* भिमा तुझ्या जन्मामुळे *
उद्ध् रली कोटी कुळे,
भिमा तुझ्या जन्मामुळे !! ध !!
एक ज्ञान ज्योतीने कोट कोट ज्योती
तळपतात तेजाने तुझ्या धरेवरती
उजळे, काळोख मावळे,
भिमा तुझ्या जन्मामुळे !! १ !!
जखडबंद पायातील साखळदंड
तटातट तूटले तु ठोकताच दंड
झाले गुलाम मोकळे,
भिमा तुझ्या जन्मामुळे !! २ !!
कुजे वृक्ष तैसा होता समाज
हिरवी हिरवी पाने तयालाच आज
अमृताची आली फळे
भिमा तुझ्या जन्मामुळे !! ३ !!
धम्म चक्र फिरले, गेला कंलक
ज्ञानदाता झाला आज रावास रंक
पंकी सुगंध दरवळे
भिमा तुझ्या जन्मामुळे !! ४ !!
काल कवडीमोल जिणे वामनचे होते
आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते
बुद्धाकडे जनता वळे
भिमा तुझ्या जन्मामुळे !! ५ !!
भिमा तुझ्या जन्मामुळे !! ध !!
एक ज्ञान ज्योतीने कोट कोट ज्योती
तळपतात तेजाने तुझ्या धरेवरती
उजळे, काळोख मावळे,
भिमा तुझ्या जन्मामुळे !! १ !!
जखडबंद पायातील साखळदंड
तटातट तूटले तु ठोकताच दंड
झाले गुलाम मोकळे,
भिमा तुझ्या जन्मामुळे !! २ !!
कुजे वृक्ष तैसा होता समाज
हिरवी हिरवी पाने तयालाच आज
अमृताची आली फळे
भिमा तुझ्या जन्मामुळे !! ३ !!
धम्म चक्र फिरले, गेला कंलक
ज्ञानदाता झाला आज रावास रंक
पंकी सुगंध दरवळे
भिमा तुझ्या जन्मामुळे !! ४ !!
काल कवडीमोल जिणे वामनचे होते
आज जुळे जगताशी प्रेमाचे नाते
बुद्धाकडे जनता वळे
भिमा तुझ्या जन्मामुळे !! ५ !!
No comments:
Post a Comment