भगवान बुद्ध.... सावरकरांच्या टीकेवर बाबासाहेबांचे प्रत्युत्तर....!
"बुद्ध धरमावर बरेच लोक खोडसाळपणे टीका करतात. त्यापैकी सावरकर एक होत. वास्तविक त्यांना काय म्हणायचे आहे हेच मला कळत नाही. बुद्ध हा वाइट मनुष्य आहे, असे त्यांना म्हणावयाचे आहे काय ? बौद्ध धर्म प्रचारक राजे वाइट होते असे त्यांना म्हणावयाचे असेल तर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडावी. मी त्यांना उत्तर देण्यास समर्थ आहे. केसरीत प्रसिध्द केलेल्या ‘बौद्धाच्या आततायी अहिंसेचा शिरछेद" या लेखातून त्यांनी स्पष्टपणे सांगितलं नाही. सावरकरच काय, पण कुणालाही बौद्ध धर्माबाबत काही विचारावयाचे असल्यास त्यांनी उघडपणे मला विचारावे, त्यांना उत्तर देण्याची माझी हिम्मत आहे. भगवान बुद्धाचा जो अफाट भिक्शुसंघ होता त्यात शेकडा ७५ टक्के ब्राम्हण होते. हे सावरकरांना माहित आहे काय ? सारीपुत्त मोग्ग्लायान्सारखे पंडित ब्राम्हण होते, सावरकरांनी हे विसरू नये सावरकरांना मला अस प्रश्न विचारायचा आहे कि पेशवे कोण होते, ते भिक्षु होते काय ? मग त्यांच्या हातून इंग्रजांनी राज्य कसे हिसकावून घेतले ? तेव्हां अशा नादान व बेजबाबदार लोकांच्या आपण नादी लागू नये. काही लोक म्हणतात सावरकर विष ओकले पण मी म्हणतो सावरकरांनी आपल्या पोटातील नरक ओकले ! तेव्हां कुणी कितीही खोडसाळ टीका केली तरी माझा मार्ग निश्चित आहे, "मी बुद्द धर्म स्वीकारणार" ! तुम्हाला पटला तर तुम्हीही स्वीकारा आतापर्यंत हिंसक मार्गाने व अमानुष अत्य्चाराच्या जोरावर बुद्ध धर्माची लाट परतवून लावली. परंतु आता बुद्ध धर्माची लाट येईल, ती कधी परत जाणार नाही. या अफाट सागराला भरती येईल, पण ओहोटी येणार नाही.
संदर्भ - मुंबई येथे बुद्ध जयंतीच्या कार्यक्रमात दि २४ मे १९५६ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल भाषण, पुस्तक :-डॉ.बाबासाहेब आंबेडकर : भाषणे आणि विचार, खंड - ६, संपादक :- धनराज डाहाट
राज सर...☺️👌👌👌
ReplyDelete