स्त्री जन्मा...ही तुझी कहाणी....!
हिमाचल प्रदेश मधील "कुल्लू" या शहराला देवता ची घाटी म्हटले जाते, हि घाटी आपल्या चित्र विचित्र अंधश्रद्धा आणि देव परंपरा यासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या बोली भाषेला "गणाशी" म्हटले जाते. त्या घाटीमध्येच "मलाणा" हे गाव असून, या गावात अशी मान्यता आहे हि, हे गावावर फक्त देवाचे शासन चालते, या गावाच्या भूमीवर "जमलु" नामक देवताचा अधिकार असून गावातील लोक त्याची प्रजा आहेत.
"जमलु" नामक देवताच्या परवानगी शिवाय या गावात कोणी येवू शकत नाही आणि बाहेर देखील जाऊ शकत नाही, देवाच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द हा अखेरचा मानला जातो...!
देवाच्या आणि त्याच्या प्रजेच्या मध्ये एक दुवा आहे, तो म्हणजे "गुर" (ब्राह्मण पुजारी). हा गुर भक्ताचे गाऱ्हाणे देवाला सांगतो आणि ती "जमलु" नामक देवता या "गुर" (पुजारी) व्दारे भक्ताला उपाय सांगते...!

कुल्लू घाटी मधील "मलाणा" या गावामध्ये एखादी महिला प्रसूत झाली कि, देवाच्या आदेशाने त्या महिलेला तिच्या नवजात शिशुसोबत घराबाहेर काढले जाते, जन्म दिल्या पासून १५ दिवस गावाच्या बाहेर एखाद्या तात्पुरत्या तंबू मध्ये त्या दोघांना रहावे लागते. हि परंपरा आज देखील या गावातील लोक मानतात...या प्रथे विरुद्ध कोणी बोलत नाही, कारण त्याला या तथाकथित "देवता" चा कोप "गुर " व्दारे सहन करावा लागेल.

हे देवाचे शासन आहे, देव हे सांगतो, देव ते सांगतो असे म्हणून लोकांना वेड्यात काढणाऱ्या पुजारयाना अद्दल घडविणे गरजेचे आहे, अन्यथा हे "गुर " नामक ब्राह्मण पुजारी "जमलु" देवाला खुश करण्यासाठी स्त्रियांचे अश्या प्रकारे बळी देतच राहतील. देवाच्या नावाने बाळगली जाणारी अश्या प्रकारची अंधश्रद्धा लवकरात लवकर व्हायला हवी.
आज हि या पुरातन, रूढीवादी, धर्मांध, पुरुषप्रधान संस्कृती मध्ये एक तर स्त्रीला "देवीचा" दर्जा दिला जातो, नाहीतर "वेश्ये" चा तरी.....! (स्त्रीला महान तरी बनविले जाते नाहीतर हीन वागणूक दिली जाते, समान वागणूक दिली जात नाही )
आज भारत एक जागतिक महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत आहे, परंतु आज हि खेडो पाडी, ग्रामीण भागात, हिमालयात लोक पोथी, पुराण, रूढी, अंधश्रद्धा, उपास तपास यामध्येच अडकलेले आहेत, आणि याचे मुख्यत शिकार प्रामुख्याने "स्त्री" वर्ग होताना दिसतो...याला मुख्यत रूढीवादी, अवाजवी, पुरुषप्रधान संस्कृती कारणीभूत ठरतेय, हीच पुरुषप्रधान संस्कृती सध्या मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बलात्कारात दिसून येत आहे, "स्त्री" ला जोपर्यंत हीन दर्जाने पाहणे, वागवणे सोडून दिले जाणार तो पर्यंत स्त्रियांवर अशे अत्याचार होताच राहणार....त्यामुळे आपणच आपल्या वागण्यात रोजच्या जीवनात, आई, बहिण, पत्नी, सहकारी यांच्या सोबत सन्मानाने वागले पाहिजे, घरातूनच स्त्रीचा सन्मान करायला शिकाल तर बाहेरच्या स्त्रीला देखील सन्मानानेच पाहाल, तेव्हा कुठे अश्या घटनांना आळा बसेल....!

लेखक - अँड. राज जाधव...!!!