My Followers

Friday, 27 February 2015

अनावरण...!

अनावरण...!

मी तुमच्या पुतळयाच
बाबासाहेब 
आज अनावरण केलं
(तुम्हाला कळलच असेल)
तुमच्या पुतळ्याला 
डोळे मिटून भाविकतेन 
नमस्कार केला  
(नाटक केलंस बामणा?) 
नाटक ?
थोडफार असेलही 
लोकांच्या नजराच नाटकाला जन्म देतात 
ते पृथ्वीवर वावरणाऱ्या 
कोणालाच चुकत नाही 
(ऐकलय जग हे रंगभूमी वगैरे )
काबुल आहे, पण 
सारच नाटक न्हवत...
निमिषार्ध
अगदी निमिषार्ध बाबासाहेब 
माझ्या दृष्टीतून अवतरला 
एक श्रद्धाशील श्रमण
बोधीवृक्षाच्या तळाशी बसलेल्या 
तथागताकडे  पाहणारा 
(कविता करतोस काय यमक्या ?)
नाही "बाबासाहेब" 
"तुम्ही" हा विषय 
कवितेत मावणारा नाही  
हे पूर्वीच लक्षात आलाय माझ्या 
रंगीत फुग्यामध्ये 
आकाश पकडणार्या सारखे 
आणि तरीही 
सशत्र कविता लिहिल्याचं
अपूर्व समाधान
त्याक्षणी मला मिळालं
(लोकांच्या टाळ्या घेतल्याचं?)
 ते हि असतंच कोणत्या व्यासपीठावर 
टाळ्यांची तोरण बांधावी लागतातच 
पण मला मिळालं 
ते समाधान न्हवत 
तो एक अदभूत अनुभव होता 
त्या क्षणर्धात मी 
माझ्या संगमरवरी चौथर्यावरून
खाली खोल-खोल कोसळत गेलो 
कड्यावरून दरीत 
भिरकावलेल्या दगडासारखा 
थेट पाताळापर्यंत, जेथे 
खाली हि संज्ञाच न्हवती 
त्या तळावरून 
मी तुमच्या पुतळ्याकडे पाहिलं 
तेव्हा पुतळा दिसलाच नाही 
दिसत होता, जाणवत होता 
"एक विरत दाहक तेजोगोल"
सूर्याच्या कोरोनासारखा...!

कवी - कुसुमाग्रज (वि.वा. शिरवाडकर ), 
संदर्भ - प्रिय भिमास, काव्य संग्रह 
संपादन - राज जाधव....!   

Wednesday, 18 February 2015

"शिवजयंतीच्या" हार्दिक शुभेच्छा...!

 "शिवजयंतीच्या" हार्दिक शुभेच्छा...!


आज "शिवजयंती"..... काही हिंदुत्ववादी छत्रपती शिवरायांचा अफझलखानासोबतचा फोटो टाकतील, आणि शिर्षक देतील, "आतंकवाद असाच संपवला जातो" तर काही उत्साही, 
"कृष्णा भास्कर कुलकर्णी" सोबतचे टाकतील, ते हि मजकुरासहित, 
"ब्राह्मण म्हणून कोण मुलाहिजा करू पाहतो", 
पण कोणी 
"सागरी आरमार" उभे करतानाचा, "शेतात नांगरणी" करतानाचा, "जनता दरबाराचा", "न्यायदानाचा", असे कित्येक त्यांच्या कार्यांचा पुढाकार करणारा, 
पुरस्कर्ता कोणी दिसणार नाही, अरे "अफझल खान" आणि 
"कृष्णा भास्कर कुलकर्णी" या शिवाय 
"शिवछत्रपतींच" अस्तित्व नाही का ? 
या शिवाय देखील "शिव छत्रपति" आहेत, 
हे नव्या पिढीला कळू द्या...तुमची पिढी तर घालवताय 
"नकारात्मतेत"... 
पण येणारी पिढी तरी "सकारात्मक" घडू द्या.... 
खरे शिवराय त्यांच्या प्रजेला कळू द्या...!

"छत्रपती शिवरायांना "डोक्यावर" न घेता "डोक्यात" घेणाऱ्या सर्व "विचारी मावळ्यांना"..... 
"शिवजयंतीच्या" हार्दिक हार्दिक शुभेच्छा"...!



- अॅड. राज जाधव -


Tuesday, 17 February 2015

ब्राम्हण व ब्राम्हन्य......!

ब्राम्हण व ब्राम्हन्य......!


ब्राम्हण हि जात आहे . ब्राम्हन्य हा गुणधर्म आहे .वृत्ती आहे .इतरांना तुछ आणि कमी प्रतीचे लेखने व स्वताला श्रेष्ठ व उच्च समजणे हि ब्राम्हनायची लक्षणे आहेत . धुर्तपना , फासविण्याची कला, गविष्ठपणा हि आणखी काही लक्षणे आहेत. अहंगंड जोपासणे व वाढवीत रहाणे .हे ब्राम्हन्यच आहे.ब्राम्हन्य दीघर व्दे शी असते . खोटे बोलने , रेटून बोलणे एकाच वेळा वेगवेगळे बोलणे हि आणखी काही वैशिष्ठे सांगता येतील.
जात जन्माने मिळते. स्वछता,निटनेटकेपणा ,अभ्यास, करण्याची व ज्ञअन मिळविनाची लालसा ब्राम्हन कुटुंबात जोपासली जाते.शिक्षणाची व ज्ञानाची परंपरा असते. त्याचे लाभ मिळतात .

ब्राम्हण्यात कांही चांगले असते.व्यक्तीला व्यक्ती म्हणून त्याचा लाभ मिळतो.समाज घटक म्हणून ब्राम्हन्य हानिकारक असते. थोडे असतील परंतु ब्राम्हनात सुध्दा ब्राम्हन्य नसलेले काही असतात .तसेच ब्राम्हनेतराहि काही ब्राम्हन्य धारण कलेले असतात.

ब्राम्हन्य हे मुलतः व मुख्यत ब्राम्हन्य जातीनेच जन्माला घातले व वाढविले , परंतु आणि ती अलीकडे वाढत आहे.ब्राम्हनातले ब्राम्हन्य तर वाईट आहे. ब्राम्हनतले ब्राम्हनेत्रातील ब्राम्हन्य सुधा वाईटच असते.व आहे.अनेकदा ब्राम्हनेत्रातील ब्राम्हन्य जास्त सामाजिक दृष्ट्या हानिकारक असते.
ब्राम्हनांचे ब्राम्हन्य मी खपवून घेणार नाही. हि भूमिका असावीच परंतु मी ब्राम्हन्यकृती स्वीकारणार नाही. हि सुधा भूमिका असावी.मी कुणाचा गुलाम राहणार नाही. हे तर हवेच हवे परंतु मी कुणाला गुलाम करणार नाही. हे सुधा हवे .

ब्राम्हन्य हा संसग्राजन्य महारोग आहे. या रोगाची उत्पत्ती जातीने ब्राम्हन्यअसलेल्यातच झाली . आजही ब्राम्हन्यातच ब्राम्हन्यग्रास्तांचे प्रमाण जास्त आहे. कुठे ते उघड आहे. कुठे ते छुपे आहे. पण असतेच . हा संस्ग्रजन्य रोग असल्यामुळे हा रोग ब्राम्हनेत्राठी पसरला आहे. मराठयात ब्राम्हन्य आहे. महरत आहे, मातंगात आहे. चान्भारात आहे. ढोरात आहे. सर्वात आहे. आंनी हे वाढीत आहे.समाजाचा इतिहास असे सांगतो की मराठ्यांना पुढाकार घेऊन ब्राम्हनेतर वाद जोपासला स्वत ब्राम्हन्यवादी बनले. इतरांना तुच्छ लेखू लागले. पुढे हीच ब्राम्हन्यवादी प्रकृती सर्वजातीत पसरला आहे.
ब्राम्हन्य हे कोणत्याही जन्मजात जातीत असले तरी ते वाईट असते .व आहे. सर्वात पुरोगामी सुधा ब्राम्हन्य जातीतच आहेत. ज्याअर्थी अमुक एक व्यक्ती जन्माने ब्राम्हन आहे .त्याअर्थी तो प्रतिगामी आहे .आणि ज्याअर्थी अमुक एक म्हणजे मराठा किंवा दलित किंवा ओबीसी आहे . त्याअर्थी तो पुरोगामी आहे . हि दोन्ही प्रमेये चूक आहेत.

- कॉम्रेड गोविंद पानसरे....!

Sunday, 15 February 2015

"पार्वती योनि"...!

"नेहा नरुका" की कविता..."पार्वती योनि"....!

ऐसा क्या किया था शिव तुमने ?
रची थी कौन-सी लीला ? ? ?
जो इतना विख्यात हो गया तुम्हारा लिंग
माताएं बेटों के यश, धन व पुत्रादि के लिए
पतिव्रताएँ पति की लंबी उम्र के लिए
अच्छे घर-वर के लिए कुवाँरियाँ
पूजती है तुम्हारे लिंग को,
दूध-दही-गुड़-फल-मेवा वगैरह
अर्पित होता है तुम्हारे लिंग पर
रोली, चंदन, महावर से
आड़ी-तिरछी लकीरें काढ़कर,
सजाया जाता है उसे
फिर ढोक देकर बारंबार
गाती हैं आरती
उच्चारती हैं एक सौ आठ नाम
तुम्हारे लिंग को दूध से धोकर
माथे पर लगाती है टीका
जीभ पर रखकर
बड़े स्वाद से स्वीकार करती हैं
लिंग पर चढ़े हुए प्रसाद को
वे नहीं जानती कि यह
पार्वती की योनि में स्थित
तुम्हारा लिंग है,
वे इसे भगवान समझती हैं,
अवतारी मानती हैं,
तुम्हारा लिंग गर्व से इठलाता
समाया रहता है पार्वती योनि में,
और उससे बहता रहता है
दूध, दही और नैवेद्य...
जिसे लाँघना निषेध है
इसलिए वे औरतें
करतीं हैं आधी परिक्रमा
वे नहीं सोच पातीं
कि यदि लिंग का अर्थ
स्त्रीलिंग या पुल्लिंग दोनों है
तो इसका नाम पार्वती लिंग क्यों नहीं ?
और यदि लिंग केवल पुरूषांग है
तो फिर इसे पार्वती योनि भी
क्यों न कहा जाए ?
लिंगपूजकों ने
चूँकि नहीं पढ़ा ‘कुमारसंभव’
और पढ़ा तो ‘कामसूत्र’ भी नहीं होगा,
सच जानते ही कितना हैं?
हालांकि पढ़े-लिखे हैं
कुछ ने पढ़ी है केवल स्त्री-सुबोधिनी
वे अगर पढ़ते और जान पाते
कि कैसे धर्म, समाज और सत्ता
मिलकर दमन करते हैं योनि का,
अगर कहीं वेद-पुराणऔर इतिहास के
महान मोटे ग्रन्थों की सच्चाई!
औरत समझ जाए
तो फिर वे पूछ सकती हैं
संभोग के इस शास्त्रीय प्रतीक के-
स्त्री-पुरूष के समरस होने की मुद्रा के-
दो नाम नहीं हो सकते थे क्या?
वे पढ़ लेंगी
तो निश्चित ही पूछेंगी,
कि इस दृश्य को गढ़ने वाले
कलाकारों की जीभ
क्या पितृसमर्पित सम्राटों ने कटवा दी थी
क्या बदले में भेंट कर दी गईं थीं
लाखों अशर्फियां,
कि गूंगे हो गए शिल्पकार
और बता नहीं पाए
कि संभोग के इस प्रतीक में
एक और सहयोगी है
जिसे पार्वती योनि कहते हैं..!
- नेहा नरुका.....! 
(नेहा नरुका महात्मा गाँधी अंतर्राष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय में शोध सहायक हैं.)

संदर्भ - 
http://kavitakosh.org/kk/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF_/_%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%B9%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE

Thursday, 12 February 2015

..तेच खरे दलित साहित्य....!

..तेच खरे दलित साहित्य....!


चंद्रपूर येथे ४ मार्च १९८९ रोजी झालेल्या अखिल भारतीय मराठी दलित साहित्य संमेलनाचे उद्घाटन पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते झाले होते. त्या वेळी पुलंनी केलेल्या भाषणाचे संकलन..
मित्रहो,
दलित साहित्य संमेलनाला जमलेला हा नुसता समुदाय नाही. माणसांच्या गर्दीच्या रूपाने दिसणारी फुले, आगरकर, आंबेडकरांनी जिवाची तमा न बाळगता ज्ञानाग्नीला साक्षी ठेवून केलेल्या तपाला आलेली फळं आहेत. त्यापुढे मला उभं राहायला मिळणं हा मी माझ्या आयुष्यातला धन्यतेचा क्षण मानतो. 'जिकडे जावे तिकडे माझी भावंडे आहेत, खुणा माझ्या घरच्या मजला दिसताहेत' या भावनेला दाद देणारा एक मित्र तुम्ही माझ्यात पाहिलात याचं मला समाधान वाटलं. 
परंपरेने डोळे मिटून स्वीकारलेल्या साहित्यविषयक, कलाविषयक, समीक्षाविषयक आणि साक्षात इतिहासविषयक कल्पनांना एखाद्या स्फोटासारखा नकार देत विद्रोही साहित्य ज्वालांच्या इंद्रधनुष्यासारखं मराठी साहित्याच्या आकाशात दिसायला लागलं. केशवसुतांच्याच 'परि एक एक जो नवा शब्द तू शिकसी, शक्ती तयाची उलथिल सर्व जगासी' या ओळीचा जबरदस्त प्रत्यय आला. दलित जीवनातल्या दु:खाचं यापूर्वी दर्शन घडलं नव्हतं असं नाही. या बाबतीत माटे मास्तरांचा उल्लेख जरूर करायला हवा; पण हे दर्शन आणि आंबेडकरी प्रेरणेतून उभ्या राहिलेल्या या नव्या कवींनी, कथाकारांनी आणि आत्मचरित्रकारांनी घडवलेले दर्शन यात जमीन-अस्मानाचा फरक होता. आजवर हे दर्शन सद्हेतूनंच घडवलेलं होतं; पण त्यामागं प्रयोजन दलितेतर समाजात दलितांविषयी सहानुभूती निर्माण व्हावी हे होतं. त्या समाजात जुन्या बुरसटलेल्या शोषक जगाला उलथविण्याची शक्ती निर्माण व्हायला पाहिजे, ही आच नव्हती. 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नवा शब्द शिकवला आणि त्यातून जुनं जग उलथवण्याची शक्ती असते असं साहित्य उभं राहिलं. तो शब्द म्हणजे 'धम्म'. धम्म या शब्दानं समाजात माणसांचं श्रेष्ठत्व आणि ऐहिकता या सर्वात महत्त्वाच्या मूल्यांची प्राणप्रतिष्ठा केली. या नव्या जीवनमूल्यांना त्यांनी 'धम्म' म्हटलं. बाबासाहेबांनी धर्माचा त्याग करून दुसरा धर्म स्वीकारला असं झालं नाही, तर निखळ आणि करुणेचं त्यांना जिथे अपूर्व मिश्रण आढळलं, त्या तत्त्वज्ञानाचा त्यांनी स्वीकार केला.
गावकुसाबाहेर राहणाऱ्यांना गावातला माणूस ठाऊक होता तो आपल्याला रक्त फुटेस्तोवर कष्ट करायला लावून मोठा उपकार केल्यासारखा शिळ्या भाकरीचा तुकडा टाकणारा, आपल्या सावलीलासुद्धा अपवित्र मानणारा असा एक हुकूमशहा एवढंच आणि गावातल्या माणसांच्या लेखी गावकुसाबाहेर राहणारा माणूस म्हणजे दारोदारी झाडलोटीपासून ते मलमूत्रांची घाण उपसण्याची 'नियतं कर्म कुरु' ही साक्षात भगवंताची आज्ञा पाळण्याशिवाय गत्यंतर नसलेला आणि बरेचसे कष्ट नि भूतदयेपोटी घातलेली भीक एवढय़ावर जगणारा एक मनुष्यधारी प्राणी एवढंच ठाऊक असायचं. अशा या उन्मत्तांच्या टाचेखाली रगडल्या जाणाऱ्या माणसाला माणुसकीच्या प्राथमिक हक्कांसाठी लढणारा सैनिक म्हणून उभं करणं हे एक दिव्य होतं. बाबासाहेबांनी ते करून दाखवलं. 
चवदार तळ्याचं पाणी सर्वाना वापरायला द्यायची घोषणा म्हणजे बाबासाहेबांनी आंधळ्या रूढी पाळणाऱ्या अमानुषांना निखळ सुंदर माणसं बनण्याची दिलेली एक सुवर्णसंधी होती. आज आपण ज्याला विद्रोही दलित साहित्य म्हणतो, त्याच्या निर्मितीमागची शक्तीही बाबासाहेबांनी जागवलेल्या या आत्मविश्वासातून लाभली आहे, असं मला वाटतं. या घटनेपासून दलित समाजात जे नवचैतन्य निर्माण झाले त्यातूनच आपल्या जीवनाची कथा ही कुठल्याही सहानुभूतीची, दयेची किंवा औदार्याची अपेक्षा न बाळगता रोखठोकपणानं मांडली गेली.  

जिथे धर्म, वर्ण, वर्ग या शक्ती माणसाच्या छळासाठी अन्याय्य रीतीने वापरल्या जातात, तिथे त्या प्रवृत्तींचा नाश करायला शस्त्र म्हणून जेव्हा शब्द वापरले जातात त्या क्षणी दलित साहित्याचा जन्म होतो. त्या साहित्यिकाचा जन्म कुठल्या जातीत आणि कुठल्या धर्मात झाला याचा इथे काहीही संबंध नाही. शोषण, उपेक्षा, जन्मावरून उच्च-नीच भेद ठरविणाऱ्या रूढी यांचा बीमोड करायला उठलेलं हे साहित्य फक्त माणुसकीला मानतं. विद्रोहाला मानतं. मग तो विद्रोह स्त्री-मुक्तीविषयक असो, स्पृश्यास्पृश्य भेदाविरुद्ध असो, आदिवासींच्या पिळवणुकीबद्दल असो, भटक्यांच्या जीवनातल्या यातनांबद्दल असो, नरकाची दहशत आणि स्वर्गाची भुरळ घालून फसवणाऱ्या बुवा-बाबांबद्दल असो, या अनिष्ट गोष्टींशी विद्रोहाची भूमिका घेऊन जे साहित्य उभं राहतं ते दलित साहित्य.
जीवनात विज्ञाननिष्ठा न मानता बाबासाहेबांच्या नावाचा उपयोग जपासाठी आणि पूजेसाठी व्हायला लागला, तर एका महान क्रांतीच्या इतिहासातील ती भयानक शोकांतिका ठरेल. बाबासाहेबांसारखा ग्रंथप्रेमी आजच्या काळात लाखात एखादा झाला असेल; पण जीवनातला त्यांचा प्रवास मात्र ग्रंथाकडून ग्रंथाकडे असा झाला नाही. ग्रंथाकडून जीवनाकडे आणि जीवनाकडून ग्रंथाकडे अशी त्यांची परिक्रमा चालली होती. अशी जीवनातून प्रेरणा घेऊन पुन्हा जीवनालाच सार्थ करणारे साहित्य निर्माण करायची प्रेरणा लाभावी, यासाठी या साहित्य संमेलनाचा प्रपंच आहे असं मी मानतो.
(शांता शेळके संपादित आणि परचुरे प्रकाशन प्रकाशित पु. ल. देशपांडे यांच्या 'मित्रहो' या पुस्तकाच्या सौजन्याने)
संकलन- शेखर जोशी     
संदर्भ - http://www.loksatta.com/vishesh-news/pl-deshpande-speech-at-dalit-sahitya-sammelan-at-chandrapur-in-1989-1065102/?nopagi=1

Monday, 9 February 2015

"आह्मी महार असतो तर"..? - आचार्य प्र. के.अत्रे

"आह्मी महार असतो तर" - आचार्य प्र. के.अत्रे

हा प्रश्न गेले कित्येक दिवस आह्मी आमच्या मनाला विचारित आहोत. गेल्या महिन्यात नाग्पुर येथे  आंबेडकरानी व त्यंचे दोन लाख महार यानी बौद्ध धर्माचा स्विकार केला. पुढल्या महिन्यात मुंबइ येथे दोन ते चार लाख महार बान्ध्वाना बुद्धधर्माची दिक्षा देणार आहेत. भगावन बुद्धाचा धर्म स्वीकारण्याची प्रच्ंड लाट या देशातील अस्प्र्श्य समाजामधे उलटलेली आहे.


बुद्धधर्मीय झालेल्या महार्ंच्या अभीनदनांच्या दोन – तीन सभा मधे आह्मी हजर होतो. तेथील चैतन्य आणी हर्षाचे वातवरण आह्मी डोळ्यानी पाहिलेय. त्याच वेळी आमच्या मनात प्रश्न उद्भवला की , आह्मी स्वत: महार असतो तर काय केले असते ? भारतातील लक्षावधी लोक बुद्धधर्माची दिक्षा स्वीकार करत आहेत ही काय समान्य घटना आहे ? शताकाशतकात न घडलेली ही महान ऎतिहासीक घटना आहे, पण एव्हढी क्रांतीकारक घटना होत असताना त्याची देशात प्रतिक्रिया काय घडत आहे ? लक्षावधी अस्प्रुश्य समाज बुद्धधर्माची दिक्षा स्वीकार करत आहेत हे पाहुन हिन्दु समाजाला काय वाटत आहे ? काही नाही. अक्षरशा काही नाही. कोणालाही त्याबद्धल काही वाटत नाही आन्नद वाटत नाही व दुख ही वाटत नाही. 

सावरकरान्नी ‘ केसरी ’ त ह्यावर टिका केली असेल तेव्हढीच. लक्षावधी लोक अस्प्रुश्य बौद्ध झाले ह्याचा हिन्दु समाजाला केव्ह्ढा धक्का बसायला पाहिजे होता. काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत निशेधाच्या वा शोकाच्या म्हणा , प्रच्ंड सभा भ्रवल्या व्हव्या होत्या, पण असे काहीच घडले नाही. ह्याचा अर्थ हाच नव्हे काय की, हिन्दु धर्मातुन कोणी कितीही संखेने बाहेर पडले तरी , बाकीच्या हिन्दुसमाजाला त्यचे काहीच वाटत नाही, जणु काही तो असेच म्हणत असतो की, ‘जा, हवे तितके जा, अम्च्या धर्मातुन जा, आमच्या धर्माचे आणी समाजाचे तुमच्या जाण्याणे काडी इतका ही नुकसान होणार नाही ‘

गेली पाच हजार वर्षे परधर्मात जाण्यार्या सह्स्त्रावधी हिन्दुंच्या बद्धल बाकीच्या हिन्दु समजाची हीच बेफिकीरी व बेवर्वाइची व्रुत्ती आहे. हिन्दु धर्मात बाहेरुन कोणी येण्याचा मुळी प्र्श्नच उत्प्न्न होत नाही . जो उठतो तोह य्हा ध्र्मातुन बाहेर पडतो . ह्या गोष्टीचा विच्रार करणे जरुर आहे , त्यावर उपाय शोधुन काढणे आवश्यक आहे असे हिन्दु लोकाना निवा समाजाला मुळीच वाटत नाही. आंबेडकरानी व अनुयायानी दिक्षा घेतली ह्याचे आह्माला आश्चर्य आणी वाइट वाटत नाही , उलट आनन्द वाटतो.  कोणी म्हणेल की तुह्मी हिन्दु धर्माचे शत्रु आहे.  

आंबेडक्रानी व त्यांच्या अनुयाय्नी ‘धर्म्मांतर‘ केले हा शब्द प्रयोग आह्म्हाला पसंत नाही, त्यानी धर्म स्विकार केला असेच आह्मी म्हणु . अस्प्रुश्य समाज हा हिन्दु आहे ही गोष्ट्च मुळी आह्माला मान्य नाही . आह्मी त्याना धर्मा पासुन नेहमीच दुर ठेवले आहे , म्हणुन त्यानी बुद्धधर्म स्विकरला, ह्याब्द्धल हिन्दुना शोक करण्याचा हिन्दुमात्राना अधिकार नाही. बुद्धधर्म हा हिन्दु धर्माचाच एक भाग आहे अशी मखलाशी आमच्यातले काही दिदशहाणे करतात , तो त्यांचा मत्सर आणी घमेंडखोरपणा आहे . कोणी म्हणत बौद्ध होवुन त्यांची अस्प्रुश्यता जाणार नाही . कोणी म्हणत बौद्ध होवुन त्यांची आर्थीक सुधारणा होणार नाही . असे म्हणणार्याना बौद्धधर्म स्विकारण्यारयांची भावना मुळी कळलीच नाही .

बौद्ध झाल्याने हिन्दु लोक आपल्याला अप्र्युश्य समलजणार नाही आपली आर्थीक सुधराणा होणार नाही ही गोष्ट काय आंबेडकराना समजत नाही ? आंबेडकराना त्याची बिल्कुल पर्वा नाही . उलट झगडुन मिळविलेल्या आपल्या राजकिय हक्कंवर पाणी सोडायलासुद्धा ते तयार झाले आहेत. ह्याचे कारण धर्माला आणी संस्क्रुतीला हजारो वर्षे आचवलेल्या कोट्यावधी अस्प्रुश्याना न्यायावर आणी समतेवर आधारलेल्या अका महान धर्माची , तत्वद्न्यनाची आणी संक्रुतीची दिक्षा देण्याची आंबेडकराना तळमळ लागली आहे. बुद्धधर्माच्या दिक्षातील आचारांचे जर समाज काटेकोर पालन करील तर एक पिढीच्या आत ह्या सर्व समाजाची बौद्धीक आणी नैतीक उंची सर्वसमान्य हिन्दु समाजपेक्षाही वाढल्यावाचुन राहणार नाही. बुद्धधर्माचा स्विकार हा सप्रुश्य समाजाचा महान प्रयत्न आहे. त्याना नावे ठेवण्याचा हिन्दुना अधिकार नाही. आम्ही महार असतो तर हेच केले असते.

लेखक - आचार्य प्र. के. अत्रे...मराठा - २२/११/१९५६... 

(संकलन - राहुल गायकवाड) 

Saturday, 7 February 2015

रमाईस कोटि कोटि प्रणाम...!


कारुण्यमूर्ती माय माऊली माता रमाईस कोटि कोटि प्रणाम...!



रमा बोले साहेबांना, हट्ट पुरवा माझ्या राया
त्या महाड संग्रामात, नका विसरू मला न्याया।
आजपरी मी हो कसला, कधी हट्ट नाही केला
आली संधी आज नामी, मग नकार कशाला ?
चितारले मनी स्वप्न, पुढे साकार कराया।।

Friday, 6 February 2015

विरोध....!

विरोध....!

काल आम्ही महात्म्याच्या "अहिंसेच्या अतिरेकाचा" विरोध केला, 
तुम्ही मात्र त्याचा धोतर घालून उदो उदो केलात, 
आज तुम्हीही विरोध करताय....

काल आम्ही नथूच्या "स्वार्थी हिंसेचा" विरोध केला, 
तुम्ही मात्र त्याचा जानवे घालून उदो उदो केलात, 
आज तुम्हीही विरोध करताय....
काल आम्ही संघाच्या "उदिष्टांचा" विरोध केला, 
तुम्ही मात्र त्याचा चडड्या घालून उदो उदो केलात, 
आज तुम्हीही विरोध करताय....
काल आम्ही सेनाप्रमुखाच्या "जात्यंधतेचा" विरोध केला, 
तुम्ही मात्र त्याचा सैनिक बनून उदो उदो केलात, 
आज तुम्हीही विरोध करताय....
काल आम्ही अन्नाच्या "आताताईपणाला" विरोध केला, 
तुम्ही मात्र त्याचा टोप्या घालून उदो उदो केलात, 
आज तुम्हीही विरोध करताय....
काल आम्ही केजरीवालच्या "बालीशपणाचा" विरोध केला,
तुम्ही मात्र त्याचा मफलर घालून उदो उदो केलात, 
आज तुम्हीही विरोध करताय....
आज आम्ही मोदीच्या "स्वप्रेमाचा" विरोध करतोय, 
तुम्ही मात्र त्याचा भगवे कुर्ते घालून मोदी मोदी करताय,
आता तुमची बारी, कधी विरोध करताय ? 
कि पुन्हा एका...नव्या भगव्या माथेफिरुची वाट पाहताय ?

रचना - राज जाधव...!

Tuesday, 3 February 2015

जातीचा दाखला....!

जातीचा दाखला....!

जातीचा दाखला मी पण
कोर्टातून काढला

पुन्हा एकदा सरकारन 
आदेश बघा धाडला

कोर्टाच्या दाखल्याची 
गेली होती किम्म्त !

माय बाप सरकार, 
करीत होते गम्मत !

काय काय अटी होत्या, 
विकासात होता खोडा !

१९५० सालचा पुरावा, 
अर्जासोबत जोडा !

म्हटले मी बापाला,
दाखला गावाकडन आणा !

मुंबईत होत मुश्कील, 
सायेब लय शहाणा !

बाप माझा हुशार, 
आणला एकदाचा दाखला !

प्रगतीचा मार्ग 
माझा मीच जोखला

बँकेच्या परीक्षेत, 
झालो एकदा पास !

दाखला बघून सायबानी, 
केल मला नापास !

मुंबईच्या हाफिस्ला 
पुना केली अर्जी !

द्यायला दाखला, 
सायबाची नव्हती मर्जी !

जन्म होता २२ सालचा, 
बाप शिकला पुस्तक सात !

३६ साली शाळा सोडली, 
काम करू लागले हाथ !

आजोबा मेला ६६ ला, 
मृत्यू दाखला मग दावला !

जात होती लिवली त्यात, 
तरी सायेब नाय पावला !

म्या म्हटले सायबाला, 
आजोबा ज्या जातीचा,
त्याच जातीतला बाप !

हाकलून दिल सायबान, 
आमचा उडाला थरकाप !

गावाकडचा दाखला, 
जोशी सायबास्नी नाय आवडला !

मुलाखत घेतली माझी, 
पण मला नाय निवडला !

झाला होता अन्याय 
सायेब होता जोशी !

नशिबावर आमच्या 
शिंकली होती माशी !

वर्षे गेली दोन, 
संधी आली लय भारी !

७ ठिकाणी पास झालो, 
नेमणूकीपत्रांची रांग दारी !

तोच दाखला होता, 
पण सायेब होता येगळा !

आकाशात उडण्याचा 
मार्ग झाला होता मोकळा 


- गजाभाऊ लोखंडे...!

Monday, 2 February 2015

बाबासाहेब...!

बाबासाहेब...!

"बाबासाहेब" हे नुसतं नाव नसुन, "विद्यापिठ" आहे,

ज्यांनी ज्यांनी विद्यार्जन केलेय त्यांनी, "बाबासाहेबांच नाव" 
घेतलचं पाहिजे...!

"बाबासाहेब" हे नुसतं नाव नसुन, "पाणवठा" आहे,

ज्यांनी ज्यांनी पाणी चाखलयं त्यांनी, "बाबासाहेबांच नाव" 
घेतलचं पाहिजे...!

"बाबासाहेब" हे नुसतं नाव नसुन, "निवारा" आहे,

ज्यांनी ज्यांनी विसावा घेतलाय त्यांनी, "बाबासाहेबांच नाव" 
घेतलचं पाहिजे...!

"बाबासाहेब" हे नुसतं नाव नसुन, "संघर्ष" आहे,

ज्यांनी ज्यांनी लढा दिलाय त्यांनी, "बाबासाहेबांच नाव" 
घेतलचं पाहिजे...!

"बाबासाहेब" हे नुसतं नाव नसुन, "स्वाभिमान" आहे,

ज्यांनी ज्यांनी स्वतःमध्ये जागवलाय त्यांनी, "बाबासाहेबांच नाव" 
घेतलचं पाहिजे...!

"बाबासाहेब" हे नुसतं नाव नसुन, "त्याग" आहे,

ज्यांनी ज्यांनी भोगलाय त्यांनी, "बाबासाहेबांच नाव" 
घेतलचं पाहिजे...!

"बाबासाहेब" हे नुसतं नाव नसुन, "मार्ग" आहे,

ज्यांना ज्यांना भेटलाय त्यांनी, "बाबासाहेबांच नाव" 
घेतलचं पाहिजे...!

"बाबासाहेब" हे नुसतं नाव नसुन, "विचार" आहे,

ज्यांनी ज्यांनी आचारात आणलाय त्यांनी, "बाबासाहेबांच नाव" 
घेतलचं पाहिजे...!

"बाबासाहेब" हे नाव नसुन, "क्रांति" आहे,

ज्यांनी ज्यांनी पेटवलीय त्यांनी, "बाबासाहेबांच नाव" 
घेतलचं पाहिजे...!

"बाबासाहेब" हे नाव नसुन, "श्वास" आहे,

जे जे "सजीव" आहेत त्यांनी, "बाबासाहेबांच नाव" 
घेतलचं पाहिजे...!

कवी - अॅड. राज जाधव...!