- शौर्य...धैर्य...कर्तुत्वाला सलाम -
"पोलादी मुठीत आजही हत्तीचे बळ आहे, रक्तातला लाव्हा आजही उफाळत आहे, डोळ्यातला निखारा आजही लाल आहे, आडवे येवू नका,कोणीच अन्यायी पेशवाईला संपविणारा "मर्द महार" आजही तसाच आहे"...!
आपल्या लोकांच्या मुक्तीचा संघर्ष अजून संपलेला नाही. १८१८ रोजीची लढाई जिंकून आपल्या पराक्रमी लोकांनी पेशवाई सत्ता संपवली. परंतु १९४७ नंतर संपूर्ण भारतावर जातीवाद्यांची सत्ता निर्माण झाली आहे. आता एखाद्या ठिकाणी युद्ध करून ती सत्ता संपवता येणार नाही. त्यासाठी आपल्याला देशभर तयारी करावी लागेल. निरनिराळ्या जातीमध्ये विभाजित झालेल्या लोकांना जागृत करून एकत्र जोडावे लागेल.... "शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा" हा बाबासाहेबांचा कानमंत्र खर्या अर्थाने आत्मसात करावा लागेल...!
- अॅड. राज जाधव...!
जात ही एक मानसिकता आहे आणि जातीच्या मानसिकतेचे दहन कसे करायचे हा खरा प्रश्न आहे. माझ्या मनातली माझी जात कशी दिसेनाशी होईल हा माझ्यापुढे पहिला प्रश्न आहे. त्याच्यामुळेच माझ्या मनात इतरांची जात उभी राहते. जात ही तुलनात्मक ओळख आहे. ही ओळख जातीव्यवस्था टिकवून ठेवते. आणि जो मनुष्य आणि समाज तिला मनात धारण करून ठेवतो ती ओळख त्याचं व्यवस्थेत राहून कशीकाय मिटवीता येईल? यावर उत्तर केवळ बुद्ध धम्म आहे, धम्मच एक असा जालीम उपाय आहे जो सफल संघर्ष कसा करायचा हे शिकवतो. अजमावून पाहू या.
ReplyDelete