"बहन मायावतींना"....खुले पत्र...!
आदरणीय, बहन मायावतीजी...
आपणांस सविनय "जय भीम"....
पत्रास कारण कि,
सध्याची परिस्थिती तुम्ही जाणताच, त्यात एक आशावादी नारा ऐकू येतोय..."नवी उम्मीद, नवी सरकार...पुन्हा बहनजी" वगैरे... म्हणून तुमची आठवण आली... तुमचे अगोदरचे नारे देखील छान होते, जसे..."तीलक, तराजू, तलवार इनको मारो जुते चार"... आणि "ये हाथी नही, गणेश है..ब्रह्मा विष्णू महेश है"... असो राजकारण म्हटले कि सारे आलेच...
तुम्ही मोठ मोठे बाबासाहेबांचे आणि इतर महापुरुषांचे स्मारक उभे केलेत, महापुरुषांचे नावे जिल्ह्यांना दिलीत... जे आम्हाला माहित नसतील असे हि खूप कामे तुम्ही केली असतील, आम्ही तुमचे ऋणी आहोत...सदैव राहू देखील
तुम्ही चार वेळा "मुख्यमंत्री" होता... तुमच्या अगोदर जी तिथल्या दलितांची स्थिती अत्यंत बिकट होती, तुम्ही जाणताच....मात्र तुमच्या वेळेसहि त्या परीस्थिती काही फरक पडल्याचे कुठल्याच सर्व्हे मध्ये दिसून आले नाहि.... आज मात्र स्थिती "बद से बत्तर" झाली आहे...
तुम्ही दलितांना योजना दिल्यात त्यात काहींचा आर्थिक लाभ झाला हि असेल... या अखिलेश सरकारने म्हणे ल्यापटोप आणि ट्याब वाटले... असो तो मुद्दा नाही...
आज "दलित स्त्री" रस्त्यावर नागवी केली जातेय... हक्क मागणार्यांचे चीरहरण केले जातेय...अपमानित केले जातेय... गो मांस खाल्याचा आरोपावरून मुस्लिम बांधवांना ठेचले जातेय..
या अखिलेश सरकारकडून काहीच अपेक्षा न्हवती आणि नाही... पण तुमच्याकडे आम्ही आशेने पाहत होतो..पाहत आहोत...
तुम्ही चार वेळा मुख्यमंत्री असताना...जर दलित अत्याचाराविरुद्ध कडक कायदे करायला हवे होते, त्या कायद्यांची जरब बसवायला हवी होती... जेणे करून आज हि परिस्थिती ओढवली नसती... नुसते स्मारकं उभे करण्यापेक्षा... दलितांची अस्मिता उभी करायला हवी होती...
स्मारकं आमचा इतिहास सांगतात... भविष्यासाठी प्रेरणा देतात....पण जर आमचा वर्तमानच अंधकारमय असेल तर भविष्याचे काय घेवून बसलात... तुम्ही आजवर खूप केले असेल... पण दलितांना "इज्जत आणि संरक्षण" देण्यात "तुम्ही कुठे तरी कमी पडलात"... हे कटू असले तरी सत्य आहे...
झाले गेले जाऊ द्या... परंतु आज विरोधात असतानाही... तुम्ही असून नसल्यासारख्या आहात... इथे दलित स्त्री नागवी झाली असताना तुम्ही या निष्क्रिय सरकारला नागवे करायला हवे... यांना सळो कि पळो करून सोडायला हवे...पण आपण आहात कुठे ?
आन...आपले कार्यकर्ते म्हणतायेत..."पुन्हा नवी उमेद...पुन्हा बहेन जी"... तुम्ही पुन्हा याल... आणि याच... पण...
नुसते पुतळे, स्मारकं या पेक्षा दलितांना "इज्जत आणि संरक्षण" कसे देता येईल यासाठी प्रयत्न करा... तरच बाबासाहेबांचा रथ खऱ्या अर्थाने पुढे जाईल...
लिहण्यासारखे खूप आहे...तूर्तास थांबतो...
कळवावे...कृतीतून...
आपल्याकडून सदैव आशावादी असणारा,
- अॅड.राज जाधव...!
No comments:
Post a Comment