My Followers

Saturday, 23 June 2012

* भिमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते *

 * भिमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते 

भिमा तुझ्या मताचे जर पाच लोक असते,

तलवारीचे तयांच्या न्यारेच टोक असते ....!!!

वाणीत भीम आहे करणीत भीम असता,

वर्तन तुझ्या पिलांचे सारेच चोख असते ....!!!

गोळी खुशाल घाला फाशी खुशाल दयारे,

खोटे इथे खर्‍याचे दुसरेच टोक असते .....!!!


तत्त्वाची जाण असती बिनडोक लोक नसते,


सारे चलन तयांचे ते रोखठोक असते .....!!!


सदभाव एकतेचे जर अंतरात असते,


चुकले कुणीही नसते सारेच एक असते .....!!!


वामन समान सारे स्वार्थाने अंध नसते,

तुझीया कृतिप्रमाने सारेच नेक असते ....!!!


2 comments:

  1. Very nice poem!!!!!!!!!!!!!!!
    Seems like our people are going far from BUDDHISM and THOUGHTS OF DR.AMBEDKAR!!!!!

    ReplyDelete