My Followers

Showing posts with label माझ्या कविता. Show all posts
Showing posts with label माझ्या कविता. Show all posts

Saturday, 7 July 2012

माझं प्रेमपत्र...!!!


माझं प्रेमपत्र...!!! 

 प्रयत्न माझा पहिला.... 
नकार मजला देवू नकोस...!!! 
प्रेमपत्र लिहिले मी...
 रागात ते फाडू नकोस...!!! 
पवित्र आहे माझे प्रेम... 
अर्थ वेगळा लावू नकोस...!!! 
उठता बसत आठवण तुझी ती... 
अशी हिरावून घेवू नकोस...!!! 
तुझ्या साठी झालो मी वेडा...
वाटेत मला सोडू नकोस...!!! 
प्रेम पत्र लिहिले मी... 
उत्तर द्यायला विसरू नकोस...!!!
नको ते वैभव, नको तो साज.. फक्त भेटायला ये आज... 
तुझा आणि फक्त तुझाच राज.......!!!  

वेडा चंद्र...!!!

वेडा चंद्र...!!!

कळी उमलण्याची चंद्र वाट पाहत होता...
कळी उमलनारच असा त्याचा विश्वास होता...!!!
कळी उमलण्याच्या प्रतीक्षेत  वेडा चंद्र रात्रभर जागाच होता....   
कळी उमलनारच असा त्याचा विश्वास होता...!!!
पहाट झाली कळी उमलली....
पण...... पण हे पाहण्यास चंद्र कोठे होता ?