My Followers

Tuesday, 3 July 2012

“बाबासाहेब” हे उपनाव कसे रुजले ?

“बाबासाहेब” हे उपनाव कसे रुजले ?

                         

१९२७ ची गोष्ट आहे. अस्पृश्य चळवळीतील एक अत्यंत महत्वाचे नाव म्हणजे डॉ. भीमराव आंबेडकर. हे नाव १९२७ पर्यंत बरेच लोकप्रिय झाले होते. तेंव्हा बाबासाहेबांचे कार्यालय दामोदर हॉल, परळ, मुंबई येथे होते. बाबासाहेबाना भेटायला येणारी सर्व मंडळी त्याना डॉक्टर आंबेडकर, डॉक्टर साहेब वा साहेब असे संबोधत. तेंव्हा बाबासाहेब बहिष्कृत भारत (ब.भा.) नावाचे पाक्षिक चालवत असत.  पोयबावाडीतील  कावाराणा बिल्डिंग मधील दुस-या माळ्यावर ब.भा. चे कार्यालय होते. चळवळीसाठी काम करणारे व ब. भा. साठी लेखन करणारे बाबासाहेबांचे काही अनुयायी व विद्यार्थी ईथे मुक्कामी राहात.

सप्टे १९२७ च्या एका रविवारी मोकळ्या वेळेत जेंव्हा ही चळवळीतील तरुण मुले गप्पा टप्पा मारत बसली तेंव्हा त्यांच्यातील चांगदेव भवानराव खैरमोडे या तरुण मुलाने असे सुचविले की, आपल्या साहेबांची किर्ती जगभर पसरत चालली आहे. तसेच ते आपल्या सर्व अस्पृश्य समाजाचे मोठे उध्दारक असून त्यांच्या धर्मपत्नी आम्हा सर्व पोरांस मातेसमान पाहतात. जन्माने आमचे आईबाप वेगवेगळे आहेत, पण आम्हाला या मानवी मुल्ये बहाल करणारे आपण सर्वांचे एकच बाप आहेत ते म्हणजे आंबेडकर साहेब व आपली सर्वांची एकच आई ती म्हणजे रमाई. म्हणून या पुढे आपण आंबेडकर साहेबाना ’बाबासाहेब’ व रमाईना ’आईसाहेब’ म्हणण्याचा प्रघात सुरु करु या.  

उपस्थीत सर्व बांधवाना ही उपनावाची युक्ती आवडली. त्यांच्या त्यांच्यातील चर्चेत व संवादात ती आंबेडकरांचा बाबासाहेब असा उल्लेख करु लागली व रमाईस आईसाहेब म्हणने सुरु झाले. पण हा प्रघात सर्वत्र रुजवायचा होता. मग बाबासाहेबांच्या सभांमधून बोलताना वरिल प्रस्तावातील वक्ते प्रत्येक सभेतून बोलताना ठासून बाबासाहेब व आईसाहेब असा उल्लेख करु लागली. सुरुवातीला बाबासाहेबानाही कळले नाही हे काय चाललं. तसही त्याना कळू न देताच ही उपनावं रुजवायची होती. मुख्यत्वे मोरे नि वडवळकर या दोन खंद्या वक्त्यानी बाबासाहेब व माईसाहेब ही उपनावं रुजविण्यात सिंहाचा वाटा उचलाला. हा हा म्हणतार महाराष्ट्रातील प्रत्येक सभेतून या दोन वक्त्यानी वरील उपनावांचा वारंवार उच्चार करुन लोकांच्या मनात ही नावं रुजविली.

१९३० पर्यंत ही दोन्ही उपनावं सर्वत्र ईतक्या आत्मियतेने स्विकारली गेली की आता चळवळीतील लोकं त्याना फक्त बाबासाहेब एवढच म्हणू लागली. नंतर मात्र विरोधकही कित्येक वेळा त्याना बाबासाहेब म्हणू लागले व रमाईस आईसाहेब. 

अँड. राज जाधव...!!! 
(एम डी रामटेके यांच्या ब्लॉग वरून साभार )

11 comments:

  1. खरच खूप महत्वाची माहिती मिळाली. वाचून खूप समाधान वाटले आणि ज्ञ|नात भर पडली. आणखीन अशी सखोल माहिती मिळाल्यास अनाद होईल.
    राहुल मेश्राम, पुणे
    राहुल पुणेकर, (फेसबुक साठी)

    ReplyDelete
  2. धन्यवाद राहुल साहेब आपणास पुरेपूर माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करू... जय भीम...!!!

    ReplyDelete
    Replies
    1. राज जाधव साहेब ,लेख वाचून फार समाधानी आणि अनानदी झालो thanxxx

      Delete
  3. सप्रेम जय भीम .

    धन्यवाद राज जाधव साहेब ,लेख वाचून फार समाधानी आणि अनानदी झालो .माझ्या मते कुणालाही माहित नसेल ,बाबासाहेबांना बाबासाहेब हे नाव कसे पडले खूप मोलाची माहिती आपण दिलीत त्याबद्दल आपले मनापासून अभिनंदन अशीच माहिती देवून विचारांची देवाण -घेवाण करीत राहा ..

    ReplyDelete
  4. JAY BHIM

    Baba badalchi khupch chan mahiti milali kharch he kunalch mahit nasel ki babache nav kase padale..
    Baba badalchi aankhi ajun ashi sakhol mahiti janun ghayla aamhi atur aahe..
    Nice one sir..

    ReplyDelete
  5. धन्यवाद... पूजा...राहुल आपणास पुरेपूर माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करू... जय भीम...!!!

    ReplyDelete
  6. hi Raj malapan hi mahiti khup aawadali khup khup dhannyavad

    ReplyDelete
  7. धन्यवाद राज जाधव साहेब .खरच खूप महत्वाची माहिती मिळाली.धन्यवाद

    ReplyDelete
  8. धन्यवाद...प्रशांत आणि मिता......!!!

    ReplyDelete
  9. Thanks Mr. Raj this is a good information u share with us

    Thanks for that

    ReplyDelete
  10. रमाई

    रामजीची अशी होती सून,
    किती गाऊ तिचे मी गुण,
    पती सेवेसाठी
    राबली ती कसून,
    घर खर्च केला
    तिने गोवऱ्या थापून,
    मात्र चूल पेटविली
    लाकूड फाटा आणून,
    कधी कधी दिवस काढिले
    तिने उपाशी राहून,
    अन दुख :श्रुंचे घोट गिळले तिने रडून रडून,
    ना तक्रार केली
    ना ती बसली रुसून,
    संसार सुखासाठी
    ना मागणी केली पतीकडे हटून,
    नव्हती तिची मागणी
    ठेवा सोन्या दागीण्याने मढवून,
    होती मागणी तिची सौभाग्याचे कुंकू हाच
    दागिना राहावा टिकून, त्या दागिन्याच
    साठी जगली ती पतीची सावली बनून,
    जरी होती आडाणी तरी
    गेली पतीला महाज्ञानी बनवून,
    ज्या महाज्ञानी पतीने टाकले
    साऱ्या जगाला दिपवून, त्यानेच
    गुलामगिरीच्या बेड्या तोडल्या मनुवाद्यांच्या मानगुटीवर
    बसून, अन दीनदलितांना बुद्धधम्म-
    दिधला सोडविले
    हिंदू-
    धर्माच्या जाती,रुढीतून- लिहिले भारताचे
    संविधान
    त्याने बुद्ध -धम्माच्या मानवतेतून,
    उद्धारली कोटी कुळे
    आम्हा बहुजनांची
    मनुवादी लिखित ज्ञान
    मातीत गाडून,
    बहुजनांची आई ठरली आहे
    ती त्याग मूर्ती रमाई सांगतो आज ठासून,
    ज्या महामानवाला म्हणतो बाबा तोच
    आमचा बाप
    जगतो आम्ही त्यास हृदयात ठेऊन,

    नमो गौतमा......
    नमन रमाई......
    नमन भीमाय.....सुमित कांबळे ,रा नागपूर

    ReplyDelete