My Followers

Tuesday, 26 June 2012

थोडीशी गम्मत केली रे....!!!

 थोडीशी गम्मत केली रे....!!!
वा रे वा मराठी हुशारी...!!!

एकदा बिल गेट्स मायक्रोसॉफ्ट साठी नवा चेअरमन शोधायचा असतो..!!!

तो तशी पेपरात एड देतो...!!!
५००० जन इंटरव्यूसाठी येतात...!!

त्यातला एक असतो आपला “प्रमोद ”

बिल गेट्स :धन्यवाद आल्याबद्दल
(आता बिल गेट्स हे सर्व इंग्लिश मध्ये बोलतो पण मी ट्रान्सलेट करून लिहीत आहे समजदार समजून जातील)

ज्यांना कोणाला “जावा” लेन्ग्वेज येत नाही त्यांनी रूम सोडावी...!!!

लगेच २००० लोक कमी होतात...!!

प्रमोद (मनातल्या मनात):मला “जावा” तर येत नाही पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!

बिल गेट्स:ज्यांना कोणाला १०० लोक एकाचं वेळेस मेनेज करायचा अनुभव नसेल त्यांनी रूम सोडावी...!!!

लगेचच २००० लोक बाहेर जातात..!!

प्रमोद (मनातल्या मनात):मी कधीच कोणाला मेनेज केले नाही पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!
आणि तो थांबतो...!!!

बिल गेट्स: ज्या कोणाजवळ एम.बी.ए. डिग्री नाही त्यांनी बाहेर जावे...!!!

लगेचच ५०० लोक बाहेर जातात...!!!

प्रमोद (मनातल्या मनात):मी शाळा १५ वर्षांचा असतांनाच सोडली पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!

आणि शेवटी
बिल गेट्स:ज्यांना कोणाला सेब्रो कोट ही भाषा बोलता येत नाही त्यांनी बाहेर जावे...!!!

मग काय ४९८ लोक निघून जातात...!!!

प्रमोद (मनातल्या मनात):मला सेब्रो कोट भाषेतील एकाही शब्द येत नाही पण माझ्या जवळ गमवायला काय आहे...??? मी थांबतो आणि प्रयन्त करतो...!!!
आणि तो थांबतो...!!!

आणि शेवटी प्रमोद आणि फक्त एक जन तेथे शिल्लक राहतो...!!!

बिल गेट्स त्या दोघांजवळ येतो आणि बोलतो,तुम्हा दोघांना फक्त सेब्रो कोट ही भाषा येते तर बोला एकमेकांशी...!!!

शांतपणे प्रमोद वळतो आणि बाजुच्याला विचारतो...!!

प्रमोद :कुठून आला आहेस...???

तो दुसरा हळूच हसत बोलतो....
.
.
“महाराष्ट्रातून”

 कोंबडी कोणी पळवली…???

मनमोहन सिंग – कोंबडी चोरीच्या घटनेची मी कठोर शब्दात निंदा करतो. सर्वांना मी शांततेचे आवाहन करतो.

पी. चितंबरम - यात परकीय शक्तींचा हात आहे का? याची तपासणी चालू आहे.

दिग्विजयसिंह – कोंबडी पळवण्याच्या मागे संघाचा हात आहे.

अण्णा हजारे – जर कोंबडी आणि कोंबडी चोर हे हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत सापडले नाही तर, मी पुन्हा ‘आमरण उपोषणाला’ बसेन.

रामदेवबाबा – कोंबडी पळवणे म्हणजे देशद्रोह आहे. अरे! जर कोंबडी सापडली नाही. तर अंडी कोठून मिळणार? आणि देश स्वस्थ कसा राहणार?

अटलबिहारी वाजपेयी – कोंबडी पळवणे… ही.. चांगली गोष्ट नाही. मी सरकारला… अनुरोध.. करेन की…. त्यांनी लवकरात लवकर… त्या कोंबडी चोराचा छडा.. लावावा.

अजित पवार – मी कोंबडी पळवली नाही. माझ्या वाटेला जाल तर याद राखा.

लालू प्रसाद यादव – अरे मुर्गी थो चोरी हुई है न! मिल जायेगी| भेस थोडी है जो नीतीस के घर जायेगी....!!!

राज ठाकरे – जर कोंबडी मराठी असेल तर, कोंबडी चोराला तंगडी धरून लंगडी घालायला लावल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

उद्धव ठाकरे – गेल्या चाळीस वर्षापासून आम्हीच कोंबडी चोरीचा मुद्दा मांडत आलो आहोत. इतरांनी नाक खुपसू नये.

आर आर पाटील – मोठ्या शहरात अशा छोट् छोट्या घटना घडत असतात. परंतु, कुणीही कायदा हातात घेऊ नये..

(आंतरजालावरून साभार)

"ट्रक किंवा रिक्शाच्या मागील सुविचार....! जय हो..!"

1) "बघतोस काय ? मुजरा कर .....!"
2) बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केलय वाघाने!
3) "बघ माझी आठवण येते का ?"
4) ''पाहतेस काय प्रेमात पडशिल''
5) साधू नाही झालात तरी चालेल. संत नाही झालात तरी चालेल. पण माणूस व्हा माणूस.
6) अं हं. घाई करायची नाही तुम्च्या हॉर्नने सिग्नल बदलत नाही
7) तुच आहेस तुझ्या जेवणाचा शिल्पकार..'
8) 'अहो, इकडे पण बघा ना...'
9) "हे ईश्वरा सर्वांचं भलं कर..... पण सुरुवात माझ्यापासुन कर".
10) थांब लक्षुमी कुंकू लावते!
11) तुमचे लक्ष आमच्याकडे का?
12) "लायनीत घे ना भौ"
13) चिटके तो फटके!
14) राजे तुम्हि पुन्हा जन्माला या
15) अयोध्या,बेळगाव्,कारवार्,निपाणि,इंदौर्,गुलबर्गा,न्यू जर्सी,ह्युस्टन,सॅन्टा, सनिव्हेल, फ्रिमॉन्ट्, हेवर्ड,बिजिंग ह्यांच्यासह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे.
16) १३ १३ १३ सुरूर !
17) "नाद खुळा"
18) "हाय हे असं हाय बग"
19) आई तुझा आशिर्वाद.
20) "सासरेबुवांची कृपा "
21) "आबा कावत्यात!"
22) पाहा पन प्रेमाणे
23) नवतीचा नखरा, गुलजार पाखरा, खरा न धरा, भैरोबा-भैरोबा स्मरा.
24) "हे तुम्हाला वाचता येत असेल तर तुम्ही फार जवळ आलेला आहात!"
25) अच्छा, टाटा, फिर मिलेंगे.
26) हरी ओम हरी, श्रीदेवी मेरी...
27) योग्य अंतर ठेवा वाहनामध्ये ...आणि ...मुलांमध्ये..
28) वाट पाहिन पण एस टी नेच जाईन.
29) गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी
30) हेही दिवस जातील
31) नाद नाही करायचा ढाण्या वाघाचा
32) घर कब आओगे?
33) १ १३ ६ रा
34) सायकल सोडून बोला
35) हॉर्न . ओके. प्लीज
36) "भीऊ नकोस, मी तुझ्या पुढे आहे"
37) एका एस. टी. च्या मागे (बहुधा ट्रक ड्रायव्हर्स ना उद्देशून)
38) तुमच्या वाहनात ऊस, कापूस, कणसं
39) माझ्या वाहनात लाख मोलाची माणसं याचा विचार करून गाडी चालवा
40) बाकईच्या मागे सापडलेली काही वाक्ये--
सुसाईड मशिन
मिसगाईडेड मिसाईल
मॉम सेज नो गल्स
41) एका ट्रक च्या मागे लिहले होते:
राजू, चिंटू , सोनू ....!
अणि खाली लिहले होते .....
बैंक ऑफ़ महाराष्ट्र याच्या सौजन्याने !
42) एका टेम्पोच्या मागे लिहिलेले: "मझाशी पैज लाऊ नाका लय भरी पडेल"
खाली लिहिले होते....
"ड्रायवर शिकत आहे" (बारीक़ अक्षरात)
43) अजस्त्र डंपरच्या पाठीमागे
उगीच हॉर्न वाजवू नये, तुला चिरडायला एक सेकंद पुरेल
44) एका टेम्पोच्या मागे..
आलात आनंद, बसलात अत्यानंद, उतरलात परमानंद! 
(आंतरजालावरून साभार)

एक विनोद, निखील वागळे साहेबांनसाठी.....!!!

एकदा वागळे साहेब आजचा सवाल संपऊन घरी येतात घरातले वातावरण गरम दिसते श्रिमती रागावलेल्या असतात,
श्रिमती : रोज राञी 12 , 1 वाजतात यायला तुम्हाला, आमची तर काही काळजीच नाही बुवा जेव्हा बघाव तेव्हा हातवारे करत बातम्या देता राञी झोपत पण भाई 1 मिनिट थांबा, चांदुलकर पुर्ण करा, अण्णा बोला बोला, मेधा ताई याच ऊत्तर द्या अशी नाव घेता माणसाला झोप म्हणुन येऊ देत नाही

वागळे(हातवारे करत)
काय मागण्या आहेत आपल्या ?
यावर आपणाला शांततेच्या मार्गाने उपाय काढता येणार नाही का ?

श्रिमती
मलाही वाटते तुम्ही कधी तरी प्रेमाचे दोन शब्द बोलावे माझ्याशी, एखादी छानशी चारोळी लिहावी माझ्यासाठी, पण तुमच आपल फक्त आँफिस आणि बातम्या हं हं हअअअअअअ

वागळे
ठिके, अहो तुम्ही रडु नका
यावर उपाय आहे
मला उत्तर देऊ द्या
ब्रेकवर जाण्यापुर्वी माझा प्रश्न पहा
घरातील लोकांना मि वेळ देत नाही हा आरोप योग्य आहे का ?
होय म्हणतात 99 टक्के लोक,
जनता श्रिमतीच्या बाजुने आहे ब्रेकवर जाणापुर्वी माझे ऊत्तर देखील ऐका, श्रिमतीजीँसाठी एक चारोळी,

तेरे प्यार मेँ लिखे मेँने हजारे खत
ते रे
तेरे
तेरे प्यार मेँ लिखे मेँने हजारे खत
.
..
.
अचुक बातमी ठाम मत पहा फक्त आयबीयन लोकमत...!!!

(साभार - अशक्य पांचट
)

आपल्या लाइफसाठी काही खास म्हणी.....!!!

राहायला नाही घर म्हणे लग्न कर...              

सासू क्लबमध्ये सून पबमध्ये...                  

खिशात नाही डोनेशन, घ्यायला      चालला ऍडमिशन...!!!

चुकली मुलं सायबरकॅफेत 

चुकल्या मुली ब्युटीपार्लरमध्ये !!! 
  
नाजुक मानेला मोबाईलचा आधार   
  
जागा लहान फ़र्निचर महान !!!!!

ज्या गावचे बार, त्याच गावचे हवालदार !!!!!

उचलला मोबाइल लावला कानाला

रिकाम्या पेपरला जाहिरातींचा आधार

काटकसर करून जमवलं, इन्कम टॅक्समध्ये गमावलं

मनोरंजन नको रिंगटोन आवर.

स्क्रीनपेक्षा एसएमएस मोठा.

रोगी सलामत तो, तपासण्या पचास

एकमेका कॉपी देऊ , अवघे होऊ उत्तीर्ण

डॉक्टर, वकील, तलाठी आप्पा, तुमचे दर्शन नको रे बाप्पा

लाच खाणार, त्याला सीबीआय नेणार

घरोघरी फॅशनेबल पोरी.        

गरज सरो आणि मतदार मरो

कॉल आला होता पण नोकरी आली नव्हती.

सचिनची शंभरी आणि क्रिकेटची पंढरी

मरावे परी व्हिडिओरूपी उरावे.

घाल खादी, नि हो नेता

नाव सागर, डोक्यावर घागर 
   मुलं करतात चॅनेल सर्फ़, आईबाप करतात होमवर्क !!!

पुरुषाचा जन्म कित्ती छान.....!!!
महिलांनो, विचार करा पुरुषाचा जन्म किती सुखाचा! तुम्ही पुरुष असलात तर...

१. तुमचं आडनाव बदलत नाही.
२. तुम्हाला गरोदर राहायची भीती नाही.
३. वॉटर पार्कमध्ये व्हाइट टी शर्ट घालून बागडू शकता.
४. वॉटर पार्कमध्ये टी शर्ट न घालताही बागडू शकता.
५. बाइक/कारचे मेकॅनिक तुमच्याशी खरं बोलतात.
६. स्क्रू कोणत्या बाजूला पिळायचा, असा प्रश्न तुम्हाला पडत नाही.
७. बाईएवढेच काम करून तुम्हाला जास्त पगार मिळतो.
८. गालावरच्या सुरकुत्या तुम्हाला आदर मिळवून देतात.
९. लोक तुमच्याशी बोलताना तुमच्या चेह-याकडेच पाहतात.
१०. तुमचा एक मूड बराच काळ टिकतो.
११..तुमचा एक फोन अर्ध्या मिनिटाच्या वर चालत नाही.
१२..पाच दिवसांच्या सुटीसाठी बाहेर जाताना फक्त एका सुटकेसमध्ये सामान मावतं.
१३ .तुम्ही फडताळातून डबे स्वत:चे स्वत: काढू शकता.
१४ .कोणत्याही डब्याचं झाकण स्वत: उघडू शकता.
१५..पादत्राणांचे तीन जोड पुरतात.
१६ .बिनधास्त शॉर्ट वापरू शकता.
१७ .तुम्ही पाच जणांच्या कुटुंबासाठीची संपूर्ण कपडेखरेदी केवळ पाच मिनिटांत उरकू शकता.
१८ . तुमचं पोट सुटलं तर कोणी काही बोलत नाही.

मित्रानो, प्रत्येक गोष्टीत स्त्रियांना आपण कमी लेखतो, प्रत्येक गोष्टीत त्यांचाशी पुढे असण्याच भ्रमिक सुख आपल्याला खूपच प्रिय असते, त्यांची टिंगल उडवायला मुळीच काही वाटत नाही! आपल्या मते दोष म्हंटला तर नेहमी त्यांचाच असतो, होना ???
पण खरतर चुकतो आपण..
स्त्री च्या रुपात आई असो, बहिण, बायको, पुत्री किवा प्रेयसी त्यांचा आदर केलाच पाहिजे, त्यांचा भावनांची कदर समजून घ्यायला पाहिजेच...
खरच हो, त्यांचा इतपत धैर्य, सहनशक्ती आणि त्याग करण्याची शक्ती आपल्यात नाहीये हे नेहमी लक्षात ठेवून हे विचार केल पाहिजे कि आपण खूप खूप खूपच नशीबवान आहोत, पुरुष म्हणून जन्माला आलोय...!!! 
(आंतरजालावरून साभार)
                                               

4 comments:

 1. अनेकदा लोकं असे प्रश्न विचारतात जे अतिशय मुर्खपणाचे असतात...
  अशा प्रश्नांना दिलेली ही हटके उत्तर आहेत. पहा काही मस्त नमुने दिले आहेत::

  1)हॉटेल मध्ये अनेक जण वेटर ला 'इथे जेवण कसं मिळतं' हे विचारतात....
  आता तो काय वाईट मिळत म्हणून सांगणार ? तरी असलाच एखादा
  इरसाल वेटर तर....गिर्हाईक: इथे पनीर मसाला चांगला मिळतो का हो ?
  वेटर: छे !! बांधकामावरच सिमेंट आणुन कालवतो ते आम्ही त्यात...
  कसला चांगला लागतोय

  2)प्रश्न- अरे वा! घरीच आहात वाटतं? उत्तर- नाही माझ्या पश्चात ही इमारत
  "राष्ट्रिय वास्तु" घोषित झाली तर कसे वाटेल हे बघायला आलोय

  3)सकाळी.प्रश्न - पेपर वाचताय वाटतं!
  उत्तर- नाही! ओल्या शाईचा (इंक) वास घेतल्या शिवाय मला ताजेतवाने वाटत नाही.

  4)सिनेमागृहा बाहेर प्रश्न: काय पिक्चर बघायला आलात वाटतं?
  उत्तर: छे! फावल्या वेळात तिकिटे "ब्लैक" करून अर्थार्जन करावं म्हणतोय! पण!
  इथेही तुम्ही आमच्या "आधी" हजर!!

  5)सकाळी फिरायला निघाला आहात प्रश्न: काय "मोर्निंग वाक्" वाटतं??!!!
  उत्तर: काही तरी काय! नगरपालिकेचं कंत्राट घेतलय मैलाचे दगड कुणी पहाटे
  चोरून तर नेत नाही ना याची खात्री करतोय!!

  6)प्रश्न- प्रवासाला निघालात वाटतं? (हातात लगेज बघून !!!!)
  उत्तर- नाही हल्ली व्यायाम करायला सवड मिळत नाही ना!
  शिवाय जिम चे पैसे ही वाचतात !!

  ReplyDelete
 2. VERY NICE POSTS!!!!!!
  I especially liked the way you have described your profile!!!!!!!!!!!!
  Just a perfect follower of BUDDHISM!!!!!!!!!
  I have just copied one of your poem of NIKHIL WAGLE and I am going to post it!!!!!!!!!!!
  Sorry for that ha!!!!!!!

  ReplyDelete
 3. You are welcome Amit dear...!!!

  ReplyDelete
 4. best one sir,,..
  You have written very well and you r doing good job...

  ReplyDelete