मी अॅड.राज जाधव, बाबासाहेबांची लेखणी आणि शिवरायांची तलवार हाती घेऊन लढणारा एक तरुण, देव-धर्मासारख्या भाकड गोष्टीं ऐवजी "फुले-शाहू-आंबेडकर" यांच्या विचारांवर विश्वास ठेवणारा. आजवर ज्या माणसांनी बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपले आयुष्य खर्ची घातले त्या महापुरुषांना जातीच्या आणि रंगांच्या चौकटीतून बाहेर काढण्यासाठी हा छोटासा प्रयत्न. माझे विचार तुम्हालाही पटलेच पाहिजेत आणि तुम्हीही ते स्वीकारावे असा माझा आग्रह नाही. परंतु तुम्ही विचार करावा ही विनंती....!!!
My Followers
Saturday, 7 February 2015
Friday, 6 February 2015
विरोध....!
विरोध....!
काल आम्ही महात्म्याच्या "अहिंसेच्या अतिरेकाचा" विरोध केला,
तुम्ही मात्र त्याचा धोतर घालून उदो उदो केलात,
आज तुम्हीही विरोध करताय....
काल आम्ही नथूच्या "स्वार्थी हिंसेचा" विरोध केला,
तुम्ही मात्र त्याचा जानवे घालून उदो उदो केलात,
आज तुम्हीही विरोध करताय....
काल आम्ही संघाच्या "उदिष्टांचा" विरोध केला,
तुम्ही मात्र त्याचा चडड्या घालून उदो उदो केलात,
आज तुम्हीही विरोध करताय....
काल आम्ही सेनाप्रमुखाच्या "जात्यंधतेचा" विरोध केला,
तुम्ही मात्र त्याचा सैनिक बनून उदो उदो केलात,
आज तुम्हीही विरोध करताय....
काल आम्ही अन्नाच्या "आताताईपणाला" विरोध केला,
तुम्ही मात्र त्याचा टोप्या घालून उदो उदो केलात,
आज तुम्हीही विरोध करताय....
काल आम्ही केजरीवालच्या "बालीशपणाचा" विरोध केला,
तुम्ही मात्र त्याचा मफलर घालून उदो उदो केलात,
आज तुम्हीही विरोध करताय....
आज आम्ही मोदीच्या "स्वप्रेमाचा" विरोध करतोय,
तुम्ही मात्र त्याचा भगवे कुर्ते घालून मोदी मोदी करताय,
आता तुमची बारी, कधी विरोध करताय ?
कि पुन्हा एका...नव्या भगव्या माथेफिरुची वाट पाहताय ?
रचना - राज जाधव...!
Tuesday, 3 February 2015
जातीचा दाखला....!
जातीचा दाखला....!
जातीचा दाखला मी पण
कोर्टातून काढला
पुन्हा एकदा सरकारन
आदेश बघा धाडला
कोर्टाच्या दाखल्याची
गेली होती किम्म्त !
माय बाप सरकार,
करीत होते गम्मत !
काय काय अटी होत्या,
विकासात होता खोडा !
१९५० सालचा पुरावा,
अर्जासोबत जोडा !
म्हटले मी बापाला,
दाखला गावाकडन आणा !
मुंबईत होत मुश्कील,
सायेब लय शहाणा !
बाप माझा हुशार,
आणला एकदाचा दाखला !
प्रगतीचा मार्ग
माझा मीच जोखला
बँकेच्या परीक्षेत,
झालो एकदा पास !
दाखला बघून सायबानी,
केल मला नापास !
मुंबईच्या हाफिस्ला
पुना केली अर्जी !
द्यायला दाखला,
सायबाची नव्हती मर्जी !
जन्म होता २२ सालचा,
बाप शिकला पुस्तक सात !
३६ साली शाळा सोडली,
काम करू लागले हाथ !
आजोबा मेला ६६ ला,
मृत्यू दाखला मग दावला !
जात होती लिवली त्यात,
तरी सायेब नाय पावला !
म्या म्हटले सायबाला,
आजोबा ज्या जातीचा,
त्याच जातीतला बाप !
हाकलून दिल सायबान,
आमचा उडाला थरकाप !
गावाकडचा दाखला,
जोशी सायबास्नी नाय आवडला !
मुलाखत घेतली माझी,
पण मला नाय निवडला !
झाला होता अन्याय
सायेब होता जोशी !
नशिबावर आमच्या
शिंकली होती माशी !
वर्षे गेली दोन,
संधी आली लय भारी !
७ ठिकाणी पास झालो,
नेमणूकीपत्रांची रांग दारी !
तोच दाखला होता,
पण सायेब होता येगळा !
आकाशात उडण्याचा
मार्ग झाला होता मोकळा
- गजाभाऊ लोखंडे...!
Monday, 2 February 2015
बाबासाहेब...!
बाबासाहेब...!
"बाबासाहेब" हे नुसतं नाव नसुन, "विद्यापिठ" आहे,
ज्यांनी ज्यांनी विद्यार्जन केलेय त्यांनी, "बाबासाहेबांच नाव"
घेतलचं पाहिजे...!
"बाबासाहेब" हे नुसतं नाव नसुन, "पाणवठा" आहे,
ज्यांनी ज्यांनी पाणी चाखलयं त्यांनी, "बाबासाहेबांच नाव"
घेतलचं पाहिजे...!
"बाबासाहेब" हे नुसतं नाव नसुन, "निवारा" आहे,
ज्यांनी ज्यांनी विसावा घेतलाय त्यांनी, "बाबासाहेबांच नाव"
घेतलचं पाहिजे...!
"बाबासाहेब" हे नुसतं नाव नसुन, "संघर्ष" आहे,
ज्यांनी ज्यांनी लढा दिलाय त्यांनी, "बाबासाहेबांच नाव"
घेतलचं पाहिजे...!
"बाबासाहेब" हे नुसतं नाव नसुन, "स्वाभिमान" आहे,
ज्यांनी ज्यांनी स्वतःमध्ये जागवलाय त्यांनी, "बाबासाहेबांच नाव"
घेतलचं पाहिजे...!
"बाबासाहेब" हे नुसतं नाव नसुन, "त्याग" आहे,
ज्यांनी ज्यांनी भोगलाय त्यांनी, "बाबासाहेबांच नाव"
घेतलचं पाहिजे...!
"बाबासाहेब" हे नुसतं नाव नसुन, "मार्ग" आहे,
ज्यांना ज्यांना भेटलाय त्यांनी, "बाबासाहेबांच नाव"
घेतलचं पाहिजे...!
"बाबासाहेब" हे नुसतं नाव नसुन, "विचार" आहे,
ज्यांनी ज्यांनी आचारात आणलाय त्यांनी, "बाबासाहेबांच नाव"
घेतलचं पाहिजे...!
"बाबासाहेब" हे नाव नसुन, "क्रांति" आहे,
ज्यांनी ज्यांनी पेटवलीय त्यांनी, "बाबासाहेबांच नाव"
घेतलचं पाहिजे...!
"बाबासाहेब" हे नाव नसुन, "श्वास" आहे,
जे जे "सजीव" आहेत त्यांनी, "बाबासाहेबांच नाव"
घेतलचं पाहिजे...!
कवी - अॅड. राज जाधव...!
Subscribe to:
Posts (Atom)
