My Followers

Tuesday, 26 June 2012

बोधिसत्व म्हणजे काय? ते कसे प्राप्त होते ?


                         बोधिसत्व म्हणजे काय? ते कसे प्राप्त होते ?

आपण म्हणतो " बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा.....विजय असो". कारण आपण सर्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना  बोधिसत्व बाबासाहेब असे संबोधतो. पण आपण कधी विचार केला का ? बोधिसत्व म्हणजे काय? ते कसे प्राप्त होते?
"१०  पारिमितांचे  पालन  करणे म्हणजेच बोधिसत्वाकडे स्थित्यांतर सुरु होणे." बोधिसत्व प्राप्त होण्यासाठी त्या व्यक्तीने दहा पारिमितांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. 
१०  पारिमितां म्हणजे  काय ?
१) शील :- शील म्हणजे नितिमत्तापापभिरुतावाईट गोष्टी न करणेअपराध करण्याची लाज वाटणे.
२) दान :- म्हणजे निस्वार्थपरोपकार अर्थात तनमन धनानी दुस-याची भलाई करणे.
३) उपेक्षा :- म्हणजे आप्तिताअनासक्तिआवड-नावड नसणेफलप्राप्तिने विचलीत न होणेनिरपेक्षतेने सतत प्रयत्नशील  
                राहणे.

४) नैष्क्रम्य :- म्हणजे ऐहिक सुखाचा त्याग करणे.

५) वीर्य :- योग्य प्रयत्न करणे,  हाती घेतलेले काम माघार न घेता पूर्ण सामर्थ्याने पूर्ण करणे.

६) शांती :- म्हणजे क्षमाशीलतातद्वेषाला द्वेषाने उत्तर ने देणे. द्वेषाने द्वेष शमत नसून क्षमाशीलतेने शमते.

७) सत्य :- कधीही खोटे न बोलणेकोणाचीही चुगली न करणेकोणाचीही निंदा नालस्ती न करणे.

८) अधिष्ठान :- ध्येय गाठण्याचा द्रृढ निश्चय म्हणजे अधिष्ठान.

९) करुणा :- समस्त प्राणिमात्रा विषयी प्रेमपुर्ण व दयाळू व्यवहार म्हणजे करुणा होय.

१०) मैत्री :- प्राणिमात्रमित्रशत्रू ते सर्व जीव जंतू बद्दल बंधूभाव बाळगणे म्हणजे मैत्री होय.

वरील दहा पारिमितांचा सराव करता करता बोधिसत्वाची स्थीती सुरु होते. ती सुद्धा दहा टप्य्यात असते. हे दहा टप्पे म्हणजे बोधिसत्वाची अवस्था. एकदा का हे दहा टप्पे पुर्ण झाले की मग जी अवस्था प्राप्त होते तीला बुद्धत्व म्हणतात.
दहा पारिमितांच्या सरावाने बोधिसत्व प्राप्त करुन देणारे ते दहा टप्पे कोणते ते पाहू या.
पायरी: १) मुदिता:-  आनंदर प्राप्त करुन घेतो,  सर्व पाणिमात्रांच्या कल्याणाची तळमळ लागते.
पायरी: २) विमलता:- कामवासनेचे सर्व विचार काढून टाकणे आणि दयाशील बनने.
पायरी: ३) प्रभाकारी:- अनात्म व अनित्याचे आकलन होते, बुद्धी सतेज होऊन सर्वोच्च ज्ञानाची ईच्छा होते, तो कशाचाही त्याग करण्यास तयार होतो.
पायरी: ४) अर्चिस्मती:- अग्नी प्रमाणे तेजस्वी बुद्धिमत्ता मिळवतो, अष्टांग मार्गाचे अनुसरण करतो, चतुर्विध ध्यान व व्यायाम करुन इच्चाशक्तीच्या बळावर पंचशिलेचे अनुकरण करतो.
पायरी: ५) सुदुर्जया:- त्याला सापेक्ष व निरपेक्ष याचे ज्ञान प्राप्त होते.
पायरी: ६) अभिमुखी:- अविद्येने अंध असलेल्या व्यक्ती विषयी अगाध करुणा बाळगणे.
पायरी: ७) दूरगमा:- अनंताशी एकरुप होतो. मोह, माया, तृष्णेपासून अलिप्त होऊन परोपकार, सहनशीलता व व्यवहार चातुर्य मिळवितो. शक्ती, शांती, बुद्धी(प्रज्ञा) चा संपुर्ण अभ्यास व धर्माचे ज्ञान होते.
पायरी: ८) अचलावस्था:- जे जे चांगले आहे ते सर्व स्वाभाविकताच करतो. जी जी गोष्ट करेल त्यात यशस्वी होतो.
पायरी: ९) साधुमती:- ही स्थीती अत्यंत महत्वाची असून, या स्थीतीत उपासकास धर्म, शास्त्र, दिशा  जगाचे संपूर्ण ज्ञान प्राप्त होते.
पायरी: १०) धर्ममेथ:- या स्थीतीत बोधिसत्वाला बुद्धाची दिव्यदृष्टि प्राप्त होते.
अशा प्रकारे दहा पारिमितांचे पालन करता करता साधक बोधिसत्वाच्या एक एक पाय-या चढायला सुरुवात करतो. एक एक टप्पा पार करायला कित्येक वर्षे जावी लागतात. दहा पारिमिताचा पाया जेवढा भक्कत तेवढी बोधिसत्वाच्या पाय-या ओलांडण्याची गती जास्त.
बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर दहा पारिमितांचे पालन करत करत बोधिसत्व बनले. ते आजून काही वर्ष जगल्यास त्याना बुध्दत्व प्रात झाल्यावाचून राहिले नसते...!!!
(आभार - एम. डी. रामटेके)

No comments:

Post a Comment