My Followers

Tuesday 3 February 2015

जातीचा दाखला....!

जातीचा दाखला....!

जातीचा दाखला मी पण
कोर्टातून काढला

पुन्हा एकदा सरकारन 
आदेश बघा धाडला

कोर्टाच्या दाखल्याची 
गेली होती किम्म्त !

माय बाप सरकार, 
करीत होते गम्मत !

काय काय अटी होत्या, 
विकासात होता खोडा !

१९५० सालचा पुरावा, 
अर्जासोबत जोडा !

म्हटले मी बापाला,
दाखला गावाकडन आणा !

मुंबईत होत मुश्कील, 
सायेब लय शहाणा !

बाप माझा हुशार, 
आणला एकदाचा दाखला !

प्रगतीचा मार्ग 
माझा मीच जोखला

बँकेच्या परीक्षेत, 
झालो एकदा पास !

दाखला बघून सायबानी, 
केल मला नापास !

मुंबईच्या हाफिस्ला 
पुना केली अर्जी !

द्यायला दाखला, 
सायबाची नव्हती मर्जी !

जन्म होता २२ सालचा, 
बाप शिकला पुस्तक सात !

३६ साली शाळा सोडली, 
काम करू लागले हाथ !

आजोबा मेला ६६ ला, 
मृत्यू दाखला मग दावला !

जात होती लिवली त्यात, 
तरी सायेब नाय पावला !

म्या म्हटले सायबाला, 
आजोबा ज्या जातीचा,
त्याच जातीतला बाप !

हाकलून दिल सायबान, 
आमचा उडाला थरकाप !

गावाकडचा दाखला, 
जोशी सायबास्नी नाय आवडला !

मुलाखत घेतली माझी, 
पण मला नाय निवडला !

झाला होता अन्याय 
सायेब होता जोशी !

नशिबावर आमच्या 
शिंकली होती माशी !

वर्षे गेली दोन, 
संधी आली लय भारी !

७ ठिकाणी पास झालो, 
नेमणूकीपत्रांची रांग दारी !

तोच दाखला होता, 
पण सायेब होता येगळा !

आकाशात उडण्याचा 
मार्ग झाला होता मोकळा 


- गजाभाऊ लोखंडे...!

No comments:

Post a Comment