My Followers

Monday, 9 February 2015

"आह्मी महार असतो तर"..? - आचार्य प्र. के.अत्रे

"आह्मी महार असतो तर" - आचार्य प्र. के.अत्रे

हा प्रश्न गेले कित्येक दिवस आह्मी आमच्या मनाला विचारित आहोत. गेल्या महिन्यात नाग्पुर येथे  आंबेडकरानी व त्यंचे दोन लाख महार यानी बौद्ध धर्माचा स्विकार केला. पुढल्या महिन्यात मुंबइ येथे दोन ते चार लाख महार बान्ध्वाना बुद्धधर्माची दिक्षा देणार आहेत. भगावन बुद्धाचा धर्म स्वीकारण्याची प्रच्ंड लाट या देशातील अस्प्र्श्य समाजामधे उलटलेली आहे.


बुद्धधर्मीय झालेल्या महार्ंच्या अभीनदनांच्या दोन – तीन सभा मधे आह्मी हजर होतो. तेथील चैतन्य आणी हर्षाचे वातवरण आह्मी डोळ्यानी पाहिलेय. त्याच वेळी आमच्या मनात प्रश्न उद्भवला की , आह्मी स्वत: महार असतो तर काय केले असते ? भारतातील लक्षावधी लोक बुद्धधर्माची दिक्षा स्वीकार करत आहेत ही काय समान्य घटना आहे ? शताकाशतकात न घडलेली ही महान ऎतिहासीक घटना आहे, पण एव्हढी क्रांतीकारक घटना होत असताना त्याची देशात प्रतिक्रिया काय घडत आहे ? लक्षावधी अस्प्रुश्य समाज बुद्धधर्माची दिक्षा स्वीकार करत आहेत हे पाहुन हिन्दु समाजाला काय वाटत आहे ? काही नाही. अक्षरशा काही नाही. कोणालाही त्याबद्धल काही वाटत नाही आन्नद वाटत नाही व दुख ही वाटत नाही. 

सावरकरान्नी ‘ केसरी ’ त ह्यावर टिका केली असेल तेव्हढीच. लक्षावधी लोक अस्प्रुश्य बौद्ध झाले ह्याचा हिन्दु समाजाला केव्ह्ढा धक्का बसायला पाहिजे होता. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत निशेधाच्या वा शोकाच्या म्हणा , प्रच्ंड सभा भ्रवल्या व्हव्या होत्या, पण असे काहीच घडले नाही. ह्याचा अर्थ हाच नव्हे काय की, हिन्दु धर्मातुन कोणी कितीही संखेने बाहेर पडले तरी , बाकीच्या हिन्दुसमाजाला त्यचे काहीच वाटत नाही, जणु काही तो असेच म्हणत असतो की, ‘जा, हवे तितके जा, अम्च्या धर्मातुन जा, आमच्या धर्माचे आणी समाजाचे तुमच्या जाण्याणे काडी इतका ही नुकसान होणार नाही ‘

गेली पाच हजार वर्षे परधर्मात जाण्यार्या सह्स्त्रावधी हिन्दुंच्या बद्धल बाकीच्या हिन्दु समजाची हीच बेफिकीरी व बेवर्वाइची व्रुत्ती आहे. हिन्दु धर्मात बाहेरुन कोणी येण्याचा मुळी प्र्श्नच उत्प्न्न होत नाही . जो उठतो तोह य्हा ध्र्मातुन बाहेर पडतो . ह्या गोष्टीचा विच्रार करणे जरुर आहे , त्यावर उपाय शोधुन काढणे आवश्यक आहे असे हिन्दु लोकाना निवा समाजाला मुळीच वाटत नाही. आंबेडकरानी व अनुयायानी दिक्षा घेतली ह्याचे आह्माला आश्चर्य आणी वाइट वाटत नाही , उलट आनन्द वाटतो.  कोणी म्हणेल की तुह्मी हिन्दु धर्माचे शत्रु आहे.  

आंबेडक्रानी व त्यांच्या अनुयाय्नी ‘धर्म्मांतर‘ केले हा शब्द प्रयोग आह्म्हाला पसंत नाही, त्यानी धर्म स्विकार केला असेच आह्मी म्हणु . अस्प्रुश्य समाज हा हिन्दु आहे ही गोष्ट्च मुळी आह्माला मान्य नाही . आह्मी त्याना धर्मा पासुन नेहमीच दुर ठेवले आहे , म्हणुन त्यानी बुद्धधर्म स्विकरला, ह्याब्द्धल हिन्दुना शोक करण्याचा हिन्दुमात्राना अधिकार नाही. बुद्धधर्म हा हिन्दु धर्माचाच एक भाग आहे अशी मखलाशी आमच्यातले काही दिदशहाणे करतात , तो त्यांचा मत्सर आणी घमेंडखोरपणा आहे . कोणी म्हणत बौद्ध होवुन त्यांची अस्प्रुश्यता जाणार नाही . कोणी म्हणत बौद्ध होवुन त्यांची आर्थीक सुधारणा होणार नाही . असे म्हणणार्याना बौद्धधर्म स्विकारण्यारयांची भावना मुळी कळलीच नाही .

बौद्ध झाल्याने हिन्दु लोक आपल्याला अप्र्युश्य समलजणार नाही आपली आर्थीक सुधराणा होणार नाही ही गोष्ट काय आंबेडकराना समजत नाही ? आंबेडकराना त्याची बिल्कुल पर्वा नाही . उलट झगडुन मिळविलेल्या आपल्या राजकिय हक्कंवर पाणी सोडायलासुद्धा ते तयार झाले आहेत. ह्याचे कारण धर्माला आणी संस्क्रुतीला हजारो वर्षे आचवलेल्या कोट्यावधी अस्प्रुश्याना न्यायावर आणी समतेवर आधारलेल्या अका महान धर्माची , तत्वद्न्यनाची आणी संक्रुतीची दिक्षा देण्याची आंबेडकराना तळमळ लागली आहे. बुद्धधर्माच्या दिक्षातील आचारांचे जर समाज काटेकोर पालन करील तर एक पिढीच्या आत ह्या सर्व समाजाची बौद्धीक आणी नैतीक उंची सर्वसमान्य हिन्दु समाजपेक्षाही वाढल्यावाचुन राहणार नाही. बुद्धधर्माचा स्विकार हा सप्रुश्य समाजाचा महान प्रयत्न आहे. त्याना नावे ठेवण्याचा हिन्दुना अधिकार नाही. आम्ही महार असतो तर हेच केले असते.

लेखक - आचार्य प्र. के. अत्रे...मराठा - २२/११/१९५६... 

(संकलन - राहुल गायकवाड) 

1 comment:

 1. ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव म्हणतात, ‘आचार्य अत्र्यांचे व्यक्तिमत्व, बालपणापासून ज्या पर्यावरणात ते वाढले, त्या पर्यावरणाचे संस्कार, त्यांनी केलेले विविध उद्योग व व्यवसाय, ते बदलले गेले किंवा वाढत गेले त्या प्रक्रियेमागील प्रेरणा, त्यांची साहित्यनिर्मिती व साहित्यविचार आणि त्यांच्या जीवनाचा व कर्तृत्वाचा कालखंड या सर्व घटनांचा रोख प्रामुख्याने बहुजन साहित्य संस्कृतीच्या संगोपन वर्धापनाकडे होता, असे म्हणता येईल. आपल्या समकालीन साहित्य संस्कृतीमधील हळवेपण, पुस्तकी प्रत्यय, फसवे स्वप्नरंजन, मध्यमवर्गीय सोवळेपण व संकुचितपणा, अवास्तवता, आत्मकेंद्रीत कोळीवृत्ती, उच्चभ्रू तुच्छतावाद आणि आत्मवंचक व परवंचक विचारप्रणाल्या अत्र्यांनी झिडकारल्या व त्यांचा गावरान संस्काराशी सुसंगत अशा खट्याळ, मार्मिक विडंबन व विनोदवृत्तीने समाचार घेतला. अभिजनवर्गाला प्रिय असणा-या तत्कालीन कथा-कादंब-यांची पायवाट टाळून त्यांनी बहुजनप्रिय असा नाटकाचा साहित्यप्रकार आणि चित्रपटमाध्यम यांची निवड केली. तत्कालीन रंगभूमी बहुजनांना आपली वाटत नाही, हे त्यांनी निर्भीडपणे दाखवून दिले. अवघ्या साहित्य-संस्कृतीला बहुजनप्रिय व बहुजनप्रबोधक वळण देण्याचा त्यांनी लेखनातून व समीक्षेतून अथक प्रयत्न केला. त्यांनी अखेरीला समाजवादी वास्तवाचा पुरस्कार केल्याचे दिसते; पण त्याचे वास्तव स्वरुप पश्चिमी नसून, बहुजन परंपरेतील समतेशी व ममतेशी जुळणारे होते. यावरून साठोत्तरी कालखंडातील परिवर्तनवादी वाड्.मयीन आणि सांस्कृतीक चळवळींची आद्य बीजे या अत्रेवादातच होती, असे ठामपणे म्हणता येईल. अत्र्यांच्या बहुजन संस्कृतीला लगतचा संदर्भ सत्यशोधक समाजाच्या व ब्राम्हणेतर चळवळीच्या वारशाचा होता. तुकाराम विद्यापीठाची कल्पना म्हणूनच अत्रे मांडू शकले. चित्रे-कोलटकर-नेमाडे-मोरे या सर्वांच्या खूप आधी तुकाराम विद्यापीठाची, मंडई विद्यापीठाची भाषा बोलणारा हा द्रष्टा होता. आंबेडकरांना आमचे आजचे शंकराचार्य म्हणणारा हा बहुजनवादी समीक्षक होता. म्हणूनच बंडखोर अशा मराठी साहित्य-संस्कृतीचा १९२० ते १९५० या कालखंडातील खरा प्रतिनिधी म्हणून अत्र्यांकडे पाहावे लागेल.’

  महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकरांपासून प्रेरणा घेऊन १९६० नंतर दलित साहित्याचा प्रवाह रुंदावला. पण ज्या काळात महात्मा फुलेंची महाराष्ट्राला आठवणही होत नव्हती त्या काळात अत्र्यांनी त्यांच्या जीवनावर चित्रपट काढला. २५ डिसेंबर १९५४ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला. विशेष म्हणजे या चित्रपटाचे मंगलाचरण संत गाडगेबाबांनी म्हटले. कथानिवेदन कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. देशभक्त केशवराव जेधे, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर बाबूराव जगताप, डॉ. अण्णा नवले, अमर शेख, विठ्ठलराव घाटे आणि स्वत: अत्र्यांनी यांनी या चित्रपटात काम केले.
  डॉ. आंबेडकरही यावेळी उपस्थित होते. या चित्रपटाने राष्ट्रपतींचे रौप्यपदकही पटकावले.
  १९५५मधल्या मिरजेच्या दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलनात भाषण करताना अत्रे म्हणाले, ‘स्वातंत्र्य आले आहे. पण अद्याप समता आलेली नाही. जातीभेद आणि अस्पृश्यता हे समतेच्या मार्गातील दोन प्रचंड अडथळे आहेत. हे अडथळे कसे नाहिसे करावयाचे? देशात ९० टक्के लोक निरक्षर आहेत. त्यामुळे आमच्या वाड्.मयाची हाक लांबवर ऐकूच मुळी जात नाही. भारताच्या जीवनातील हे सर्व दोष आपणाला नष्ट करून टाकावयाचे आहेत. भारताचे तत्वज्ञान विश्वशांती आणि विश्वप्रीतीचे आहे. या सर्व मूल्यांचा वाड्.मयकारांनी आपल्या लेखनात पुरस्कार केला पाहिजे. महात्मा फुले यांचा उज्ज्वल ध्येयवाद साहित्यिकांनी आपल्यासमोर ठेवावा.’ निर्मिकाची प्रार्थना म्हणून अत्रे या भाषणाचा समारोप करतात. अत्र्यांची ही भूमिकाच १९६० नंतरच्या दलित साहित्य चळवळीचे बीज रोवणारी ठरली, असे म्हटले तर वावगे ठरू नये. अत्र्यांनी दलित, बहुजन लेखकांना व्यासपीठ मिळवून दिले.

  दुर्देवाने अत्र्यांचे हे समाजक्रांतीकारी विचार दुर्लक्षिले गेले. महात्मा फुले या चित्रपटाचा विषय आपला न वाटल्याने अभिजन, ब्राम्हणवर्ग या चित्रपटाला आला नाही. आणि बामणाने चित्रपट काढला म्हणून बहुजन या चित्रपटाला गेले नाहीत, असे अत्रे एकदा म्हणाले होते. आचार्याच्या संपूर्ण कार्याचीच अशा प्रकारे उपेक्षा झाल्याचे यानिमित्ताने म्हणावेसे वाटते. पण अत्रे म्हणजे महाराष्ट्राचा अर्धशतकाचा इतिहास आहे. हा इतिहास लोकहिताचा, समतेचा आणि उपेक्षित, सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जाणीवपूर्वक घेतलेल्या व्रताचा आहे, हे सुवर्ण महोत्सव साज-या करणा-या महाराष्ट्राने सुजाणपणे लक्षात घ्यायला हवे. बहिणाईंच्या कवितेला अत्र्यांनीच संबोधल्याप्रमाणे हे अत्रेय विचार शेतातल्या गुप्तधनाच्या हंड्याप्रमाणे आहे. हे विचारधन लपवून न ठेवता मराठी माणसांनी एकमेकांना वाटून टाकायला पाहिजे. - श्रीरंग गायकवाड

  ReplyDelete