"गणेश विसर्जनाचे, विसर्जन करा...!!!
मित्रानो कसे आहात ? सध्या फेसबुक वर, विविध वेबसायीट वर "मी येतोय" या शिर्षकाखाली मोठ - मोठी गणपतीची पोस्टर, वालपेपर पाहायला मिळत आहेत, याचे कारण, थोड्याच दिवसात येऊ घातलेला गणेशउत्सव, त्यामुळे गणेश मूर्ती शाडू मातीच्या हव्यात, कि चीनी मातीच्या, कि इको फ्रेंडली हव्यात ? तसेच त्या छोट्या हव्यात कि मोठ्या ? त्या कुठे विसर्जित कराव्यात ? किती वेळात कराव्यात ? मंडळानी रस्त्यावर खड्डे पडू नयेत ? १० च्या आत साऊंड बंद करावेत कि नाही ? या दरवर्षी च्या बोरिंग गप्पा आपण मारणार नाहीत. आज कोर्टात विशेष काम नसल्यामुळे विविध मान्यवरांचे ब्लॉग वाचन चालू होते, त्यात एक मस्त राजीव उपाध्ये यांचा ब्लॉग वाचायला सुरुवात केली आणि गणेश उत्सव जवळ येतोय म्हणून, गणेश भक्तांसाठी एक खास मेजवानी घेवून आलो आहे, राजीव उपाध्ये यांचा लेख, लेख अतिशय गमतीशीर आणि प्रबोधनात्मक आहे, त्यामुळे तो आपल्या बोग वरून प्रसिद्ध झाला तर आपल्याला आनंदच होईल तर मी राजीव उपाध्ये यांचा लेख देत आहे त्यांच्याच शब्दात...!!!
गणपतीचा शोध....!!!
लोकहो,
लहानपणी मी गणपतीभक्त होतो. याचे प्रमुख कारण लंक्यांच्या स्कॉलरशिपच्या क्लास मध्ये संकष्टीला आणि गणेशोत्सवात अथर्वशीर्षाची २१ आवर्तने व्हायची. तेव्हापासून बर्यापैकी नियमित पणे अथर्वशीर्षाची आवर्तने मी करत असे. पण "गणपती विघ्नहर्ता नाही तो विघ्नकर्ता आहे, तेव्हा भजायचे असेल तर दूसर्या देवाला भज" असे आई म्हणायची. आईला असे कसे विचारले तर उत्तर देता येत नसे मग मला आईचा राग यायचा. पण मी मात्र माझी गणेशभक्ती मी नेटाने पुढे चालु ठेवली होती.
पुढे मी पुण्याला टिळक विद्यापीठात संस्कृत मध्ये विशारद (बीए) करायला जाउ लागलो. दूसर्या वर्षी आम्हाला वैदिक साहित्य अभ्यासायला होते. शिकवायला प्रा. सुचेता परांजपेबाई होत्या. त्यांनी आपल्या पूजाविधींमधले अनेक मंत्र निरर्थकपणे शतकानुशतके जपले जात असल्याचे सांगितले. उदा. मंत्रपुष्पांजलीचा आणि गणपतीचा काहीही संबंध नाही, हे कळले तेव्हा मी उडालोच. परांजपेबाईनी असेही सांगितले की वेदांत गणपती कुठेही नाही आणि केवळ गणपती या शब्दामुळे "गणांनां त्वा गणपतीं..." ही ऋचा गणपतीच्या पूजेत ओढून ताणून लोकांनी वापरायला सुरुवात केली. पण हे काहीच नाही, पुढे जे कळले त्यामुळे माझा गणपतीवरच्या श्रद्धेला सुरुंग लागला. परांजपे बाईनी सांगितले की गणपती ही नीच देवता आहे, सूर्य, अग्नि, विष्णु या वैदिक देवतांप्रमाणे ती उच्च देवता नाही. यावर मी वर्गात बाईना प्रश्न केला की नीच देवता म्हणजे काय तर त्यांनी सांगितले की ती अनार्यांची देवता आहे, जसे सोट्या, म्हसोबा, वेताळ या जशा नीच देवता आहेत. मी उडालोच आणि दूसर्याक्षणी माझी गणपती वरची श्रद्धा पार उडाली. आई मला जे सांगत होती, त्यात वावगे नसावे असे वाटू लागले.
यानंतर जवळजवळ वीस-बावीस वर्षे गेली. अचानक प्रा. दामोदर कोसंबी या प्रखर बुद्धिमत्तेच्या विद्वानाने लिहीलेल्या मिथ अॅण्ड रिअॅलीटी या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचत असताना रंजक माहिती कळली की गणपती हा शंकरापासून झालेला पुत्र नव्हे. (म्हणजे तो शंकर-पार्वतीचा अनौरस पुत्र ठरतो.) पुराणकथांमागे आजच्या नीतिमत्तेला न झेपणारे वास्तव लपलेले असते याचा हा एक दाखला होता. याच पुस्तकात लोकदैवतांचे ब्राह्मणीकरण कसे होते याची रोचक चर्चा कोसंबीनी केली आहे. त्यामुळे गणपतीचे काळाच्या ओघात ब्राह्मणीकरण अर्थात status upgradation कसे झाले असावे याचा अंदाज बांधणे फारसे अवघड जात नाही.
तरीही गणपती ही नीच देवता आहे याचा मला अधिकृत पुरावा हवा होता आणि तो मिळवण्यासाठी मी तडफडत होतो. गणपती हा विघ्नकर्ता म्हणजे त्रासदेणारा. ही आईने सांगितलेली माहिती खरी की खोटी हा प्रश्न अधून मधून सतावायचा. पण त्याचेही उत्तर मला काळाच्या ओघात मिळायचे होते. दरम्यान मिसळपाव वरील एक सदस्य श्री श्रावण मोडक यानी लोकायत वाचायला सांगितले. बहुतांश लोकांची अशी समजूत असते की प्राचीन भारतात एकच संस्कृती अस्तित्वात होती ती म्हणजे वैदिक संस्कृती. पण तसे नसून त्यावेळेस वैदिक संस्कृतीला समांतर अशी म्हणजे दासांची (अनार्यांची) संस्कृती पण अस्तित्वात होती ती म्हणजे लोकायत.
अचानक स रा गाडगीळ यांनी लोकयताचा मराठीतून करून दिलेला परिचय वाचनात आला. त्यात गणपतीच्या शूद्रत्वाचे अधिकृत दाखले त्यांनी दिले आहेत. हे दाखले अनेक धर्माग्रंथांचे आहेत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांच्या स्मृती - हिंदू लॉचे महत्त्वाचे आधारग्रंथ. या दोन्ही ग्रंथानी गणेशपूजा त्याज्य मानली आहे. गणपती हा विघ्नकर्ता आहे हे अनेक ग्रंथ अधोरेखित करतात.
एक शोधवर्तूळ पूर्ण झाले. माझी आई बरोबर ठरली. ती आज हयात असती तर तिला नक्कीच आनंद वाटला असता.
जाता जाता - गणपती अथर्वशीर्षाचा आणि अथर्ववेदाचा काहीही संबंध नाही अशी माहीती नुकतीच "लोकदैवतांचे विश्व" या रा. चिं. ढेर्यांच्या पुस्तकात मिळाली.
मी मात्र आता गणपतीला माझ्या घरातून केव्हाच हद्दपार केला आहे.
(पी.एस. २८ एप्रिल २०१२
गणपतीला मी हद्दपार केला ते शूद्र देवता म्हणून असा अनेकजण समज करून घेतील. पण तसे अजिबात नाही. मी त्याला हद्दपार केला त्याचे विघ्नकर्तृत्व सिद्ध झाल्यामुळे. माझी मूळ समस्या वेगळीच आहे. शूद्र देवतांचे ब्राह्मणीकरण/उन्नयन होऊ शकते. गुन्हेगारांचे शुद्धीकरण आणि पुनर्वसन होऊ शकते. धर्मत्याग केलेल्याला धर्मात परत येण्यासाठी धर्माचे दरवाजे उघडे आहेत, पण शूद्रांचे ब्राह्मणीकरण/उन्नयन होऊ शकत नाही. हे काही केल्या पटत नाही... )
मग कसा वाटला लेख ? मस्त आहे ना ? आपल्या प्रतिक्रिया जरूर लिहा, हा लेख आपल्या मित्रांपर्यंत आणि गणेशभक्तांपर्यंत जरूर पोहचावा, शेवटी प्रत्येकाचे प्रबोधन करणे आपलीच जबाबदारी आहे. प्रबोधन ठाकरें यांचा "देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे", कधी ना कधी यांना कळेल आणि
गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्याएवजी शेवटी हेच गणेश भक्त कधी ना कधी "गणेश विसर्जनाचेच, विसर्जन करतील" अशी आशा बाळ्गुयात...!!!
- अँड. राज जाधव...!!!
(संदर्भ - "
राजीव उपाध्ये यांचा ब्लॉग - http://rajeev-upadhye.blogspot.in/2012/03/blog-post_11.html)
भारतातील अनार्यांच्या हस्तिदेवता व लम्बोदर यक्षाच्या एकत्रिकरणातून गणेश संकल्पना निर्मिली गेली. गणेश या मूळच्या अनार्य देवतेचे आर्यीकरण झाले असावे हा दुसरा कयास लावण्यात येतो. गणेशाचे वाहन उंदिर याच आदिम संस्कृतीचे प्रतीक म्हणून राहिले असावे. इसवीसनपूर्व आठव्या शतकापासून सहाव्या शतकाच्या मध्यापर्यंत लिहिल्या गेलेल्या बौधायण धर्मसूत्रात गणेशाचा उल्लेख नाही. इसवीसनाच्या चौथ्या शतकातील कालिदास, इसवीसनाच्या सहाव्या शतकातील भारवी, इसवीसनाच्या पाचव्या शतकातील पंचतंत्र वा भरताच्या नाट्यशास्त्रातही गणेश देवता दिसत नाही. गुप्त काळाच्या अस्तकाळापासून या देवतेची स्वतंत्र पूजा प्रचलित झाली असावी.
ReplyDeleteमानवगृह्यसूत्र व याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये शाल, कटंकट, उष्मित, कुष्माण्ड राजपुत्र व देवयजन इत्यादीचा विनायक म्हणून उल्लेख आहे. महाभारतातील विनायक हाच आहे. याचे काम विघ्न उत्पादन करणे असे. पुढे हाच विघ्नकर्ता गणपती विघ्नहर्ता मानला जाऊ लागला. याज्ञवल्क्य स्मृतीनुसार विनायक हा अम्बिकेचा पुत्र होय. गणेशाचा पार्वतीपुत्र उल्लेख येथेच प्रथम होतो. अनेक पुराणे स्वयम्भू मानतात.कार्तिकेयाचे अनेक गण वा पार्षदही पशुपक्ष्यांचे मुखधारित असतात. इसवीसनाच्या सहाव्या शतकातील 'भूमारा'त याप्रकारच्या अनेक गणांचा उल्लेख सापडतो. गणेश म्हणजेच गण-ईशाचे ह्त्तीमुख असण्याचे हेही कारण असू शकते. काही ठिकाणी गणेश व यक्ष/नागदेवता यांची वर्णने मिसळल्याचे दिसते.
This comment has been removed by the author.
ReplyDeleteगणपती विघ्नकर्ता आहे म्हणून त्याची भक्ती करणे सोडले. जर तो विघ्नहर्ता असता तर ?.....ह्यचा अर्थ असा कि तुम्ही महाभारत मानता .....मूर्ती पूजा मानता .......गणपती नाही तर तुम्ही शंकराची पूजा कराल .....मी हिंदू धर्मच मानत नाही .....मग तर शंकर असो गणपती असो किवा ३३ कोटी देव ......
ReplyDeleteसमाधानकारक असा हा लेख वाटला नाही ...........there are so many reason to share!!!!!!!
ReplyDeleteअजिंक्य कांबळे साहेब मी अगोदर हे सांगू इच्छितो को हा लेख माझा नसून राजीव उपाध्ये यांचा आहे, मी तसे सुरवातीलाच नमूद केले आहे. आणि माझ्या प्रोफाईल मधेच लिहलेले आहे कि, मी देव धर्मासारख्या भाकड गोष्टीवर विश्वास नाही, त्यामुळे ज्या गोष्ठी काल्पनिक आहेत त्यावर चर्चा करण्याचे मी टाळतो, परंतु हा लेख गमतीशीर वाटला म्हून इथे लिहला आहे. बाकी इतर चांगले लेख आहेत ते तुम्ही वाचू शकता...धन्यवाद....!!!
ReplyDeletewhere is like click????.......ur doing wonderfull job....jay bhim!!!!
Deleteराज जाधव तुम्हाला माझा जय भीम, तुमचे में मना पासून आभार मानतो तुम्ही आमच्या पर्यंत असचा चांगले विचार पोहचवा........... जय भीम
ReplyDeleteremove it or its not positive to u..........
ReplyDeleteAdvocate raj jadhav , i think u knows that , circulating any thing is also matter of defamation.
ReplyDeleteDefamation ? in this article which Para comes under Defamation ?
ReplyDeletePlease Read Carefully whole Article Dear Frnd...!
ReplyDelete