बाबासाहेबांचे विचारधन ....!!!
बाबासाहेबांचे विचारधन हे संपूर्ण समाजासाठी आहे. या विचारातील सत्य आणि सार्वत्रिक कल्याणाची भावना समाजाचा उद्धार करणारी आहे.
बाबासाहेबांचे विचारधन हे संपूर्ण समाजासाठी आहे. या विचारातील सत्य आणि सार्वत्रिक कल्याणाची भावना समाजाचा उद्धार करणारी आहे.
खाली मान घालून जाणाऱ्या मेंढराच्या अवाढव्य कळपापेक्ष्या वीर वृत्तीची घडण असणाऱ्या सिंहाचा छोटा कळप बलवत्तर, म्हणून वीरवृत्ती अंगी बाळगा....!!!
मी राष्ट्राची चोख कामगिरी बजावली, अशी माझी खात्री आहे. आपण मला देवपदाला चढवू नका. एखाद्या व्यक्तीला देवपदाला चढवून इतरांनी आंधळेपणाने त्याच्या मागे धावत जाणे, हे मी कमकुवतपणाचे लक्षण मानतो....!!!
हिंसा म्हणजे मन दुखविणे असेल तर, गांधीची अहिंसा हि एक हिंसाच होय. खरे तर शक्य असेल तोवर अहिंसा व जरूर पडेल तेव्हा हिंसा असेच धोरण सत्याग्रही माणसांनी ठेवावे....!!!
तुम्ही सर्वांनी खात्री बाळगली पाहिजे कि, तुमचा उद्धार करण्यास दुसरा कोणीही येणार नाही किंवा मीही करणार नाही, जर मनात आणाल तर तुमचा उद्धार तुम्हीच करून घेण्यास समर्थ व्हाल...!!!
जातीभेदावर कुर्हाड घालून अस्पृश्तेचे पाप मुळातच मारून टाकणारा जर एखादा धर्मवीर आपल्या देश्यात अवतरला असेल तर तो एकटा गौतम बुद्धच होय...!!!
"दे गं बाई जोगवा" म्हणून हक्क मिळत नसतात. भिक्षा मागून किंवा इतरांच्या बुद्धीवर अवलंबून राहून हरण केलेले सत्व परत येत नाही. त्या कामी आपले तेज प्रकट केले पाहिजे. बकऱ्याला बळी देतात, सिंहाला नाही. तुमच्यात तेज आहे पण तुम्हाला त्याची जाणीव नाही. तुम्ही कोंबड्या, बकऱ्या सारखे नाहीत. "वैराटगाढ" जिंकणारा नागनायक, खरड्याच्या लढाईत नाव गाजविणारा सिदनाक महार, रायगढचा किल्ला इंग्रजांविरुद्ध लढविणारा रायनाक बाजी महार, यांची आठवण ठेवा...!!!
तुम्ही जे पुढारी निवडाल व ज्यांच्यावर तुम्ही विश्वास ठेवाल ते तुमचे खरे मार्गदर्शक होतील, असे पहा. तुमचे हित व त्यांचे हित एकच असेल व जे स्वार्थी नसतील असेच पुढारी तुम्ही निवडा. दुसऱ्या पक्षाच्या ओंजळीने पाणी पिणारे किंवा त्यांची भाडोत्री कामे करणारे लोक तुमची केवळ फाटाफूट करतील व दिशाभूल करतील, ते तुम्हास दगा दिल्याशिवाय राहणार नाहीत. तरी असल्या नामधारी पुधाऱ्या पासून लांब राहा...!!!
अडाणी आई बापाच्या पोटी जन्म घेऊन जर आपण पदवीधर झालात, तर त्याचा दुराभिमान बाळगू नका, आपल्या कर्तुत्वाची जाणीव ठेवून झटून अभ्यास करा व अधिकाधिक पुढच्या पायऱ्या गाठा...!!!
शिक्षण हे वाघिणीचे दुध आहे, ते जो प्राशन करील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही....!!!
मनुष्य कितीही विद्वान असला तरी तो जर इतरांचा तिरस्कार करण्या इतका स्वतला मोठा माणू लागला, तर तो हातात मेणबत्ती धरलेल्या अंधळ्या माणसा सारखा आहे. स्वत आंधळा असलेला इतरांना प्रकाश तो काय देणार ?
जर भिक्खू हा केवळ परिपूर्ण असा माणूस आहे असे मानले, तर "बुद्धिझम" च्या प्रचारार्थ त्याचा काही उपयोग होत नाही. तो जरी स्वयंपूर्ण माणूस झाला तरी तो व्यक्तिवादी माणूस असतो, जर का भिक्खू समाजसेवक असेल तर "बुद्धिझम" ला अशा आहे...!!!
ज्या भूमीने बोैद्ध धर्मासारखी उदात्त देणगी जगाला दिली, त्या या थोर भूमीचा मी दूत आहे आणि तिचा तो श्रेष्ठ वारसा चालविण्याची जबाबदारी माझ्यावर आहे। मी महाराष्ट्रीय नाही किंवा महारही नाही. मी भारतीय आहे आणि माझ्या या जन्मभूमीचे पांग फेडण्यातच माझ्या जीवनाचे सार्थक आहे....!!!
ब्राह्मणांशी माझे काही वैर नाही। माझा विरोध दुसऱ्यांना हीन समजण्याच्या द्ुष्प्रवृत्तीला आहे. भेदभाव मानणाऱ्या ब्राह्मणेतरांपेक्षा नि:पक्ष वृत्तीचे ब्राह्मण मला अधिक जवळचे वाटतात. आपल्या आंदोलनात सहकार्य देणाऱ्या अशा ब्राह्मणांना मी दूर लोटू शकत नाही.....!!!
आज जरी आम्ही राजकीय, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वेगवेगळ्या गटांत विभागले गेलो तरी मला खात्री आहे की, अनेक जाती-पंथ असूनदेखील आम्ही "एक राष्ट्र' म्हणून उभे राहू। एक दिवस असाही येईल की, फाळणीची मागणी करणाऱ्या मुस्लिम लीगला पण "अखंड भारत'च आपल्या हिताचा वाटू लागेल.....!!!
काही शिकलेल्या, नोकरीवर लागलेल्या पांढरपेशे लोकांनी तर समाजाची नाळच तोडून टाकली आहे. म्हणून बाबासाहेब हयात असतांना गहिवरुन म्हणाले की, मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला. मला वाटलं होतं, की हे लोक शिकून आपल्या समाजाचा विकास करतील. पण मी पाहतो आहे की हे स्वत:चाच विकास करण्यात गुंतले आहेत. त्यामुळे माझ्या खेड्यातील लोकांच कसं होईल. आता मी काठी टेकवत टेकवत खेड्यात जाईन व माझ्या गोरगरीब खेडूत लोकांच जीवनमान सुधरवीन.’
माझे सामाजिक तत्त्वज्ञान हे निश्चितपणे तीन शब्दांत गुंफले जाण्याचा संभव आहे। ते शब्द म्हणजे स्वातंत्र्य, समता व बंधुभाव. तथापि, हे माझे तत्त्वज्ञान फें्रच राज्यक्रांतीपासून मी उसने घेतले असे कोणीही समजू नये. माझ्या तत्त्वज्ञानाची मुळे धर्मात आहेत, राज्यशास्त्रात नाहीत. माझा गुरू बुद्ध, याच्या शिकवणुकीपासून ते मी काढले आहे.....!!!
जगण्याचे अनेक मार्ग आहेत, पण ते सारेच सारख्या मान्यतेचे आहेत असे नाही। शत्रू आला असता, त्यावर चाल करून त्याचा पाडाव करणे हा जगण्याचा एक मार्ग आहे. तसेच त्याला शरण जाऊन तो घालील त्या अटींवर जगणे हा जगण्याचा दुसरा मार्ग आहे. दोहोंपैकी कोणत्याही मार्गाने गेले असता जगणे होतेच, पण एका परीचे जगणे हे दुसऱ्या परीच्या जगण्यापेक्षा फार निराळ्या तऱ्हेचे असते. एक मानवाचे जिणे आहे, तर दुसरे किड्याचे जिणे आहे.....!!!
देशाच्या राज्यकारभारात प्रत्यक्ष अगर अप्रत्यक्षरीतीने भाग घेऊन तो आपल्या ध्येयास अनुकूल बनविल्याशिवाय कोणत्याही गांजलेल्या वर्गास आपली दु:खे दूर करता येणार नाहीत। दुसरा कोणी आपल्या हिताकरिता काही करील, या आशेवर जर गांजलेला व पिळला गेलेला वर्ग विसंबून राहील, तर तो तोंडघशी पडल्याशिवाय राहणार नाही.....!!!
आपल्याला ज्या मार्गाने जावयाचे आहे, तो मार्ग चिरस्थायी असावा। जो मार्ग अराजकतेकडे जातो, जो जंगलाकडे नेतो, असा मार्ग अनुसरण्यात काही अर्थ नसतो. जो मार्ग आपणास आपल्या इसिप्त ध्येयाप्रद सुरक्षित पोचवितो, जो आपले जीवन बदलवितो, असा मार्ग कितीही लांबचा असला तरी तो जवळच्या मार्गापेक्षा निश्चितच श्रेयस्कर असतो.
कार्ल मार्क्स अगर कम्युनिस्ट-कम्युनिझमचे ध्येय साध्य करण्याकरिता म्हणजेच गरिबी निवारण्यासाठी, खाजगी मालमत्ता नष्ट करण्यासाठी विरोधकांची हत्या करणे, त्यांना ठार मारणे हे साधन वापरू इच्छितात आणि येथेच बुद्धिझम आणि कम्युनिझममधील मूलभूत फरक आहे। भगवान बुद्धाचे मार्ग लोकांना हिंसेपासून परावृत्त करण्याचे, युक्तिवादाने पटवून देण्याचे, नैतिक शिकवण देण्याचे व ममतेचे आहेत. कम्युनिस्ट पद्धती ही पाशवी शक्तीवर आधारलेली आहे. कम्युनिस्ट पद्धती रशियन लोकांनी राजीखुषीने स्वीकारलेली नाही. त्यांनी ती भीतीमुळे स्वीकारलेली आहे. यादृष्टीने पाहिले तर बुद्धिझम शुद्ध लोकशाहीवादी आहे. अभ्यासू वृत्तीने बुद्धिझम व कम्युनिझमचा दीर्घकाळ अभ्यास करून मी या ठाम निर्णयास आलो आहे की, मनुष्यमात्राचे दु:ख निवारण्यासाठी जो बुद्धाने उपदेश केला आहे व जी पद्धती सांगितली आहे, ती अतिशय सुरक्षित व पक्की आहे.....!!!
शेतकऱ्यांच्या दारिद्र्याचे प्रत्यक्ष कारण जमिनीची लहान-लहान तुकड्यांनी होणारी विभागणी हे असून, त्यामुळे तिथे हे भांडवल गुंतवण्यास व सुधारलेल्या पद्धतीने शेती करण्यास वाव मिळत नाही। जमिनीचे तुकडे व त्यामुळे शेतकरीवर्गात वावरणारे दारिद्र्य याचे मुख्य कारण म्हणजे वाढत्या लोकसंख्येला केवळ जमिनीवरच अवलंबून राहावे लागते हे होय आणि जमिनीवर अवलंबून राहणाऱ्या जादा लोकसंख्येच्या पोषणाची शेतीव्यतिरिक्त इतर व्यवसायात तजवीज लावल्यावाचून शेतकऱ्यांचे दारिद्र्य हटणार नाही. म्हणून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी व त्यांची उत्पादनशक्ती वाढविण्यासाठी उद्योगधंद्यांची वाढ करणे हे मुख्य साधन आहे. चालू उद्योगधंद्यांचे पुनरुज्जीवन आणि कच्च्या मालाच्या अनुरोधाने नव्या उद्योगांची निर्मिती या दोन्हींची आवश्यकता आहे.....!!!
हिंदी मुसलमानदेखील एक अजब चीज आहे। सर्व सामाजिक सुधारणेचे त्याला वावडे आहे. हिंदुस्थानाबाहेरील त्याचे धर्मबंधू समाजक्रांतीवादी बनले आहेत. राष्ट्राच्या व मानवी जीवनाच्या सामाजिक प्रगतीला अडथळा करणाऱ्या सर्व चालीरीतींचा मुस्ताफा केमाल पाशासारख्या मुसलमान देशभक्ताने धुव्वा उडवून दिला आहे, पण हिंदी मुसलमानांना मौ. शौकतअल्लीसारख्या देशभक्त व राष्ट्रीय हिंदी मुसलमानांनादेखील केमालपाशा व अमानुल्ला आवडत नाहीत. कारण ते सुधारक आहेत आणि हिंदी मुसलमानांच्या धार्मिक दृष्टीला सुधारणा हे तर महत्पाप वाटते.....!!!
खराखुरा आदर्श समाज निर्माण करावयाचा असेल तर जातींना नष्ट करणे अत्यावशक होय व जाती हया धर्मशास्राच्या आधारावर टिकविण्यात आल्या आहेत. तेव्हा धर्म म्हणून शास्रांचे शब्दप्रामाण्य नष्ट करणे हाच जातीचा विनाश करण्याचा खराखुरा मार्ग आहे." मुळात हिंदू धर्म नसून तो केवळ एक जातिंचा संग्रह आहे....!
पाश्चिमात्य राष्ट्रे पौर्वात्य राष्ट्रांकडे चढेल दृष्टीने पाहतात, ह्याचे कारण त्यांचे आर्थिक नि औद्योगिक बळ हेच होय. यास्तव माझे असे मत आहे की, भारताची जेव्हा आर्थिक नि औद्योगिक शक्ती वाढेल, तेव्हा साम्राज्यवाद नि काळ्या-गोऱ्यांचे वाद हे मिटतील.....!!!
माझी दैवते तीन आहेत। पहिले दैवत विद्या होय. विद्येशिवाय माणसाला शांतता नाही आणि माणुसकीही नाही. दुसरे दैवत विनय होय. मी कोणाची याचना केली नाही. माझे ध्येय असे आहे की, माझं पोट भरलं पाहिजे आणि माझ्या लोकांची सेवा केली पाहिजे. माझे तिसरे दैवत म्हणजे शील होय. माझ्या आयुष्यात मी दगाबाजी, फसवणूक, आत्मसिद्धीकरिता पाप केलंं असं मला आठवत नाही. शीलसंवर्धन हा गुण माझ्यात मोठ्या प्रमाणात आहे, हे सांगायला मला फार अभिमान वाटतो....!!!
मी प्रथम भारतीय आहे. मी तापट आहे. सत्ताधारी लोकांशी माझे अनेक खटके उडाले, राजकीय संघर्ष झाला, पण हे आमचे कौटुंबिक भांडण आहे. म्हणून मी परदेशात भारताबद्दल कडवट बोलणार नाही. देशहित प्रथम. मी माझ्या देशाशी कधीही द्रोह करणार नाही.....!!!
अस्पृश्यता ही मूर्तिमंत असमानता आहे। एवढी मोठी असमानतेची जागती ज्योत कोठेच दिसावयाची नाही. एका माणसाला दुसऱ्या माणसाने त्याला न शिवण्याइतका पतित लेखण्याची प्रथा हिंदू धर्माखेरीज व हिंदू समाजाखेरीज कोठेही सापडेल काय? ज्याच्या स्पर्शाने पाणी बाटते, ज्याच्या स्पर्शाने देव बाटतो, तो प्राणी मानवाच्या कोटीत गेला आहे असे कोणी म्हणेल काय? एवढा कलंक तुमच्या शब्दाला, तुमच्या शरीराला आहे.
तरुणांची धर्मविरोधी प्रवृत्ती पाहून मला दु:ख होते। काही लोक म्हणतात, धर्म ही अफूची गोळी आहे, परंतु ते खरे नाही. माझ्या ठायी जे चांगले गुण वसत आहेत, ते किंवा माझ्या शिक्षणामुळे, समाजाचे जे काही हित झाले असेल ते माझ्यासाठी असलेल्या धार्मिक भावनेमुळेच होय. मला धर्म हवा आहे. धर्माच्या नावाने चाललेला ढोंगीपणा नको....!!!
ब्रिटिशसत्ता स्थिरावल्यापासून भारतात गेल्या शतकात एकंदर एकतीस दुष्काळ पडले व त्यात सुमारे अडीच ते तीन कोटी लोक भुकेने मेले. याचे कारण असे की, आपल्या देशात उद्योगधंदे व व्यापार यांची वाढ होऊ द्यायची नाही व हिंदुस्थानातील व्यापारी पेठा सदैव खुली राहावी, असे ब्रिटिश राज्यकारभाराचे बुद्धिपुरस्सर धोरण आहे. ब्रिटिशांनी सुधारलेली विधिपद्धती आणि सुव्यवस्था ह्यांची देणगी हिंदुस्थानास दिली ही गोष्ट खरी. तथापि मनुष्य केवळ विधीवर आणि सुव्यवस्थेवर जगत नाही, तर तो अन्नावरही जगतो.....!!!
सत्तेचे राजकारण खेळण्यासाठी किंवा एखाद्या मंत्र्याची जागा रिकामी झाली असता ती आपणाकडे ओढून घेण्याची प्रधानमंडळातील सभासदात जी जिवापाड धडपड चालू होई, त्यापासून मी पूर्णपणे अलिप्त राहत असे। मूकावस्थेत राहून सेवा करणे हेच श्रेष्ठ कर्तव्य होय, असा माझा विश्वास आहे.....!!!राजकारण कोणास करावयाचे असेल, तर राजकारणाचा चांगला अभ्यास केला पाहिजे। आपल्या समाजातील प्रत्येक कार्यकत्यार्ंने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक या सर्व प्रश्नांचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे. ज्यांना पुढारी व्हायचे असेल, त्यांनी पुढाऱ्यांची कर्तव्यकर्मे व जबाबदारी काय आहे, याचा बारकाईने अभ्यास केला पाहिजे.....!!!
मार्क्स वाचून काही कामगार पुढारी असे गृहीत धरतात की, भारतात मालक आणि नोकर असे केवळ दोनच वर्ग आहेत आणि भांडवलशाही नष्ट करण्याची आपली मोहीम ते सुरू करतात। या दृष्टीत दोन ढोबळ चुका आहेत. जी बाब संभवनीय आहे किंवा आदर्श आहे, तिला वास्तविक म्हणण्याची पहिली चूक ते करतात. सर्व समाजातील माणसे अर्थ प्रवृत्तीचे, बुद्धिवादी किंवा न्यायप्रिय आसतात, हे म्हणणे जसे खोटे, तसेच सर्व समाजात केवळ दोनच वर्ग असतात, असे समजणेही खोटे आहे. भारतात असे सापेक्षपणे निश्चित असे दोन वर्ग अस्तित्वात नाहीत.....!!!
खूप वर्षापूर्वी सुधारक, दुर्धारक, जहाल, मवाळ लोकांनी राष्ट्राच्या नावावर आपल्या जातीच्या लोकांचे पोट भरण्याचे कार्य केले. त्या लोकांनी माझ्या समाजासाठी काही केले नाही. हिंदुस्थानात आतापर्यंत पुष्कळ महात्मा आले व गेले, पण त्यांना अस्पृश्यांची स्थिती काडीमात्र सुधारता आली नाही. ते हजारो वर्षांपासून अस्पृश्य म्हणून राहत आले आहेत. मला माझ्या समाजाची सेवा केली पाहिजे.
हिंसेच्या शक्तीला शरण जाऊन मिळविलेली शांतता ही खरी शांतता नव्हे, ती आत्महत्या होय। तसे करणे म्हणजे सुखी, सुंदर आणि स्वास्थ्यपूर्ण जीवन जगण्यासाठी जे काही उदात्त आणि आवश्यक असते, त्याची होळी करून रानटीपणाला व अनाचारीपणाला शरण जाण्यासारखे आहे.....!!!
मला बोैद्धधर्म आवडतो, कारण कुठल्याही धर्मात जी तीन तत्त्वे सापडत नाहीत, ती बौद्धधर्मातच सापडतात. बौद्धधर्म मला प्रज्ञा शिकवतो. तो मला अंधश्रद्धा नि अद्भुतता शिकवीत नाही. तो मला प्रज्ञा, करुणा आणि समता ही तीन तत्त्वे शिकवतो. देव किंवा आत्मा समाजाचा उद्धार करू शकत नाही. मार्क्सवाद आणि साम्यवाद यांनी जगाचे सर्व धर्म हादरून टाकले आहेत. बुद्ध हाच कार्ल मार्क्सला पूर्ण उत्तर आहे. रशियन साम्यवादाचा उद्देश रक्तरंजित क्रांती घडवून आणणे हा आहे. बुद्धप्रणित साम्यवाद हा रक्तहीन क्रांती घडवून आणतो.....!!!
"दैवावर भरवसा ठेवून वागू नका, जे काय करायचे ते आपल्या मनगटाच्या जोरावर करा.......!
"शिक्षण हे दुधारी शस्त्र असल्यामुळे चालविण्यास धोक्याचे असते, चरित्रहीन आणि विनयहीन सुशिक्षित माणूस हा पशुपेक्षा भयंकर असतो, जर सुशिक्षित मनुष्याचे शिक्षण गरीब जनतेच्या हितास विरोधी असेल तर तो समाजाला शाप ठरतो......!
"विचार कुठूनही घ्यावेत, पण ते पारखून घ्यावेत."......!
"खराखुरा आदर्श समाज निर्माण करावयाचा असेल तर जातींना नष्ट करणे अत्यावशक होय व जाती हया धर्मशास्राच्या आधारावर टिकविण्यात आल्या आहेत. तेव्हा धर्म म्हणून शास्रांचे शब्दप्रामाण्य नष्ट करणे हाच जातीचा विनाश करण्याचा खराखुरा मार्ग आहे." मुळात हिंदू धर्म नसून तो केवळ एक जातिंचा संग्रह आहे. .....!
"ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी बुद्धाने जीवहत्येला प्रतिबंध केला नाही, जीवहत्येची आवश्यकता आहे किंवा नाही हि गोष्ठ बुद्ध व्यक्तीच्या सदसदविवेक बुद्धीवर सोपवितात.".....!
"आपल्या पूर्वजांनी पूर्वी नुसती खादी वापरली नाही तर ते त्या धंद्याचे निर्माते होते, कल्कल कोण निर्माण करीत होता ? तुमचे आमचे पूर्वज त्या महत्वाच्या धंद्यावर आपला उदरनिर्वाह चालवीत आणि इतरांच्या अब्रूचे रक्षण करीत, ते आमच्या संस्कृतीत अस्सल प्रतिक होतं, तो आपल्या मनाचा विनकरीचा धंदा आपण सोडून दिला आणि दुसऱ्याच्या ओंजळीत पाणी प्यायला शिकलो,माझा विरोध खादीला कधी न्हवता ना आता आहे, उलट मला अभिमान वाटतो, विरोध आहे तो त्या आड दडून आपल्यावर तीर सोडणाऱ्या खादी टोपी धारण करणाऱ्या, अनाठ्यीच तत्व प्रतिपादन करू पाहणाऱ्या व्यक्तीचा मनोवृत्तीला, वस्तुत आम्हाला आमच्या अशा मुळ धंद्याचे संशोधन करून जीवनाला उद्या उपयोगी पडेल असा ग्रंथच निर्माण करायला पाहिजे......!
"राजकीय प्रगतीसाठी अल्पसंख्याक जातीचे हित संबंध पाहणे आवश्यक आहे, जो पर्यंत अल्पसंख्य दलित जमातींना पुरेसे प्रतिनिधित्व मिळणार नाही व त्यांचे हितसंबंध जोपासले जाणार नाहीत, अश्या स्वराज्याला काय अर्थ आहे.".....!
"तूम्ही शूर विरांची संतान आहात, ही गोष्ट काल्पनिक नव्हे.....भिमा कोरेगावला जाऊन बघा तुमच्या पूर्वजांची नावे तेथील विजय स्तंभावर कोरलेली आहेत....तो पुरावा आहे की तुम्ही भेड बकरीँची संतान नसून "सिंहाचे छावे" आहात".......!
"बौद्ध धम्म म्हणजे हिरे माणिक मोत्यांची खाण आहे, हि मी तुमच्यासाठी शोधली आहे, यातील जवहारांचा मुक्त वापर करा,".....!
"चारित्र्य शोभते संयमाने, सौंदर्य शोभते शीलाने."....!
विदेशातून शिक्षण घेवून आल्यानंतर मानपत्राचा अस्वीकार करताना बाबासाहेब म्हणतात,"मी शिक्षण घेतले हा काही मोठा प्रताप नाही, समाजाकडून मान पत्र घेण्यासारखे माझ्या हातून समाजाचे काय कार्य झालेले आहे ? मी जेव्हा समाजासाठी भरीव कार्य करीन, तेव्हा तुम्ही मला मान पत्र द्या, ते मी आनंदाने स्वीकारील, आता ते स्वीकारणार नाही."
मी या स्थितीत आलो याचे कारण माझ्यात "उपजत" काहीतरी होते असे कोणी समजू नये, प्रयत्नाने आणि कष्टाने वर चढलो".....!
एखाद्या माणसाला देव पदाला नेवून बसविण्याचा प्रयत्न एखादा समाज करतो तेव्हा तो समाज "आत्मनाशाकडे" वाटचाल करतो."
जो समाज प्राण त्याग करण्यास तयार आहे त्या समाजाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही........!
संपादन - अँड. राज जाधव...!!!
अस्पृश्यांचे आपणच कैवारी असल्याचा गांधीजी गोलमेज परिषदमध्ये टाहो फोडीत होते. त्यांना डॉ. बाबासाहेबांनी स्पष्ट शब्दांत सुनावले,`` मि. गांधी आपण अस्पृश्यांचे दायी असाल पण मी त्यांची माई आहे.' गांधी टिळक कितीही मोठे व लोकप्रिय नेते असले तरी डॉ. बाबासाहेबांनी त्यांचे पितळ उघडे पाडले.
ReplyDeleteबासाहेबांबद्दल गांधी म्हणात, “आंबेडकर हे नुसतं नाव नसुन हिंदु धर्माला मिळालं अव्हान आहे...!!!”
ReplyDeleteThat is good
Deleteडॉ.बाबासाहेबांचा अखेरचा संदेश,
ReplyDelete"एके दिवशी ते नानकचंद रत्तूंना म्हणाले, "माझ्या लोकांना सांगा की मी जे काही केले आहे ते मी अत्यंत हालअपेष्टा सोसून आणि आयुष्यभर दुःख भोगून आणि माझ्या विरोधाकांशी लढून मिळविले आहे. महत् प्रयासाने हा काफिला जेथे दिसतो तेथे आणून ठेवला आहे. मार्गात कितीही अडचणी आल्या आणि संकटे आली तरी तो काफिला आता मागे फिरता काम नये. जर माझ्या सहकाऱ्यांना
तो काफिला पुढे नेता येत नसेल , तर त्यांनी तो तेथेच ठेवावा, पण काही झाले तरी तो मागे नेता काम नये, हाच माझ्या लोकांना संदेश आहे."
‘बामणाघरी लेवनं अन् महाराघरी गाणं.’ असं पुर्वी म्हटल्या जात होतं. आता ‘महाराघरी लेवनं’ पण आलं. म्हणून‘ शेणाचे हात लावले लेखणीला.’ असे भीम गितात म्हटल्या जायचे ते खरंच आहे, नाही कां? जे हात नेहमी शेणाने भरलेले राहायचे, त्या हातात आता लेखणी आली, ही किमया डॉ. बाबासाहेबांनी घडवून आणली.
ReplyDelete"जय भिम" म्हणजे जाती वाद नाही, पण संवाद आहे..
ReplyDeleteप्रश्न नाही पण उत्तर आहे. हाव नाही पण समाधान आहे....
धमकी नाही पण धमक आहे. भिती नाही पण आदर आहे.
शंका नाही पण समाधान आहे. पैसा नाही पण श्रीमंती आहे.
प्रखर नाही पण तेजस्वी आहे. गर्वाने म्हणतो मी "जय भिम" आहे...!!!
पर्यायच नाही...तुला व्हावेच लागेल ‘आंबेडकर’...!!!
ReplyDelete‘आंबेडकर’ एवढा मोठा नाहीस झाला... तरी लहानगा का होईना...
आंबेडकरच व्हावे लागेल तुला...!!!
तुझ्या बापावरी मजूर नाही, वा मास्तरही नाही,
कलेक्टरही नाही, फक्त आंबेडकर होणे आहे तुला...!!!
म्हणजे सम्यक क्रांतीला...देशात आणणे आहे तुला !!!
कल चाँद भी लेगा दीक्षा...
ReplyDeleteऔर कल सूरज भी लेगा दीक्षा..
धरती भी कहेगी के यही पर है मेरी सुरक्षा...
चाँदनी भी दे रही है इसी बात पर जोर...
के भाई चलो बुद्ध की और..
के भाई चलो बुद्ध की और......
बाबा तू अवतरला नसतास तर
ReplyDeleteफुल्यांचे शब्द कुणी झेलले असते
पोथीतील किडयांनी अजगर होऊन
आम्हाला कधीच गिळले असते
वर्णव्यवस्थेच्या लोखंडी सापळ्यात
भोसकून रक्तबंबाळ केले असते
अश्वमेधात अश्व एकटाच जायचा
आमचेच अश्वमेध केले असते .......
धम्म म्हणजे काय?
ReplyDelete'धम्म ' म्हणजे काय ? , या प्रश्नाचं उत्तर एका शब्दांत द्यायचं झालं तर या गाथेच्या आधारे असं देता येईल की, ' धम्म ' म्हणजे सदाचार. म्हणजेच वर चर्चा केलेली वाईट कृत्ये माणसांनी न करणं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भगवान बुद्ध आणि त्यांच्या ' धम्म ' या ग्रंथात धम्माची व्याख्या केलीय. ते म्हणतात, ' धम्म ' म्हणजे सदाचरण. म्हणजेच, जीवनाच्या सर्व क्षेत्रात माणसा-माणसातले व्यवहार उचित असणं. ते म्हणतात की, माणूस जर एकटाच असला तर त्याला धम्माची आवश्यकता असणार नाही. पण जेव्हा दोन माणसं कोणत्याही संबंधानं एकत्र येतात, तेव्हा त्यांना आवडो अथवा न आवडो, ' धम्म ' हा पाहिजेच. दुस-या शब्दांत सांगायचं म्हणजे समाज धम्माशिवाय असू शकतच नाही
दु:ख हे दुसरं तिसरं काही नसून मनाची अवस्था होय. अन बौद्ध धर्म आम्हाला या अवस्थांवर नियंत्रण ठेवण्याची कला शिकवतो. म्हणून बौद्ध धर्म सर्वोत्तम होय.
ReplyDeleteस्वातंत्र्य, समता व बंधूता हे तीन बौद्ध धर्माचे मुख्य आधारस्तंभ आहेत. बुद्धाने स्पष्ट सांगितले आहे की, तुमच्या बुद्धिला पटल्यास धम्म स्विकारावे मी सांगतो म्हणून नाही. बुद्धाची शिकवण ओळखण्याच्या काही कसोट्या सांगितल्या आहेत त्यातील मुख्य कसोटी तर्क व बुद्धिवाद होय.
ReplyDeleteतालिबान में..
ReplyDeleteबुध्द की प्रतिमायें तोडने वालों
अल्लाह तुम्हे माफ करे
मिटा सकते हो तो मिटाओ
कोटी कोटी ह्रदयों में बसने वाले
... उस बुध्द को
पत्थरों पर
बहादुरी दिखाने वालो
कायरों !
तुम्हारी कायरता ने
किया है करोडो ह्रदयों को घायल
कौन से धर्म का
परचम फहराना चाहते हो तुम
तुम्हारे अज्ञान ने
अपमानित किया है धर्म
धर्म का आवरण छोडें
ज्ञान से अपने को जोडें
बुध्द की शरण में जायें
बुध्द हो जायें
बुध्दम शरणम गच्छामी...........!
"शत्रूचा हल्ला झाला असता केवळ लढण्याचे नाकारून "युद्धप्रवृतीचा" नायनाट होणार नाही, तिचा नायनाट करावयाचा असेल तर युद्ध जिंकून "न्यायाधिष्ठ तह" प्रस्थापित केला पाहिजे." -डॉ.बाबासाहेब आंबेडकर.......!
ReplyDelete"सध्या आपल्या समाजावर फार मोठे अत्याचार होऊ लागले आहेत, एकही दिवस अत्याचाराविना जात नाही, येथून जवळ च असलेल्या गावाची हकीकत ऐकून आपणास संताप आल्याशिवाय राहणार नाही, सामाजिक बहिष्कारामुळे तेथील अस्पृश्य लोकांची भयंकर दैना झाली आहे, २ दिवस त्यांची छळवणूक करण्यात आली, आणि शेवटी त्यांना धमकी देण्यात आली कि त्यांनी मेलेली जनावरे उचललीच पाहिजेत, तसे झाले नाही तर ५० रुपये दंड करू, याशिवाय रस्ता दुरुस्त करण्यासाठी त्यांनी काम केलेच पाहिजे, तसे न्झाल्यास त्यांना गावात राहणे अश्यक्य करू. हि एक गावाची हकीकत झाली, आणखी दुसऱ्या एका गावाची गोष्ठ पहा, कविठा गावच्या अस्पृश्यांच्या झोपड्या जाळल्या, पिण्याच्या पाण्यात घासलेट ओतले आणि नाना प्रकारची त्यांची छळवणूक करण्यात आली.
ReplyDeleteतेथील लोकांनी या अन्यायाविरुद्ध गांधींकडे धाव घेतली आणि सर्व गार्हाणी त्यांच्या कानी घातली, गांधीनी त्यांना काय सांगितले, "गाव सोडून बाहेर पडा," हा सल्ला त्यांनी दिला, अन्यायाविरुद्ध लढा हा सल्ला त्यांनी दिला नाही, काय हि गांधींची नीती. ? "
( डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी, अहमदाबाद येथे ता. २०/११/१९४५ रोजी दिलेले भाषण )