My Followers

Friday, 15 June 2012

छ. शिवाजी महाराज  गो-ब्राम्हण प्रतिपालक होते होते काय ?


छ. शिवाजी महाराज हे हिंदू होते, इतकेच नव्हे तर ते गो-ब्राम्हण प्रतिपालक होते असा दांडगा प्रचार कांही हितसंबंधी लोक गेली १००-१२५ वर्षे नेटाने करत आहेत. त्यासाठी त्यांनी अनेक पोवाडे लिहिले, कथा-कादंबर्‍या-नाटके लिहिली, सिनेमे काढले. आता ते अधिकचा प्रचार टी.व्ही. वरून आणि इंटरनेटवरूनही करत आहेत.
                    आदिलशाहीतील एक बलाढ्य सरदार. तो वाई प्रांताचा सुभेदार होता . शिवरायाना संपविण्याचा विडा त्याने उचलला होता आणि त्यासाठी तो स्वराज्यावर चालून आला होता . स्वराज्याचा शत्रु या दृष्टीने शिवाजी महाराज त्याच्याकडे पाहात होते . याला धार्मिक रंग अजिबात नव्हता . शिवरायानी अफजल खानाला ठार मारले नसते तर राजांचेच काही बरे वाईट होण्याची शक्यता होती . कारण अफजल खान कपटी म्हणुन प्रसिद्ध होता . त्यामुळे शिवराय सर्व तयारीनिशी खानाच्या भेटीस गेले होते . खानाने महाराजाना आलिंगन दिल्यानंतर खानाने महाराजांच्या पाठीत कट्यारीने वार केला . परन्तु चिलखत असल्याने महाराज बचावले व चपळाइने त्यानी वाघनखे खानाच्या पोटात घुसवून त्याचा कोथळा बाहेर काढला. तवढ्यात राजांवर धावून आलेल्या सय्यद बंडाला जीवा महालेनी जागेवरच गार केला. हा झाला इतिहास . याला विरोध करण्याचे कारण नाही . परंतु यापुढे काय झाले ते जाणीवपूर्वक दुर्लक्षिले गेले आहे. अफजल खानाचा वकील कृष्णा भास्कर कुलकर्णी याने शिवारायांच्या अंगावर वार केला. राजानी तो वार चुकविन्याचा प्रयत्न केला परंतु कपाळावर वार झालाच. महाराजांच्या कपाळावर खोल जखम झाली. शिवरायांच्या आयुष्यात त्याना एकमेव जखम करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी  हिंदू-ब्राम्हण होता . परन्तु त्याला कधीच हायलाईट केले जात नाही . उलट इतकी गंभीर बाब इतिहासापासुंन लपवून ठेवण्याचे महापातक अनेक जण आजवर करत आले आहेत . ब्राम्हण म्हणुन कोण मुलाहिजा करू पहातो ?  हे शिवाजी राजांचे विचार . मग असे असताना अफजल खानाबरोबर कृष्णा कुलकर्णीचाहि इतिहास समाजासमोर मांडायला हवा, पण तसे होत नाही . जावळीच्या चंद्रराव मोरे यांच्यासारख्या काही मराठा सरदारांचा स्वराज्याला विरोध होता . मग जावळीच्या मोरेंची जर शिवरायांचे शत्रु म्हणुन मांडणी केली जात असेल तर कृष्णा कुलकर्णीकडे केवळ ब्राम्हण म्हणुन दुर्लक्ष करायचे का ?  तोही स्वराज्याचा शत्रु होता ही बाब अग्रक्रमाने का मांडली जात नाही ?अफजल खानाचा शिवरायानी वध केल्यानंतर त्यांच्यातील राजकीय शत्रुत्व (धार्मिक नव्हे ) शिवरायानी तिथेच संपवून टाकले. ज्या शत्रूला आपण स्वताच्या हाताने ठार केले त्याचीच कबर सन्मानपूर्वक प्रताप गडावर   उभारणारा राजा एकमेवाद्वितियच म्हणावा लागेल. शिवरायांचे मोठेपण नेमके याच्यात आहे. त्यानी कधीच परधर्माचा द्वेष केला नाही . पर्धर्मियाना नेहमी सन्मानाने वागविले .युद्धाच्या प्रसंगी कोणत्याही धार्मिक स्थळाना अथवा धर्मग्रंथाना हानी पोहचवायची नाही शिवरायांचा दंडक होता . परंतु आज नेमके त्याच्या उलट वर्तन चालले आहे . अफजल खानाच्या नावाखाली मुस्लिम द्वेष करायचा किंवा त्याना बोचेल अशी इतिहासाची मांडणी जाणीवपूर्वक करायची, असे प्रकार सर्रास घडत असतात. अफजल खान मुसलमान होता म्हणुन तो स्वराज्याचा शत्रु नव्हता  किवा तो स्वराज्याचा शत्रु होता म्हणुन सर्व मुसलमान स्वराज्याचे शत्रु आहेत, असेही कुणी समजू नये. सर्व जाती -धर्माचे मावळे शिवरायांच्या पदरी होते . दौलत खान दर्यासारंग हा मुसलमान त्यांचा आरमार प्रमुख होता. नुरखान बेग नावाचा मुसलमान त्यांचा घोडदळ प्रमुख होता . इब्राहिम खान नावाचा मुसलमान त्यांचा पायदळ प्रमुख होता.  काझी हैदर हा मुसलमान त्यांचा वकील, न्यायाधीश होता. मदारी मेहतर हाही त्यांच्या दरबारी आहे. मुसलमान मौनी बाबा त्यांचे गुरु होते . राजांच्या अंगरक्षकापैकी अर्धे मुसलमान होते आणि ही प्रामाणिक, जीवाला जीव देणारी माणसे होती. आयुष्यात त्यानी कधीही राजांशी गद्दारी केली नाही. असे असताना फ़क्त अफजल खान वध हे एकच प्रकरण समाजासमोर नेहमी मांडायचे आणि राजांच्या पदरी असणाऱ्या प्रामाणिक मुसलमान मावळ्याकडे दुर्लक्ष करायचे, हे कितपत बरोबर आहे . शिवरायांचे कर्तुत्व फ़क्त अफजल खान वधापुरते मर्यादित नाही याचे भान आम्ही ठेवणार आहोत की नाही ? शिवरायांच्या चरित्राचा चिकित्सक अभ्यास करून ते विचार , तो आचार आम्ही आमच्या आचरणात आणले तर “धार्मिक दंगली ” सारख्या वाईट घटना आम्ही टाळू शकतो. 
              “शिवाजी महाराज हे काही डोक्यावर घेवून नाचायाचे विषय नाहित तर डोक्यात घालायचे विषय आहेत .” शिवरायांचे खरे चरित्र समाजासमोर मांडले पाहिजे.  शिवरायांचा लढा कोणत्याही जाती -धर्माविरुद्ध नव्हता तर स्वराज्याशी बेइमानी करणाऱ्या, इथल्या मातीवर अत्याचार करणार्या सैतानांच्या विरुद्ध होता.  शिवराय सर्वधर्म समभावानेच आयुष्यभर जगले.  त्यांच्या पश्चात आम्ही त्यांच्याच आचार विचाराना काळिमा फासला तर शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार आम्हाला उरणार नाही. पण विचार करण्यासारखी बाब ही आहे की छ. शिवाजी महाराजांच्या वेळी हिंदू नावचा धर्म अस्तित्वात होता काय? तसा तो आजही अस्तित्वात नाही, पण आज निदान बरेच लोक स्वत:ला हिंदू समजतात. शिवकालातील लोक स्वत:ला हिंदू समजत होते असा कसलाही पुरावा नाही. धर्म या अर्थाने त्यावेळी कोठेही हिंदू शब्द वापरला गेलेला नाही. त्या काळात शैव धर्म, वारकरी धर्म, सनातन धर्म/वर्णाश्रम धर्म, इस्लाम धर्म हे दख्खनेतील मुख्य धर्म होते. छ. शिवाजी महाराज हे धर्माने शैव होते. तसेच त्यांची वारकरी धर्माशीही चांगलीच जवळीक होती. शैव व वारकरी हे दोन्ही समतावादी धर्म. छ. शिवाजी महाराजांना हिंदू ठरवणार्‍या मेंदूंना ही गोष्ट चांगलीच माहीत आहे. पण हे मेंदू गोबेल्सच्या मेंदूशी स्पर्धा करणारे असल्याने ते महाराजांना हिंदू या नावाच्या बुरख्याखाली विषमतावादी सनातन वर्णाश्रम धर्माच्या चौकटीत बसवून त्यांना गो-ब्राम्हण प्रतिपालक ठरवत असतात तसा प्रचार करत असतात.महाराजांना कट्टर हिंदू ठरवतात. ’हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’ अशा प्रकारची पुस्तके लिहून घेतली जातात. पण महाराज हिंदू नव्हते हे पुढील गोष्टींवरुन सहज दिसून येते:
१. महाराजांनी शुद्र आणि अतिशुद्रांच्या हाती शस्त्रे दिली.
२. महाराजांनी स्वत:चे आरमार उभे केले, व स्वत: समुद्री मोहिमांमध्ये भाग घेतला.
३. महाराजांनी जिजाऊला शहाजी राजांचा मृत्युनंतर सती जावू दिले नाही.
४. महाराजांनी अनेक ब्रम्हहत्या केल्या. ('हिदू' धर्मात हे फार मोठे पाप आहे. )
५. महाराजांनी म्लेंछ लोकांशी मैत्री केली, आपल्या सैन्यात मुस्लीमांना मोठ्या प्रमाणात प्रवेश दिला.
६. महाराजांनी नेताजी पालकर व इस्लाम स्वीकरलेल्या इतर अनेकांना शैव धर्मात परत आणले. ('हिदू' धर्मात शुद्धी करणाचा अधिकार फक्त ब्राम्हनांनाच आहे. )
७. महाराजांनी आपल्या दुसर्‍या राज्याभिषेकाच्या वेळी एक दलीत स्त्रीशी लग्न केले.


वरील सगळ्या गोष्टी सरळ-सरळ वैदिक हिंदू धर्माच्या विरोधात जातात. त्यामुळे छ. शिवाजी महाराजांना हिंदू / गो-ब्राम्हण प्रतिपालक ठरवणे हे केवळ चुकीचे आहे.... (संदर्भ -महावीर सांगलीकर)

1 comment:

  1. I am sorry i do not understand the language in this article. I request to post this in English if somebody can.

    ReplyDelete