My Followers

Saturday, 8 September 2012

बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं......!!!

बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं......!!!    

काल सायंकाळी "फेसबुक" या सोशल वेबसाईटवर एका मित्राच्या "ग्रुप" मध्ये मला खालील "पोस्ट" आढळली,

"बाबासाहेब पत्राची सुरुवात "जय शिवराय” या शब्दाने करीत. भारताची राज्यघटना लिहितानाही बाबासाहेब शिवरायांच्या स्वराज्य कारभाराला प्रमाण मानतात.
 याचा त्यांनी स्वत: उल्लेख केलेला आढळतो....!"
  

अश्या पोस्ट सर्रास आज काल बिन्धीक्कतपणे कुठेहि आढळत आहेत, त्यामुळे आंबेडकरी तरुणांमध्ये संभ्रम निर्माण झालेला दिसतोय, त्यासाठी ब्लॉग च्या विश्वात मी ज्यांना  आपले आदर्श मानतो, त्या एम. डी. रामटेके सरांच्या एका लेखाचा संदर्भ घेऊन या नवतरुणांचा संभ्रम दूर करण्याचा पर्यंत करणार आहे. 


बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०१

         भवानीचं चित्र असलेलं पत्र.

आजकाल काही सामाजिक संघटना शिवराय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा वापर करून आपल्याला हवे ते वदवून घेण्याचे काम करीत आहेत,   नेटवर अन सर्वत्र या लोकानी असा प्रचार चालविला आहे की बाबासाहेब हे शिवाजी महाराजांचे भक्त होते वा भवानी देवीचे ते भक्त होते. अन पुरावा म्हणुन त्यांचे अगदी सुरुवाते पत्र पुढे केले जाते ज्यावर जय भवानी असे लिहले आहे. तेंव्हा सर्व बौद्धाना सुद्धा शिवाजी महाराज पुज्यस्थानी आहे. तसेच भवानी माताही आहे. एवढ्यावरच न थांबता या लोकानी असाही प्रचार चालविला आहे की संत तुकाराम हे बाबासाहेबाना अत्यंत पुज्य स्थानी होते. म्हणुन आपल्या मंचावरुन तुकारामाचं जगत गुरु म्हणुन उदात्तीकरण करण्यात येत आहे. प्रतिप्रश्न केल्यास ते असे उत्तर देतात की बाबासाहेबानी स्वत: त्यांच्या पाक्षिकांमधून तसे लिहले आहे. पण हे लोकं एक साधी गोष्ट विसरतात की तसे असल्यास मग बाबासाहेबानी कबीरा ऐवजी तुकारामानांच आपले गुरु मानले नसते का पण तत्पूर्वी हे शिवाजी महाराज व भवानीचा विपर्यास परतवून लावण्यासाठी आधी अस्सल पत्रांचे नमूने पहा. 


अगदी सुरुवातीला बाबासाहेबानी आपल्या लेटरहेडवर भवानीचे चित्र व तलवार अन पेन छापून घेतले होते. त्याचे कारण असे आहे की बाबासाहेबांचे मुळ आडनाव सपकाळ अन देवी भवानी ही सपकाळांची कुलदेवता. म्हणुन बाबासाहेबानी तसे चित्र छापून घेतले. पण नंतर हळू हळू त्यानी या देवताना हद्दपार करुन निरिश्वरवादी बौद्ध धर्माला आदर्श मानुन समतेची मुल्ये स्विकारली. पण या लोकांनी बाबासाहेबांच्या अगदी सुरुवातीच्या ( व नंतर टाकुन दिलेल्या) या भवानीचं भांडवल करुन बाबासाहेबांच्या चरित्रात शिवाजी महाराज घुसडविण्याचा चंग बांधला आहे. पण सुदैवाने बाबासाहेबांच्या एकून वाटचालीत कसा बदल झाला हे दर्शविणार सगळे अस्सल पत्र व लेटरहेट माझ्याकडे असल्यामुळे मी ते सर्व पत्र ईथे कालक्रमानूसार मांडणार आहे. आपल्या लोकांनी आता जागं व्हावं अन या लोकांच्या विपर्यासाला विरोध करावा. आज जर आपण गाफिल बसलो तर उदया हे लोक बाबासाहेबांच्या चरित्रात दैवतांची घुसखोरी करवून इतिहास विकृत केल्या शिवाय थांबणार नाहीत.


बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०२
मे १९३१ मधले पत्र जिथे भवानी नाही.

१९३१ मधिल हे पत्र (पत्रं - ०२) व त्या लेटरहेड वरील चित्रातील बदल हे सांगते की बाबासाहेबानी भवानीला जयभीम ठोकला अन आपल्या लेटरहेडवर आता फक्त तलवार व लेखनी एवढचं ठेवलं. 

पहिल्या पत्रात तलावर अन लेखनी सोबत तो-यात दिसणारी भवानी माता ईथे बाबासाहेबानी सन्मानपुर्वक बाजूला सारून आपण त्या विचारधारेपेक्शा वेगळ्या विचारधारेचे आहोत याचा पुरावा दिला. आपल्या हजारो पिढ्यानी ज्या भवानीला कुलदैवत म्हणुन जोपासले त्या देवीचा सुरुवातीला बाबासाहेबानाही अभिमान वाटे हे पहिल्या लेटरहेडवरुन खुलासा होतो. पण आता मात्र ती देवी माझ्या वा माझ्या बांधवांच्या दु:खाचे निवारण करणार नाही व नुसती फसवी अन आभासी आदर्श बाबासाहेबानी ओळखली अन लगोलगो त्याना आपल्या आयुष्यात काहिच स्थान नाही हे सिद्ध करणारा पुरावा म्हणजे या दोन लेटरहेडमधील बदल होय.
बाबासाहेबांच्या जीवनात एक एक गोष्ट कशी बदलत गेली. त्यानी एकदम धर्मांतर केला नसुन तो विचार हळू हळु कसा आकार घेत गेला याचा अंदाज तुम्हाला या अस्सल पत्रांच्या लेखमालिकेतुन येईलच. बाबासाहेबांच्या सुरुवातीच्या काळातील अन शेवटच्या काळातील परस्पर टोकाचे वाटणारे धार्मिक विचार मधल्या काळातील एकंदरीत जुलमी अन जातियभेदाच्या समर्थन करणा-या हिंदूमुळे आकार घेत गेले. बाबासाहेबानी स्वत: आपल्यातील हिंदुला विसर्जीत करायला सुरुवात केली. बाबासाहेबांचे वडील अत्यंत धार्मिक हिंदु गृहस्थ होते. लहानपणी त्याना श्लोक व स्त्रोते म्हटल्याशिवाय सायंकाळचे जेवण मिळत नसे. अशा धार्मिक वातावरणात ज्याची जडण घडण झाली त्या बाबासाहेबानी आतल्या हिंदूचे विसर्जन करायला बराच वेळ लागेल हे ताळले होते. अन वरील पत्रांतील नमुन्यातुन ती आतमधल्या हिंदुच्या विसर्जनाची श्रुंखला आपल्याला बघता येईल.

    बाबासाहेबांची अमूल्य़ पत्रं - ०३

१९३१ च्या शेवट पर्यंत बाबासाहेबानी आपल्या लेटरहेड मधे केलेला बदल अत्यंत उल्लेखनीय आहे. आज पर्यंत जे बाबासाहेब जय भवानीच्या लेटरडवरुन सर्व पत्रव्यवहार चलवित त्यानी १९३१ च्या शेवटी तो लेटरहेड बाद केला. या नंतर कधीच त्यानी जयभवानी वा आपल्या कुलदेवीच्या नावाचं लेटरहेड वापरलं नाही. यापुढील सर्व पत्र हे त्यांच्या नावानी छापलेल्या लेटरहेडवरच दिसतील.
बाबासाहेबांच्य पुढील सर्व पत्रव्यहारातील लेटरहेडवर त्यांच्या नावाखाली त्यांचे शिक्षण व पदव्या छापलेल्या दिसतात. खरं तर १९३० च्या आधिच त्यानी या सगळ्या पदव्या मिळविल्या होत्या. पण आता पर्यंत त्यानी त्या पदव्यांच्या ऐवजी भवानीला स्थान दिले होते. परंतू महाड सत्याग्रहानंतर बाबासाहेबांच्या विचारांमधे अमुलाग्रह बदल घडून आला. 
त्यानी प्रत्येक गोष्टीला चिकित्सकपणे पाहणे सुरु केले. किंवा आपण जे करणार त्याचं अनुकरण माझा भोळा समाज करतो आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे बाबासाहेबानी प्रत्येक कृती करताना ती पुढे अनुयायांद्वारे अनुकरण करण्यात येणार आहे तेंव्हा ती अत्यंत विचारपुर्वक केली जावी यावर कटाक्षाने लक्ष दिले. अन्यथा माझा बांधव भरकडला जाऊ शकतो याची त्याना जाण होती. याचाच परिणाम म्हणुन बाबासाहेबानी आपल्या कृतून भवानी देवीला बगल दिली अन दलिताना निरिश्वरवादाच्या दिशेनी पाऊल टाकण्याचा संकेत दिला.

१९५५ पर्यंतच्या प्रवासात बाबासाहेबांच्या लेटरहेड्सनी कसा प्रवास केला याचा आपण धावता आढावा घेतला आहे.  एम. डी. रामटेके सरांकडे सुमारे १५० पेक्षा जास्त अस्सल हस्तलिखीत पत्रे उपलब्ध आहेत. बाबासाहेबांच्या नावानी कुणी काहिही बरळत सुटले आहेत. आमच्या पुढेच त्यांच्या चरित्रात विपर्यास करण्याचा कट चालविला जात आहे. ज्याना कुणाला बाबासाहेबांच्या इतर कुठल्याही असली कागदपत्रांची खात्री करुन घ्यावयाची आहे त्यानी मला संपर्क साधावा. मी तसे कागदपत्र उपलब्ध करुन बाबासाहेबांबद्दल निर्माण केला जाणारा संभ्रम दुर करण्याचे माझ्या परिने सर्वतोपरी प्रयत्न करीन. काहि लोकं आपल्या चळवळीला सुरुंग लावण्याचे काम करीत आहे. बाबासाहेबांना चख्ख शिवाजी महाराज व भवानीचा अनुयायी बनविन्याचे षडयंत्र चालविले जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यात सर्व जातींच्या लोकांना सामील करून घेतले, अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या महार लोकांना किल्लेदार बनविले, आपले अंगरक्षकामध्ये मुस्लीम सरदार देखील सामील केले, सर्व जाती धर्माच्या लोकांना आपल्या सोबत घेवून स्वराज्याची पताका फडकावली, छत्रपती शिवरायांचे कार्य अनमोल आहे, परंतु काही समाजविघातक लोक बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवराय यांच्या विचारांमध्ये आपले विचार घुसवून राजकीय स्वार्थ साधत आहेत.  तेव्हा      मित्रानो तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आंबेडकरी समाज म्हणजे अभ्यासू वृत्तीचा समाज समजला जातो, म्हणून मी म्हणतोय किंवा एम. डी. रामटेके सर म्हणतायेत म्हणून नाही तर कोणतीही गोष्ट अभ्यासल्या शिवाय त्यावर विश्वास ठेवू नका, तुम्हाला ज्या ज्या गोष्टींबद्दल शंका असतील तर त्या अभ्यासाने दूर करा, सारणी पुराव्या निशी साबित केले कि बाबासाहेब कोणाचा आदर्श घेवून चालत होते, त्यामुळे तुमच्या मनातील संभ्रम थोड्या प्रमाणात दूर झालेला असेल असे मी  समजतो. जय भीम...जय बुद्ध...जय भारत...!!!    
                                  
अँड. राज जाधव...!!! 
मूळ लेख इथेही वाचू शकता - एम. डी. रामटेके.

2 comments:

  1. Raj सर आपण डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्रांबद्दल खुपच महत्वपूर्ण अशी माहीती दिली त्याबद्दल आपले खुप खुप आभार. आपल्या लेखातील एक गोष्ट मनाला नाही पटली ती आपणास व्यक्त करत आहे. आपण दीलेल्या लेखातील काही ओळी
    "......एवढ्यावरच न थांबता या लोकानी असाही प्रचार चालविला आहे की संत तुकाराम हे बाबासाहेबाना अत्यंत पुज्य स्थानी होते. म्हणुन आपल्या मंचावरुन तुकारामाचं जगत गुरु म्हणुन उदात्तीकरण करण्यात येत आहे.
    प्रतिप्रश्न केल्यास ते असे उत्तर देतात की बाबासाहेबानी स्वत: त्यांच्या पाक्षिकांमधून तसे लिहले आहे. पण हे लोकं एक साधी गोष्ट विसरतात की तसे असल्यास मग बाबासाहेबानी कबीरा ऐवजी तुकारामानांच आपले गुरु मानले नसते का ?......"

    या ओळी मद्ये तुम्ही संत कबीर व् संत तुकाराम महाराज यांच्या मद्ये comparison ( तुलणा ) केल आहे.
    आपण अस बहूजन महापुरुषांमध्ये comparison करने योग्य आहे का...??

    या ओळीतिल पहिली ओळ "...या लोकांनी असाही प्रचार चालविला आहे..." यातिल 'या लोकांनी' म्हणजे नेमकं कोणी हे नाही समजल.
    याचा अर्थ आम्ही 'मराठा लोकांनी' असा घ्यायचा का..?? लेखातून तर हेच अभिप्रेत होत आहे.. कृपया हे आपण स्पष्ट करावे.

    याव्यतिरिक्त आपण लेख अतिशय सुरेख लिहिला आहे.


    ReplyDelete
  2. धन्यवाद अनिकेत जी, मुळात हा लेख एम.डी रामटेके सर यांच्या लेखावरून घेतला आहे,
    संत कबीर आणि संत तुकाराम यांची तुलना होऊ शकत नाही आणि दोघे हि आपापल्या स्थानी योग्य आहेत,
    दुसरे म्हणजे "या लोकांनी" म्हणजे "मराठा समाज" किंवा इतर कोणताही समाज इथे अपेक्षित नाही, त्या एवजी "काही स्वार्थी द्वेशवादी संघटना" असे म्हणावयाचे आहे.

    ReplyDelete