My Followers

Wednesday, 17 October 2012

आजन्म विद्यार्थी डॉ.बाबासाहेब आंबेडकर.......!

आजन्म विद्यार्थी डॉ.बाबासाहेब आंबेडकर.......!

ज्ञानरुपी सागरात गुडघाभर पाण्यात मी उभा आहे, मला अजुन खुप ज्ञान मिळवायचे आहे.एका सरस एक अशा विद्वत्येच्या पदव्या विद्वत्येच्या हिमालायाची  उंची गाठणार्या प्रज्ञासुर्यास प्रणाम....!

    ज्ञानपिपासू डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रचंड विद्ववत्ता संपादन केली तरी स्वत: त्यांनी आजन्म विद्यार्थी म्हणुनच घोषित केले. विद्यार्थ्याने कसे असावे ? कसे घडावे ? हे बाबासाहेबांकडून प्रत्येक विद्यार्थ्याने शिकावे असे आदर्श विद्यार्थी ते आहेत.मुंबईच्या डबक चाळीत (१०x१०)च्या छोटेखानी घरामध्ये आठ -दहा माणसांचे कुटुंब , बकरी, चुल, बाथरून , लाकडे इत्यादिंनी घर गच्च भरून गेले होते.अशा लहान घरात बाबासहेबांनी एक पैश्याच्या रॉकेलवर अभ्यास केला.कधी रस्त्यावरच्या महानगरपालिकेच्या दिव्यावर (स्ट्रीट लाईट) मध्ये बसुन अभ्यास केला.मुंबईचा गोंगाट मध्यरात्री थोडासा कमी होतो, तेंव्हा एक ते चार या वेळात रामजीबाबा त्यांना उठवायचे व बाबासाहेबंनी अभ्यास करावा म्हणुन  जागता / खडा पहारा  द्यायचे.

        मैट्रिक पास झाल्यावर एल्फ़िन्स्टन महाविद्यालयात शिक्षण घेताना त्यांना कपडे नसायचे वडिलांचा जुना कोट घालायचे, पायात चपला नसायच्या अशाप्रकारे त्यांनी खडतर परिस्थितीत बी.ए. पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले.
           पुढील  शिक्षणासाठी अमेरिकेला गेले असता  मायदेशी अस्प्रुष्य आहे म्हणुन प्यायला पाणी न मिळणं, वर्गाच्या बसून शिक्षण घेणे, बोर्डला स्पर्ष करू न देणे अशा प्रकारे वेळोवेळी अपमानित व्हावे लागले.इंग्लंडला शिक्षणासाठी जाऊन विद्या  विभुषित म्हणुन परत भारतात आल्यावरही    तसाच अनुभव. परदेशी मान सन्मान तर मायदेशी अपमान अशीच शोकांतिका आजतागायत कमी आधिक प्रमाणात या दुर्दैवी देशात पहायला मिळतात.इंग्लंडमध्ये शिकत असताना आठ वर्ष व्हायला लागतो तो अभ्यासक्रम बाबासाहेबांनी २ वर्ष ३ महिन्यातच पुर्ण केला.पण त्यासाठी प्रचंड कष्ट घेतले.२४ तासापैकी २१ तास अभ्यासात घालविले . सर्वात अगोदर ग्रंथालयात जाणारे व सर्वात शेवटी परतनारे विद्यार्थी बाबासाहेब होते.

           दिर्घोत्तरी व कष्ट केल्यानेच यशप्राप्ती होते, ग्रंथप्रेमी बाबासाहेबांनी मुंबईत दादरच्या घरी २२ हजार दुर्मिळ पुस्तकांचे भव्यदिव्य असे ग्रंथालय तर दिल्ली येथील निवासस्थानी ७ हजार ग्रंथ असा प्रचंड ग्रंथालयसाठा केला होता.पुस्तकानेच प्रगती होते. विद्या हे पहिले दैवत तर दुसरे दैवत स्वाभिमान व तिसरे शील या तिन्ही दैवतांवर त्यांची फ़ार श्रद्धा होती.आत्मविश्वासासारकी दुसरी शक्ती नाही असे ते म्हणत असत. त्याचबरोबर तीन गुरु मानले ते म्हणजे तथागत गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा जोतिराव फ़ुले हे होत.अशा आजन्म विद्यार्थ्याने आयुष्यभर या तीन उपास्य दैवतांची व तीन गुरुंची पुजा केली. बाबासाहेबांनी (M.A.,Ph.D.,D.Sc.,L.L.D.,D.lit.,Bar at law) एका सरस एक अशा अनमोल पदव्या घेतल्या.

        आजच्या विद्यार्थ्याला बाबासाहेबांसारखी कधी बिकट परिस्थिती आली नाही तर आजचा विद्यार्थी नैराश्येत, कधी चैनीत, कधी आत्महत्येकडे वळतो.एवढ्या वाईट परिस्थितीतून विद्वत्तेची उत्तुंन झेप बाबासाहेब घेऊ शकतात तर आजचा विद्यार्थी का नाही घेत.प्रत्येक विद्यार्थ्याने बाबासाहेबांनी सहन केलेलं दु:ख, अभ्यास,विकाटी,जिद्द, स्वाभिमान,विद्या,शील, प्रज्ञा,करुणा,मैत्री या महत्वपुर्ण गोष्टींना डोळ्यासमोर ठेवून आदर्श विद्यार्थी बनण्याचा प्रयत्न करावा.त्यांनी ज्या शैक्षणिक पदव्या घेतल्या त्यांचा त्यांनी वापर स्वहीत,स्वत:च्या कुटुंबासाठी न करता समाजासाठी आणि देशकल्याणासाठी केला हा फ़ार मोठा गुण, आदर्श आजच्या पिढीला दीपस्तंभाभासारखा आहे.प्रत्येक विद्यार्थ्याने हे आजन्म विद्यार्थ्याचे गुण ,आदर्श आत्मसात करावेत. यातूनच आदर्श नागरिकाची निर्मिती होईल.अशा या आजन्म विद्यार्थ्यास आजन्म अभिवादन !

पुनर्संपादन - राज जाधव.....!
संदर्भ - मराठी कट्टा 
मूळ लेख इथे वाचा - http://marathikattaa.blogspot.in/2012/09/blog-post_5054.html

No comments:

Post a Comment