My Followers

Friday, 27 February 2015

अनावरण...!

अनावरण...!

मी तुमच्या पुतळयाच
बाबासाहेब 
आज अनावरण केलं
(तुम्हाला कळलच असेल)
तुमच्या पुतळ्याला 
डोळे मिटून भाविकतेन 
नमस्कार केला  
(नाटक केलंस बामणा?) 
नाटक ?
थोडफार असेलही 
लोकांच्या नजराच नाटकाला जन्म देतात 
ते पृथ्वीवर वावरणाऱ्या 
कोणालाच चुकत नाही 
(ऐकलय जग हे रंगभूमी वगैरे )
काबुल आहे, पण 
सारच नाटक न्हवत...
निमिषार्ध
अगदी निमिषार्ध बाबासाहेब 
माझ्या दृष्टीतून अवतरला 
एक श्रद्धाशील श्रमण
बोधीवृक्षाच्या तळाशी बसलेल्या 
तथागताकडे  पाहणारा 
(कविता करतोस काय यमक्या ?)
नाही "बाबासाहेब" 
"तुम्ही" हा विषय 
कवितेत मावणारा नाही  
हे पूर्वीच लक्षात आलाय माझ्या 
रंगीत फुग्यामध्ये 
आकाश पकडणार्या सारखे 
आणि तरीही 
सशत्र कविता लिहिल्याचं
अपूर्व समाधान
त्याक्षणी मला मिळालं
(लोकांच्या टाळ्या घेतल्याचं?)
 ते हि असतंच कोणत्या व्यासपीठावर 
टाळ्यांची तोरण बांधावी लागतातच 
पण मला मिळालं 
ते समाधान न्हवत 
तो एक अदभूत अनुभव होता 
त्या क्षणर्धात मी 
माझ्या संगमरवरी चौथर्यावरून
खाली खोल-खोल कोसळत गेलो 
कड्यावरून दरीत 
भिरकावलेल्या दगडासारखा 
थेट पाताळापर्यंत, जेथे 
खाली हि संज्ञाच न्हवती 
त्या तळावरून 
मी तुमच्या पुतळ्याकडे पाहिलं 
तेव्हा पुतळा दिसलाच नाही 
दिसत होता, जाणवत होता 
"एक विरत दाहक तेजोगोल"
सूर्याच्या कोरोनासारखा...!

कवी - कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर ), 
संदर्भ - प्रिय भिमास, काव्य संग्रह 
संपादन - राज जाधव....!   

3 comments: