाबाबत मतप्रदर्शन केले. मच्छलीपटनम् शहरातील एक प्राध्यापक पी. व्यंकय्या यांनी गांधीजींच्या सूचनेप्रमाणे ध्वज तयार केला. जलंदरचे लाला हंसराज यांनी सदर ध्वजावर चरखा असावाअशी केलेली सूचना गांधीजींना व इतरांना अर्थपूर्ण वाटली. हा तिरंगी ध्वज खादीचा असून त्यात तांबडाहिरवापांढरा या रंगांचे आडवे पट्टे व त्यांवर गर्द निळ्या रंगाचा चरखा होता. सर्व धर्मीयांच्या एकतेचे प्रतीक असा हा झेंडा असा त्याचा अर्थ लावण्यात आला. हिंदूंचा तांबडामुसलमानांचा हिरवा आणि इतरांचा पांढरा अशी रंगांची वाटणी होती. रंगांना जातीय स्वरुप आल्याने शिखांनी आपला प्रतिनिधी म्हणून काळ्या रंगाचाही पट्टा असावा अशी जाहीर मागणी केलीती मान्य मात्र झाली नाही. १९१२१ पासून हा तिरंगा स्वातंत्र्य चळवळीत राष्ट्रीय निशाण म्हणून पुढे आला. नागपूर व इतरत्र झालेले ध्वजसत्याग्रह खूप गाजले. १९३१ साली केशरीपांढराहिरवा हे रंगपट्टे धर्माचे द्योतक नसून ते अनुक्रमे त्याग-धैर्यसत्य-शांतताप्रेम-विश्वास या गुणांची प्रतिके आहेतअसे जाहीर करण्यात आले.


 
"२२ जुलै १९४७रोजी संविधान समितीनेभारताचा राष्ट्रध्वज निश्चित केला. त्या संबंधीचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडला.  एकाला एक लागून असलेल्या आडव्या समान प्रमाणाच्या तीन पट्ट्यांचा तो आहे. वरती गर्द केशरीमध्यभागी पांढरा आणि खालच्या बाजूला गर्द हिरवाअशा क्रमाने हे तीन रंग आहेत. मधल्या पांढऱ्या  पट्ट्यावर निळ्या रंगाचे धर्मचक्र असून ते सारनाथ येथे आढळलेल्या सिंहमुद्रेवर असलेल्या अशोकचक्रासारखे हे. चक्राला २४ आरे आहेत. डॉ. एस्. राधाकृष्णन् यांनी भारतीय राष्ट्रध्वजाच्या एकूण रचनेचे महत्त्व चांगल्या प्रकारे विशद केले आहे. त्यांच्या विवेचनाप्रमाणे केशरी रंग किंवा भगवा रंग हा त्यागाचा द्योतक आहेपांढरा रंग प्रकाशाचा आणि सत्यमार्गाचा प्रतिनिधी आहेतर हिरवा रंग मानवाचे निसर्गाशी वा भूमीशी असलेले नाते दर्शवितो. धर्म आणि सत्य हे भारताच्या राष्ट्रध्वजाखाली काम करणाऱ्याचे शास्ते असावेतजीवन गतिमान असावे व भारतीयांनी शांततापूर्णतेने आगेकूच करावी असे धर्मचक्र दर्शविते. मूलतः हे चक्र विश्वशांतीचा संदेश देणाऱ्या बौद्ध धर्माचे धर्मचक्र आहे. त्याला अशोकचक्रʼ या नावाने ओळखले जाते. त्यात भारतीय कलातत्त्वज्ञानइतिहास व संस्कृती यांचा सुरेख संगम झालेला दिसतो. धर्मचक्र प्रवर्तनायʼ हे घोषवाक्य भारतीय संसद सभापतीच्या स्थानाच्या शिरोभागी लिहिलेले आहे.

आपणा सर्वांना स्वातंत्र दिनाच्या अँड.राज जाधव तर्फे हार्दिक शुभेच्छ्या...!!!

(मित्रानो आपणास कळकळीची विनंती...मित्रानो बऱ्याचदा आपण पाहतो की स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन झाल्यानंतर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी रस्त्यावर,पार्किंग मध्ये,शाळेबाहेर अशा बऱ्याच ठिकाणी आपला राष्ट्रध्वज फाटलेल्या,चिखलात खराब झालेल्या,भिजलेल्या अवस्थेत पडलेला असतो.पण नेहमी बघतो आणि सोडून देतो,पण आता पासून असे करू नका, जर अशा अवस्थेत ध्वज दिसला की तो उचला,साफ करा आणि आपल्याकडे जमा करा आणि हे सर्व आपल्या मित्रांना पण सांगा, तसेच तुमच्या समोर कोणी ध्वज खाली फेकत असेल तर भारतीय नागरिक म्हणून त्याला यापासून थांबवा,या सर्वाला आपण जास्तीत जास्त साहाकार्य कराल अशी अपेक्षा ठेवतो, आपल्या राष्ट्रध्वजाचा अपमान तो आपला अपमान...!!!)

No comments:

Post a Comment