My Followers

Thursday, 22 November 2012

26 नोव्हेंबर....संविधान दिन...!

                 26 नोव्हेंबर....संविधान दिन.....!

भारतीय इतिहासातील संविधानच्या अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून करण्यात आली असली तरी जगातील सर्वश्रेष्ठ संविधान समजले जाणारे "भारतीय संविधान" 26 नोव्हेंबर 1949 रोजी घटना समितीने स्वीकारले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अहोरात्र मेहनत घेऊन या संविधानाची निर्मिती केली, या रोजी जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या भारताने भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीने खर्‍या अर्थाने लोकशाहीची प्रस्थापना झाली. म्हणून 26 नोव्हेंबरला हा दिवस 'संविधान दिन' म्हणून साजरा केला जातो.

भारतीय संविधानासंदर्भात जन-जागृती, माहिती व्हावी यासाठी संविधान दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असे, मात्र ते सार्वत्रिक पातळीवर होत नाहीत. याबाबत महाराष्‍ट्र शासनाने यापुर्वी जनतेला 26 नोव्हेंबरला 'भारतीय संविधान द‍िन' साजरा करण्याचे ही आवाहन केले होते. मात्र यासंदर्भात राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद शाळा, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची महाविद्यालये आदी आजही अनभिज्ञ दिसत आहे. शासनाने भारतीय संविधानची माहिती जनतेला करून देण्यासाठी 26 नोव्हेंबरला पोस्टर प्रदर्शन, बॅनर्स, निंबध स्पर्धा घेण्याच्या सुचना दिल्या होत्या मात्र त्या पाळल्या जात नसल्याचे चित्र समोर दिसत आहे. 


चार वर्षापूर्वी 26/11 ला मुंबईवर दहशतवादी हल्ला झाला होता. तो दिवस होता 26 नोव्हेंबर, 'भारतीय संविधानदिन'. मात्र तेव्हापासून संविधान विरोधकांना आणि मनुवाद्याना संविधान दिवसाला विरोध करण्यासाठी एक चांगले कारण भेटले आहे. म्हणून हे नमुने काळा दिवस म्हणून साजरा करण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. आणि त्यांचा हा प्रत्यन लोकशाही मानणार्यांनी आणि बाबासाहेबांच्या अनुयायांनी हाणून पाडायचा आहे.    


देशावर येणार्‍या संकटप्रसंगी सारे भारतीय, आपले जातीभेत, वंश भेद, धर्म बाजूला ठेवून सारे एकत्र येतात. ही ताकद आपल्याला भारतीय संविधानाचीच आहे. या संविधानामुळेच देशाचे ऐक्य व एकात्मता कायम टिकून आहे. या दिनाप्रमाणेच 15 ऑगस्ट व 26 जानेवारी हे दिवस सरकारच्या कालदर्शिकेतून नाहिसे होणार की काय अशी भिती आता वाटू लागली आहे.

तरी सर्वाना विनंती आहे आज पासूनाच आपण संविधान दिन निमित्त माहितीपूर्ण आणि प्रबोधनपर पोस्ट टाकाव्यात, आणि आप आपल्या स्थानिक पातळ्यावर २६ नोव्हेंबर रोजी सांस्कृतिक, प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावेत........!     

- अँड. राज जाधव...!!! 

क्रूरकर्मा कसाब का हिसाब.....!

क्रूरकर्मा कसाब का हिसाब.....! 
                        
अखेर..... क्रूरकर्मा अजमल कसाब याला आज पहाटे ७.३० वाजता पुण्यातील येरवडा जेल मध्ये "ऑपेरेशन  एक्स" नुसार फासावर लटकविण्यात आले असून येरवडा जेल मधेच त्याला गाडून टाकण्यात आले आहे. शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफझल खानाचा फडशा पाडून, त्याची समाधी किल्ल्याच्या पायथ्याशी बांधली, ती एक स्वराज्यावर चालून येणाऱ्यानां सूचना होती, "जर स्वराज्यावर चालून याल तर तुमचा मुडदा देखील इथेच असा गाडला जाईल.".... कसाबला इथे गाडून हेच सांगावेसे वाटेल जो जो पाकिस्तानी या भारत भूमीवर हात टाकण्याचा प्रयत्न करेल त्याला इथेच लटकवून, इथेच गाडू....! 

२६/११ मध्ये १६६ निरपराध नागरिकांचा बळी घेणारया १० पैकी ९ आतंकवाद्यांना त्याच वेळेस कंठस्थान देण्यात आले होते, पैकी १ आतंकवाद्याला जिवंत पकडण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले होते, कसाब ला सर्व जगासमोर दोषी ठरविण्यासाठी त्याची संपूर्ण कायदेशीर रित्या ट्रायल घेण्यात आली आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला दोषी ठरविण्यात आले, आणि त्यानुसारच त्याला आज फाशी देण्यात आली, राष्ट्रपती यांनी इतर अर्जांच्या अगोदर कसाबचा दया याचिकेचा अर्ज फेटाळण्यात आला होता, संपूर्ण कायदेशीर बाजू पूर्ण करून त्या क्रूरकर्म्याला फासावर लाटकीविण्यात आले. संपूर्ण घटनाक्रमावरून पुन्हा एकदा सिद्ध झाले कि, भारतीय लोकशाही आणि भारतीय संविधान हे जगात श्रेष्ठ आहे....! 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान देशाला समर्पित करताना म्हटले होते कि, संविधानची योग्य अंमलबजावणी करणे हे, त्या त्या वेळच्या राज्यकर्त्यावर देखील अवलंबून आहे, जर या संविधानाचा योग्य वापर केला नाही तर, तो दोष संविधानावर नसून त्याच्या वापरकर्त्यावर असेल, त्याची अंमलबजावणी चांगली केली तर संविधान चांगले आणि त्याची अंमलबजावणी वाईटरीतीने केली तर संविधान वाईट मानले जाईल."    

कसाबने २६/११ ला सायंकाळी  धुमाकूळ घालून देशाच्या सुरक्षिततेला एक प्रकारचे आव्हान दिले होते. कसाब हा २६/११/२००८ ला मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी आहे. मुळचा पाकिस्तानातील फरीदकोट शहरातील रहिवासी असून गेल्या काही वर्षापासून तो अतिरेकी कारवायांमध्ये सामील झाला होता. २६/११ हल्ल्यातील पोलिसांच्या हाती आलेला एकमेव जिवंत अतिरेकी. कसाबचे ह्या हल्ल्यातील बाकीचे सर्व अतिरेकी मारले गेले. कसाब आणि त्याच्याबरोबरील अतिरेक्यांनी मिळून केलेल्या दहशतवादी हल्ल्यात २०० निरपराध लोकांची हत्त्या केली. ज्यात ३४ विदेशी नागरिकांचा ही समावेश होता. कसाबच्या विरोधात एकूण ८६ आरोप सिद्ध झाले आहेत. या आरोपांमध्ये देशद्रोही कृत्य करणे, विशेष टाडा न्यायालयाने त्याला ५ वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा ठोठावली होती आणि ४ अन्य गुन्ह्यांमध्ये आजीवन कारावासाची शिक्षा देण्यात आली होती. 

क्रूरकर्मा कसाबविरुद्ध गंभीर गुन्हे नोंदवण्यात आले होते. देशाविरुद्ध युद्ध पुकारुन देशाच्या सुरक्षिततेला आव्हान देणे, हत्येचे ‘प्लॅनिंग’ करणे, हत्या करण्यासाठी इतर अतिरेक्यांना मदत करणे. भारतीय दंडविधानाच्या कलम ३०२ अन्वये आणि दहशतवाद प्रतिबंधक कायद्यानुसार कसाबची फाशी सुप्रीम कोर्टाने निश्चित केली होती. ‘२६/११ ला सायंकाळी कसाबने धुमाकूळ घालून देशाच्या सुरक्षिततेला एक प्रकारचे आव्हान दिले होते. कसाब एखाद्या रोबोटसारखा काम करत नव्हता. त्याच्या विरोधात ठोस पुरावे आहेत. त्यावरुन त्याला शिक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे’, असे मत न्यायाधीश आफताब आलम आणि सी. के. प्रसाद यांच्या खंडपीठाने कसाबच्या फाशीची शिक्षा कायम ठेवली होती.परंतु, सबाउद्दीन अहमद आणि फहीम अन्सारी  यांच्या विरोधात कोणताही सबळ असा पुरावा नसल्याकारणाने सुप्रीम कोर्टाने त्यांना निर्दोष ठरवले व राज्य सरकारने जी याचिका दाखल केली होती, ती फेटाळून लावली होती.

क्रूरकर्मा कसाबच्या वकिलाने त्याची बाजू मांडताना वक्तव्य केले होते की, ‘कसाब वयाने मोठा नव्हता. त्याचे ‘ब्रेन वॉश’ करुन त्याला ‘जिहाद’ साठी प्रवृत्त करण्यात आले. तो फक्त एका रोबोटसारखा काम करत होता’. पण हे सगळे मुद्दे खंडपीठाने खोटे ठरवले. मात्र, सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा पर्याय कसाबकडे आहे. जर ही याचिका सुद्धा फेटाळण्यात आली तर तो क्यूरिटिव्ह पिटीशनचा पर्याय वापरु शकतो. तो राष्ट्रपतींकडे दयेचा अर्जही दाखल करु शकतो. व त्यानुसारच अजमल कसाब याने राष्ट्रपती यांचे कडे दयेचा अर्ज करून फाशीची शिक्षा कमी करावी म्हणून अपील केले होते, परंतु महामहीम राष्ट्रपती मोहोदय श्री. प्रणब मुखर्जी यांनी ५ नोव्हेंबर २०१२ रोजी कसाबची दया याचिका फेटाळून लावली आणि कसाब च्या फाशीवर शिक्का मोर्तब केले. 

क्रूरकर्मा अजमल कसाबला फासावर लटकवणार हे निश्चित झालं होतं. पण ही फाशी कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता गुप्त पद्धतीनं देण्यात आली. साहजिकच, या गुप्ततेचा भंग होऊ नये, यासाठी सुरक्षा यंत्रणांना कमालीची काळजी घ्यावी लागली. ही गुप्तता एवढी प्रचंड होती की, खुद्द येरवडा तुरुंगातील ज्या जल्लादानं कसाबला फासावर चढवलं त्यालादेखील प्रत्यक्ष क्षणापर्यंत याची कल्पना नव्हती की तो नक्की कुणाला फाशी देणार आहे. 

२००८ साली मुंबईवर दहशतवादी हल्ला करणाऱ्या कसाबला सापडल्यापासूनच आर्थर रोडमध्ये ठेवण्यात आलं होतं. पण, त्याच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी मात्र पुण्यातील येरवडा तुरुंगात होणार होती. त्यासाठी कसाबला पुण्याला हलवावं लागणार होतं. यासाठी सुरक्षा यंत्रणांनी १८ नोव्हेंबर संपण्याची आणि १९ नोव्हेंबर उजाडण्याची वेळ निवडली. 
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार, क्राईम ब्रान्च, कमांडोज् ऑफ क्विक रिस्पॉन्स टीम (QRT) तसंच आयटीबीपीच्या अधिकाऱ्यांवर कसाबला पुण्याला पोहचवण्याची जबाबदारी होती. ही संपूर्ण टीम २००८ पासूनच कसाबच्या देखरेखीसाठी तैनात करण्यात आली होती. याच टीमबरोबर १९ नोव्हेंबरला पहाटेच कसाबला येरवडा तुरुंगात दाखल करण्यात आलं. येरवडा तुरुंगात दाखल होणाऱ्या या नव्या आरोपीची ओळख मात्र गुप्त ठेवण्यात आली होती. येरवडा तुरुंग अधिक्षकाशिवाय ही गोष्ट कुणालाच माहित नव्हती, ना जेलच्या इतर अधिकाऱ्यांना... ना डॉक्टरांना...‘जेलच्या अधिकाऱ्यांना फक्त एव्हढंच सांगण्यात आलं होती की, कुणीतरी हाय-प्रोफाईल आरोपी येरवड्यात येणार आहे. नक्की कोण आहे हे मात्र सांगण्यात आलं नव्हतं. यावेळीही आईटीबीपी अधिकाऱ्यांच्या संरक्षणात एका अंडाकृती सेलमध्ये कसाबला ठेवण्यात आलं होतं. तुरुंगाच्या जल्लादालाही आम्ही एव्हढंच सांगितलं होतं की, एका दहशतवाद्याला फाशी द्यायची आहे. प्रत्यक्ष फाशी देण्याच्या काही मिनिटे अगोदर त्याला हे सांगितलं गेलं की तो कसाबच आहे’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

फाशी देण्याच्या अगोदर अंतिम इच्छेबद्दल कसाबला विचारलं तेव्हा त्यानं नकारात्मक उत्तर देऊन आपली काहीही अंतिम इच्छा नसल्याचं म्हटलं. 
मुंबईत हल्ला करून १६६ निरपराध जीवांचे बळी घेणार क्रुरकर्मा कसाब समोर मृत्यूला पाहून भेदरला होता. फाशीच्या वेळी तो अस्वस्थ आणि गप्प होता...थोड्याच वेळात त्याला फासावर चढवण्यात आलं आणि तिथं उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी कसाब मृत झाल्याचं घोषित केलं... अखेर एका क्रूरकर्म्याचा शेवट देखील एका कायदेशीर प्रक्रीयेव्दारे कोणताही शोर्ट कार्ट न मारता २६/११ मधील निष्पाप बळी आणि शाहिदा नां अखेर न्याय मिळाला, हे फक्त भारतातच शक्य आहे.....!

- अँड. राज जाधव...!!! 

संदर्भ - 
१. जलदगती न्यायालय, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे, 
२. विविध वर्तमानपत्रे, लेख  

Friday, 16 November 2012

बांधवांसाठी निरोप....!

बांधवांसाठी निरोप....! 

सर्व मित्राना सविनय जय भीम,
गेले काही दिवस अपनास माझ्या फेसबुक अकाउंट नविन पोस्ट पहावयास मिळाल्या नाहीत, या बद्दल प्रथम मी दिलगीरी व्यक्त करतो,
              फेसबुक म्हणते आहे की माझ्या पोस्ट, या लोकांच्या भावना दुखावनाऱ्या असतात, त्यामुळे  फेसबुक महाशयानी मला कही काळा पुरते प्रतिबंधित (ब्लोक) केले आहे, त्या दिड शहन्याना माझ्या पोस्ट काय  कळणार हो ? हा सर्व डाव हा माझ्या पोस्ट जातीवाद्याना टोचणार् या, मनुवाद्याना बोचणाऱ्या, धर्मांध डोळ्यात खुपणार्या असतात, त्यामुळे धर्मांध लोकांच्या आता पर्यंत मला फेक आय डी वरून धमक्या येत होत्या, परंतु आता तर त्यांनी मूर्खपणाचा कळसच केला आहे, त्यांना वाटते मला ब्लोक करून माझ्या महत्वकांक्षा रोखतील, सर्वांनी मिळून माझ्या पोस्त पोस्ट केल्या आहेत त्यामुळे, फेसबुक ने मला काही काळ ब्लोक केले आहे, मला त्याचा काही फरक पडत नाही, कायमचे ब्लोक केले तरी चालेल मी परत परत पुन्हा पुन्हा नवीन अक्कौंट ओपेन करेन आणि तुमच्या समोर येयील, आणि माझे काम असेच चालूच ठेवणार, 
           थोड्याच दिवसात आपली भेट होईलच तोपर्यंत आपल्या ब्लोग वरून संपर्कात राहण्याच्या प्रयत्न करू.... आपल्या चळवळीला असेच धर्मांध मूर्ख लोक संपविण्याचा बालिश प्रयत्न करत असतात, त्यामुळेच म्हणावेसे वाटते,"हाथी चलता है बाजार, कुत्ते भौकते हजार....!       

मित्रानो, अवघ्या सहा महिन्यात आपल्या ब्लॉग ची वाचक संख्या 25,000 च्या पुढे गेलेली असून, आपल्या ब्लॉगचे  मेंबर  130 झालेले आहेत, तरी सर्व सभासदांचे अणि वाचकांचे मनपूर्वक आभार असेच तुमचे  प्रेम असू दया, धन्यवाद्..... जय भीम... जय शिवराय....!  

आपलाच - अँड. राज जाधव...!!! 

Monday, 5 November 2012

मिलिंद प्रश्न - भाग पहिला...."नागसेन आयुष्मान रोहनची भेट"...!

मिलिंद प्रश्न - भाग पहिला...."नागसेन आयुष्मान रोहनची भेट"...!

"मिलिंदपनहो" म्हणजेच" मिलिंद प्रश्न" हा ग्रंथ बाबासाहेबांचा आवडता ग्रंथ आहे, हा ग्रंथ आपण सर्वांच्या संग्रही असायला पाहिजे. सदर ग्रंथामध्ये पुनर्जन्म या बाबी दिसतात, परंतु तत्कालीन परिस्थिती आणि बौद्ध साहित्यामध्ये झालेली भेसळ समजून घेता ग्रंथ जिज्ञासू पाने वाचल्यास जीवनाचा सार कळून येण्यास वेळ लागणार नाही. सदर ग्रंथामधील काही निवडक भाग असाच लेखाच्या स्वरुपात तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करेन.
                                 
बुद्ध साहित्यामध्ये तिपिटकांना अनन्य साधारण महत्त्व आहे, पण त्या साहित्या पलीकडल्या बुद्धविचाराचे सोदाहरण, उपमा आणि दाखल्यांच्या मदतीने विश्लेषण आणि विवेचन करण्याचे महत्कार्य ‘मिलिंद प्रश्न’ हा ग्रंथ करतो. थेट प्रश्न आणि त्यांना सार्थ आणि समर्थ उत्तरं असं त्याचं स्वरूप आहे. प्रश्नांच्या उत्तरांमधून आयुष्मान नागसेनचे बुद्धविचारांचे आकलन किती विलक्षण होते हे जाणवते. त्याप्रमाणे विचारातील स्पष्टता आणि उत्तरं मांडतानाचे त्यांचा अभ्यास आणि धरिष्ठ केवळ अचंबित करणारे नसून अफाट असेच होते. याच ग्रंथामधील "नागसेन आयुष्मान रोहनची भेट" या भागातील काही भाग वाचकांसाठी देत आहे, सदर भाग आपणास व इतरांस एखादा बौद्ध भिक्षु नजरेस पडल्यावर पडणाऱ्या  प्रश्नावर प्रकाश टाकतो.  

आयुष्मान रोहन स्थविर भिक्षाटनासाठी एके ठिकाणी गेले असता सोनोत्तर ब्राह्मणाचा मुलगा नागसेन (पुढे हे भन्ते नागसेन स्थविर झाले, आणि मिलिंद राजाला अनुत्तरीत केले ) भन्ते रोहन यांना पीत वस्त्रा मध्ये मुंडण केलेले पाहून प्रश्न विचारतो कि, हे महाशय, आपण इतर लोकांप्रमाणे डोक्यावर केस का ठेवीत नाही, त्यावर स्थविर नागसेन यांनी उत्तर दिले, "दुष्ट कृत्यांचा डाग समाजातून काढण्यासाठी उच्च प्रतीचे जीवन जगात असता त्यात सोळा दोष आड येतात. हे जाणून भिक्षु डोक्याचे आणि दाढीचे केस काढीत असतात."

"ते सोळा दोष कोणते बरे ?" बाळ नागसेन ने पुन्हा प्रश्न केला. 

रोहन म्हणाले, "केस आणि दाढी ठेवल्याने १) वेळोवेळी सावरावे लागतात २) शृंगरावे लागतात ३) तेल लावावे लागते ४) केस धुवावे लागतात ५) पुष्पमाळ बांधावी लागते ६) अत्तर लावावे लागते ७) सुगंधित ठेवावे लागते ८) हिरडा वापरावा लागतो ९) आवळ्याचे तेल लावावे लागते १०) रंगवावे लागतात ११) बांधावे लागतात १२) कंगीने विंचरावे लागते १३) वेळोवेळी न्हाव्यास बोलवावे लागते १४) केस मोकळे करावे लागतात १५) केसात उवा पडतात १६) जेव्हा केस झडू लागतात, तेव्हा लोकांना तो छळ वाटतो, त्यामुळे ते दुख्खी होतात, पश्छ्ताप करतात, मोहाच्या जाळ्यात सापडतात. त्यामुळे या १६ बाधा आड आल्या कि मनुष्याला कुशल गोष्टीचे विस्मरण होण्याची संभावना असते.    

नागसेन ने पुन्हा भन्ते रोहन स्थविर यांना विचारले,

"मग आपले वस्त्र देखील इतर लोकांच्या वस्त्रसमान नाहीत, हे का ?  

भन्ते रोहन स्थविर यांनी प्रश्नाचे उत्तर दिले,
"गृहस्थाच्या सुंदर वस्त्रात सुप्त अश्या पाच लालसा असतात. त्यामुळे भयानक धोका उद्भवण्याची शक्यता असते मात्र कषाय वस्त्र धारण करणारास त्यांचा संपर्क हि नसतो, म्हणूनच माझी वस्त्रे इतर लोकांच्या वस्त्राहून अगदी वेगळी आहेत. 

जिज्ञासू बाळ नागसेनला त्याचा मार्ग भेटला होता, त्याला कळले होते कि या भिक्षुकडे अफाट ज्ञान आहे, आणि ते आपणहि जाणून घेतले पाहिजे, रोहन स्थाविराना तशी विचारणा केल्यावर, आई वडिलांच्या सामन्तीने बाळ नागसेन प्रव्रजित होऊन श्रामणेर झाला.  नागसेन पुढे भन्ते नागसेन स्थविर होऊन अतिशय हुशार आणि बुद्धिमान असा ग्रीक राजा मिलिंद यास प्रश्नोत्तरात हरवतात, प्रश्नोत्तरात हरलेला मिलिंद राजा जीवनाचा सार समजून घेतो आणि बौद्ध धम्मास शरण येतो,     

लेखक - अँड. राज जाधव...!!! 

संदर्भ - 
मिलिंद प्रश्न, सुगत प्रकाशन 
अभिधम्म पिटक - भन्ते तीस्स्वंश