देवदासी प्रथा...!!!

अनेक शतकापासून हिंदू धर्मानी मानवजातीत विचित्र परिस्थिती निर्माण केलेली आहे, त्यामूळे गतइतिहासात बहुजन वर्गाला आपला विकास साधणे कठिण झाले होते . आजसुद्धा ब्राम्हण्य वृत्तीने भारतात लोकशाही आणि धर्मनिरपेक्षतेला गंभीर धोका निर्माण केला आहे. पारंपरिक ग्रथांना झुगारून देण्याची गरज असू नही तसे घडत नाही . आज गावगाड्यात धर्मग्रंथांचे उदंड पीक आहे . ब्राम्हण्य वृत्तीने माणसाचे माणूस म्हणून महत्त्व कमी केले आहे . महाकाव्यातील सनातन सदंर्भ अर्थहीन आहेत. मनुष्यास जुनी परपंरा व रुढी नको आहेत. जुनी परपंरा वरुढीचा फायदा मूठभर ब्राम्हण्यास झाला आहे. ब्राम्हण्य वृत्ती भयगंडाने पछाडलेली, कर्मठ, पाशवी आणि आक्रमक आहे . ती माणसाची प्रतिष्ठा धुळीस मिळवणारी आहे . म्हणूनच इथला बहुजन वर्ग जातीच्या तळाशी विकलांग होऊन रुतला आहे. अनेक धोकादायक वळणं आली . माणसांना देवत्व देऊन धर्माची पद्धत रूढ झाली. बहुजण समाज धर्माच्या नांवाने दारोदार पोटासाठी वणवण भटकणारा भिकारी झाला. तोदेवदासी, पोतराज, वाघ्या-मुरळी झाला. बहुजन वर्गाची सामाजिक प्रतिष्ठा लयास जाऊन बहुजनसमूह उद्ध्वस्त झाला. धर्माच्या आणि देवदेवतांच्या नावांवर बहु जनवर्गातील स्त्रियांचा लैंगिक उपभोग घेण्यासाठी पुरोहित (ब्राम्हण) वर्गाच्या धार्मिक वर्चस्वाने बहुजण स्त्रियानां देवदासी बनवले.
देवदासी प्रथा भारतात सगळीकडे प्रचलित आहे . आज देवदासी म्हटले की वेश्या व्यवसायात असलेली स्त्री धनदांडग्यांच्या, सेठ सावकारांच्या रखेलीपणाचे अगं वस्त्र म्हणून राहणारी स्त्री. म. फूले म्हणतात, ’’ब्राम्हणांनी ईश्वराशी केवळ बरोबरी केली असे नव्हे, तर त्यांनी स्वतःला ईश्वरापेक्षा श्रेष्ठ मानले आहे.’’ ब्राम्हण सस्कृंती स्त्रियानां धर्म बधंनात अडकवून त्यांचे शोषण करण्याची मुभा देते . हिंदू धर्म अशा स्त्री शोषण पद्धतीला प्रोत्साहन देत आलेला आहे. या असस्कृंतपणाची नोंद घेताना मनु स्मृतीच्या स्त्री विषयक भूमिकेची चिकित्सा अनेक विचारवतांनी केलेली आहे.
प्राचीन भारतीय सस्कृंतीमध्ये स्वैर लैंगिक संबंध ठेवण्याची प्रथा होती. ब्रम्हदेवाने आपल्या मुलाची मुलगी पत्नी म्हणून स्वीकारली. तिला ब्रम्हदेवापासून नारद झाला. वसिष्ठाची मुलगी शतरूपा वसिष्ठाची पत्नी होती. रामाची बहीण यमी यमाला संभोग करण्याची मागणी करते . इद्रांची पत्नी उर्वशी अर्जुनाला संभोग करण्याची मागणी करते. जन्हूची मुलगी जान्हवी आपल्या बापाला पती मानत होती . इतकेच नव्हे तर उघड्यावर संभोग करणे, प्राण्याशी संभोग करणे अश्या प्रथा प्राचीन सस्कृंतीत प्रचलीत होत्या. स्वतःची पत्नी भाड्याने देण्याची प्रथासुद्धा होती.
मनुस्मृतीत स्त्रीविषयक विचार अत्यंत घृणास्पद आहेत.
मनुस्मृतीत स्त्रीविषयक विचार अत्यंत घृणास्पद आहेत.
स्त्रीची मानहानी आणि पुरुषी वर्चस्वाची महत्ता, त्याचा अहंकार सतत स्त्रीवर लादलेला आहे. (मनुस्मृती ३.३८) स्वभावतः स्त्रीया व्यभिचारणी, पुरुषाना उध्वस्त करणार्या कुलटा आहेत. (मनुस्मृती)
भारतीय सस्कृंतीची खर्या अर्थाने मानव मुक्तीच्या दिशेने वाढ झालेली नाही . याचा पहिला बळी म्हणजे अखंड स्त्री जात. अखंड स्त्रीत्वाला दास्यात सडवण्याची नामी शक्कल म्हणजे देवदासी प्रथा आहे. म्हणूनच सर्वच देव्या आजच्या काळात स्त्री वर्गाला आदर्श ठरू शकत नाहीत. धर्माकडून आलेली नीती , लोकसोयीसाठी वापर करू लागले. हा वापर प्रामुख्याने पुरोहित वर्गाकडून अधिक प्रमाणात होत असतो . व देव-देवीच्या नांवाने स्त्रीयाना देवदासी म्हणून सोडलं जाते. (- एम. एम. लांडगे )
देवदासी प्रथेवर कायद्याने बंदी असली तरी भारतात आजही मोठ्या प्रमाणावर ही प्रथा सुरू असल्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एका अहवालात म्हटले आहे. गुरूच्या सांगण्यावरून अनुसूचित जातीतील गरीब लोक आपल्या मुलींना देवाच्या भीतीपोटी देवदासी प्रथेत ढकलतात , असे या अहवालात म्हटले आहे.
जास्त गाजावाजा न होता , एखाद्या गुरूच्या घरी किंवा लहान देवळात हा विधी उरकण्यात येतो. अत्यंत गरीबी आणि धर्माचे बंधन यामुळे देवदासी ही पैसा कमविण्याची एक संधी या गरीबांना मिळते. देवदासी या ' ईश्वरी ' नावाखाली बहुतेक मुलींना 'शरीरविक्रयाचा धंदा' करावा लागतो. याविरूद्ध असलेल्या कायद्यांमध्ये खूपच पळवाटा आहेत , त्यामुळे कोणतीही कारवाई करता येत नाही. धक्कादायक बाब म्हणजे ' कर्नाटक देवदासी प्रोहिबिशन अॅक्ट ' खाली अद्याप एकही तक्रार नोंदविली गेली नाही , असे अहवाल सांगतो.
देवदासी म्हणून वेश्या व्यवसायात ढकलल्या जाणाऱ्या मुलींना पोलिस तपासाची आणि सामाजिक कार्यर्कत्यांची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. दलाल आणि गुरू यांच्यातील साखळीतोडणेही जरूरीचे आहे. देवदासींना नुसते मुक्त करून चालणार नाही तर त्यांचे पुनर्वसन व्हायला हवे. अनेक स्त्रियांकडे पैसा नसतो , घर , जमीन काहीच नसते. अत्यंत कमी मोबदल्यात त्यांना राबवून घेतले जाते. त्यांचा आत्मविश्वास परत मिळवण्याची आणि समाजात मानाचे स्थान देण्याची गरज आहे.
या प्रश्ानबाबत राजकारणी फारच उदासीन दिसतात. केंद सरकारने यात विशेष लक्ष पुरवून महिलांचे योग्य पद्धतीने पुनर्वसन केले पाहिजे , अशी अपेक्षाही या अहवालात बोलून दाखविली आहे. राज्य सरकारने सध्या असलेले कायदे सुधारले पाहिजेत त्यातल्या पळवाटा शोधून त्यांना आळा घातला पाहिजे. देवदासी पद्धतीवर निष्कर्ष काढताना अहवालात असे म्हटले आहे की , ही पद्धत फक्त अनुसुचित जातीजमातींच्या महिलांचे शारीरिक शोषण करीत नाही तर धर्म आणि रूढींचे भयानक रूप दाखविते.
महाराष्ट्र देवदासी प्रथा प्रतिबंध व निर्मूलन कायदा...!!!
महाराष्ट्रात आढळणार्या काही अनिष्ट प्रथांमध्ये देवदासी प्रथा समाविष्ट आहे. पूर्वी ही प्रथा बर्याच प्रमाणात आढळत असे. शासनाने तिला आळा घालण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजनांमुळे तिचे मोठ्या प्रमाणावर निर्मूलन झाले आहे. या प्रथेचे निर्मूलन करण्यासाठी महाराष्ट्र देवदासी प्रथा प्रतिबंध व निर्मूलन कायदा करण्यात आला. हा कायदा अतिशय सर्वसमावेशक असून त्यात या प्रथेला प्रोत्साहन देणारी व्यक्ती कारावास व दंड अशा दोन्ही प्रकारच्या शिक्षेला पात्र ठरविण्यात आली आहे. या कायद्यात देवदासी प्रतिबंधक अधिकारी नेमण्याची तरतूद असून त्यास देवदासी प्रथेला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. तसेच राज्यस्तरावर देवदासी प्रथेच्या निर्मूलनासाठी नियंत्रण मंडळ व जिल्हास्तरावर जिल्हा देवदासी निर्मूलन समिती स्थापन करण्याचीही त्यात तरतूद आहे.
कायदा कोणासाठी व कशासाठी?
महाराष्ट्रातील सर्व हिंदू मंदिरे किंवा धार्मिक स्थळे, जिथे देवदासी म्हणून स्त्रियांना अर्पण करण्याची प्रथा आहे, तेथील या प्रथेला आळा घालण्यासाठी हा कायदा अंमलात आला आहे.
महत्वाच्या बाबी :
- या कायद्यानंतर कुठल्याही रूढी वा पद्धतीनुसार स्त्रियांना देवदासी वा जोगतीण म्हणून दान करणे गुन्हा ठरतो.
- देवदासी प्रथेचा प्रसार करणे, त्या समारंभात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या मदत करणे सुद्धा गुन्हा आहे.
- पूर्वी देवदासी झालेल्या स्त्रीने विवाह केल्यास तिचा विवाह व अपत्ये कायदेशीर ठरतील.
- एव्हाना, एखादा पुरुष देवदासी झालेल्या स्त्रीबरोबर एकाच घरात पर्याप्त काळापर्यंत पती-पत्नी भावनेने राहत असल्यास त्यांचा विवाह झाला आहे असेच गृहीत धरण्यात येईल, अशा विवाह संबंधातून निर्माण झालेली संततीसुद्धा वैध ठरेल व त्या अपत्यांना वडिलांच्या व्यक्तिगत कायद्यानुसार सर्व वारसाहक्क प्राप्त होतील.
कायद्याच्या अंमलबजावणीसाठीच्या समित्या :
- राज्यस्तरावर देवदासी प्रथेच्या निर्मूलनासाठी नियंत्रण मंडळ स्थापन करण्यात येईल. त्याचा अध्यक्ष किमान जिल्हा न्यायाधीश असणारीच व्यक्ती असेल.
- बाकी दोन सदस्यांमध्ये एक सदस्य महिलांच्या समस्यांचे निराकरण करणारी व्यक्ती, तर दुसरे शासनाचे महिला व बाल विकास आयुक्त असतील.
- तसेच जिल्हास्तरावर जिल्हा देवदासी निर्मूलन समिती निर्माण करण्यात येईल. जिचा अध्यक्ष जिल्ह्याचा मुख्य न्यायदंडाधिकारी असेल तर दोन सदस्यांपैकी जिल्हा बाल व महिला विकास अधिकारी एक सदस्य असेल तर दुसरा सदस्य महिलांच्या समस्यांचे निराकरण करणारी तज्ज्ञ व्यक्ती असेल.
- या नियंत्रण मंडळाला व जिल्हा समितीला दिवाणी न्यायालयाचे सर्व अधिकार असतील.
- न्यायालय, ज्या व्यक्ती किंवा संस्थेला एखादी स्त्री देवदासी म्हणून समर्पित करण्याच्या गुन्ह्यास जबाबदार धरेल, त्याच व्यक्तिला वा संस्थेला त्या देवदासीच्या पुनर्वसनाचा व निर्वाह खर्च द्यावा लागतो.
- कोणत्याही धर्मसंस्थेचा व्यवस्थापक वा प्रशासक देवदासी प्रथेचा प्रसार करणे, देवदासी समर्पित करणे इत्यादी गुन्हे करीत असल्यास त्याचे पद काढून घेण्यात येण्याची शिफारस करण्याचे अधिकार देवदासी नियंत्रण मंडळास आहेत.
- संपूर्ण राज्याकरिता वा विशिष्ट भागाकरिता एक देवदासी प्रतिबंधक अधिकारी नेमण्यात येईल.
- त्याला देवदासी प्रथेला प्रतिबंध घालण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे सर्व अधिकार आहेत.
शिक्षा कोणाकोणाला व कशी असेल ?
- जी व्यक्ती स्वत:च्या नियंत्रणाखाली देवदासी म्हणून एखाद्या स्त्रीला समर्पित करण्याचा समारंभ पार पाडेल वा त्यास परवानगी देईल वा त्यात प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष सहभागी होईल. त्यास २ वर्षे ते ३ वर्षे कैद व १० हजार ते ५० हजार रुपयांपर्यंत दंड ही शिक्षा होऊ शकेल.
- अशी व्यक्ती जर संबंधित स्त्रीचा जवळचा नातेवाईक असेल तर शिक्षा दोन ते पाच वर्षे कैद, ५० हजार रुपयांपर्यंत दंड एवढी असेल. (किमान दंड १० हजार रुपये)
- देवदासी प्रथेचा प्रसार करणारी व्यक्ती एक ते तीन वर्षांपर्यंत कैद व ५० हजार पर्यंत दंड अशा शिक्षेस पात्र राहील.
- जो कोणी या कायद्यांतर्गत समित्यांनी दिलेल्या हुकूमांचे पालन करणार नाही, त्यास सहा महिने कैद व १० हजार रुपयांपर्यंत दंड अशी शिक्षा होईल.
- समित्याच्या हुकूमांचे पालन न करणे, हा गुन्हा सोडला तर वरील इतर सर्व गुन्हे अजामीनपात्र व दखलपात्र आहेत.
- विशेष म्हणजे गुन्हा झाल्यापासून लवकरात लवकर तक्रार नोंदविणे व संबंधित पोलिस अधिकारी किंवा समिती अधिकार्यांनी अशा गुन्ह्यांची दखल घेणे आवश्यक आहे.
धर्म आणि रूढींचे भयानक रूप दाखवत महिलांचे शारीरिक शोषण केल्या जाणा-या देवदासी प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी सरकारने दमदार पाऊल टाकले आहे. देवदासी, जोगती, जोगतिणी व त्यांच्या मुलींना या कुप्रथेतून बाहेर काढण्यासाठी अनेक योजना राबवत त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प सरकारने सोडला आहे.
देवदासी प्रथेवर कायद्याने बंदी असली तरी भारतात आजही मोठ्या प्रमाणावर ही प्रथा सुरू असल्याचे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने एका अहवालात म्हटले आहे. गुरूच्या सांगण्यावरून गरीब लोक आपल्या मुलींना देवाच्या भीतीपोटी देवदासी प्रथेत ढकलतात, असेही या अहवालात म्हटले होते. त्याची दखल घेत राज्य सरकारने ही प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी 1 मार्च रोजी अध्यादेश काढला आहे. त्यानुसार देवदासी व त्यांच्या मुलींच्या विवाहासाठी 25 हजार रुपये तर वधू पदवीधर असल्यास त्याच्या बँक खात्यात 50 हजार रुपये दिले जाणार आहेत. यासाठी यापूर्वी केवळ 10 हजारांचे अनुदान मिळत असे. तसेच अनाथालये, शासकीय राज्यगृहे, आधारगृहे, सुधारित माहेर योजनेअंतर्गत कार्यरत संरक्षणगृहे, अल्पमुदती निवासगृहे, शासन अनुदानित संस्थांतील बालगृहात कार्यरत असलेल्या निराश्रित मुलींच्या विवाहासाठी 25 हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. यासोबतच देवदासींच्या कल्याणाचे काम करणा-या व्यक्ती व संस्थांना दिल्या जाणा-या दिवंगत लताबाई सकट पुरस्काराची व्याप्ती वाढवत आता हा पुरस्कार व्यक्तीला 1 लाखाचा, तर दोन संस्थांना प्रत्येकी 50 हजारांचा करण्यात आला आहे. या योजना जिल्हा महिला व बालविकास अधिका-यामार्फत राबवण्यात येणार आहेत.
राज्य सरकारने चालू महिन्यात ही कुप्रथा बंद करण्यासाठी घसघशीत मदत करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्यापूर्वीच जानेवारी 2012 मध्ये केंद्र सरकारनेही त्यासाठी विडा उचलला आहे. त्यांच्याकडून देवदासी पुनर्वसन योजना राबवली जात असून, देशातील सर्व देवदासींना दोन हजार मासिक भत्ता व सर्व मूलभूत सोयी असलेली घरे उपलब्ध करून दिली जाणार आहेत. तसेच त्यांना व्यवसाय प्रशिक्षण आणि लघुउद्योगासाठी अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्याचा सामाजिक न्याय व सबलीकरण मंत्रालयाचा मानस आहे............!
"देवदासी" प्रथा हि ब्राम्हणांचीच देण आहे, ह्यात शंका घेण्याचे कारणच नाही, देवदासी ह्या प्रथेला बळी पडणारा जो महिला वर्ग होता तो म्हणजे शुद्रादि अतिशुद्र महिला, ब्राम्हणांनी देवाला वाहिलेली स्त्रि देवदासी ह्या गोंडस नावावर शुद्रादि अतिशुद्र महिलांना वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त करणे ह्या सारखा क्रुर माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार सबंध जगात कोठेही घडलेला नसेल. उलट्या काळजाच्या ह्या ब्राम्हणांनी स्वत:ची वासनापूर्ति करण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जातात हा कोणिही कल्पना विस्तार समजु नये. ब्राम्हण ह्यावेळी हि हिच भाषा करतील कि ह्या त्यांचा काय दोष आहे म्हणून, त्यांनी एखादा अपराध देवाच्या नावावर करायचा आणी अपराधाचे ओझे सुध्दा व्हायचे नाही हे त्यांच्या मेंदुचे सर्वात मोठे कसब आहे.
आपल्या भारत देशातील कोणत्याही आया बहिणिंनी अशा प्रथेला बळी पडण ह्याचे समर्थन करणे म्हणजे आपणही त्या माणुसकी हिन क्रुर प्रकारा मध्ये सहभागी होण्यासारखे आहे. माझी आपल्या भारत
देशातील माझ्या मराठा, ब्राम्हण आया बहिणिं बाबत पण हिच भावना आहे. ब्राम्हण काय कोणत्याच स्त्रि ने ह्या प्रथेचे बळी होणे ह्याचे समर्थन होवु शकत नाही. समस्त देवदासी प्रथे मध्ये फक्त शुद्र आणि अती शुद्रांच्या घरातील महिला शिकार होत होत्या होत आहेत आणि होत राहतील, उच्च वर्णिय कोणतिही स्त्रि ह्या प्रथे मध्ये आढळत नाही. माझा मुद्दा हाच आहे कि ब्राम्हणांनी च सुरू केलेली हि देवदासी प्रथा स्वत: ब्राम्हण पुढाकार घेवुन बंद करत का नाहीत? का ह्यांच्या स्त्रिया ह्या प्रथेच्या बळी नाहीत म्हणून सोईस्कर पणे शिकार झालेल्या ह्या महिला ह्यांना ह्यांच्या आया बहिणी वाटत नाही का ?
- राज जाधव....!
संदर्भ - महाराष्ट्र देवदासी प्रथा प्रतिबंध व निर्मूलन कायदा...!!!
एम.एम.लांडगे (http://www.islamdarshan.org/node/975)
जबरदस्त लेखं ...या प्रथेबद्दल कायदा काय आहे तो ही समजला धन्यवाद राज सर !!!!
ReplyDeleteNilesh tuze abhar...Kayda Asunhi, devachya bhitine aaj hi lok, ya prathela changli gosth samjtat hich khari khant ahe...!
ReplyDeleteबौद्ध काळात ज्या स्त्रिया भिक्खुनी झाल्या त्या बौद्धविहारात रहात असतआणि ३रया शतकामध्ये Tantric Buddhisam नावाचा प्रकार बुद्धधर्मात सुरु झाला पुढे त्याला वाज्रायना हे नाव पडले रजनीश यांची शिकवण व हा पंथ याच्या शिकवणुकीत बरेच साम्य आहे नंतर मुस्लिम आक्रमणामुळे बौद्धधर्म नष्ट झाला आणि बौद्धविहाराचे रुपांतर हिंदू देवळामध्ये झाले आणि त्या बौद्ध nuns देवदासी बनल्या कारण बौद्धपूर्वं जे वैन्ग्मय उपलब्ध आहे उदा कौटिल्य वात्सायन इ मध्ये देवदासीचा कोठेही उल्लेख नाही (संधर्भ Rise and Fall ऑफ Buddist Nuns world fellowship Buddhist review २०००) उगीचच ब्राह्मणलोकांवर भुंकत जाऊ नका
ReplyDeleteमुस्लिमाच्या आक्रमणानंतर बुद्ध लोक पळून गेले ते नेपाल भूतान सिक्कीम तिबेटमध्ये, जे इथे राहिले ते मुस्लिम झाले स्त्रिया देवदासी झाल्या. तिबेटमध्ये हा तांत्रिक बुद्धिझम अगदी १९५० सालपर्यंत चालू होता तो थेट चीनच्या तिबेटवरील आक्रमनापर्यंत तांत्रिक बुद्धिझमचे स्वरूप काय असेल ते रजनीश यांचे संभोगातून समाधीकडे ह्या पुस्तकावरून साधरण कल्पना येईल देवदासी प्रथेविरुद्ध राममोहन रोय सी पी रामस्वामीअय्यर कृष्णन नय्यर ईश्वरचंद विद्यासागर न्यायमूर्ती रानडे धोंडो केशव कर्वे आणि अगदी नरेंद्र दाभोलकर यांच्यापर्यंत ब्राह्मण लोकांनी' आंदोलने केलेली आहेत, ब्राम्हण लोकांवर भुंकत राहणे हि सद्या fashion आहे त्याचे तुम्ही बळी आहात ,
ReplyDeleteऋग्वेदाचे प्रथम सुक्त त्याचा ऋषी विश्वामित्र हा क्षत्रिय तसेच अनेक सूक्तांचे ऋषी क्षत्रिय मग वेद एकट्या ब्राह्म्नांचा कसा काय ???? लग्न न करता ज्या व्यासांनी ४ पोरे चौघींच्या पोटी जन्माला घातली त्या व्यासांचे धर्मग्रंथ प्रमाण मानायचे का ???
ReplyDelete