!! बावीस प्रतिज्ञा !!
१ ) मी, ब्रह्म, विष्णु आणि महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
२ ) मी, राम व कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही.
३) मी, गौरी-गणपति इत्यादी हिन्दू धर्मातील देव देवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही
४) देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही.
५ ) बुद्ध हा विष्णुचा अवतार होय हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो.
६) मी श्राद्धपक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही.
७) मी बुद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत कोणतेच आचरण करणार नाही.
८) मी कोणतेही क्रियाक्रम ब्राह्मणाच्या हातून करवून घेणार नाही.
९) सर्व मनुष्यमात्र समान आहेत असे मी मानतो.
१०) मी समता स्थापन्याचा प्रयत्न करीन.
११) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या अष्टांगिक मार्गाचा आवलंब करीन.
१२) मी भगवान बुद्धाने सांगितलेल्या दहा पारमितांचे पालन करीन.
१३) मी सर्व प्राणीमात्रावर दया करीन, त्यांचे लालन पालन करीन.
१४) मी चोरी करणार नाही.
१५) मी खोटे बोलणार नाही.
१६) मी व्यभिचार करणार नाही.
१७) मी नशायुक्त कोणत्याही पदार्थाचे सेवन करणार नाही.
१८) प्रज्ञा , शील, व करूणा या बौद्धधम्माच्या तिन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालविन.
१९) मी, माझ्या जुन्या मनुष्य मात्रांच्या उत्कार्शाला हानिकारक असनाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानना-या हिन्दू धर्माचा त्याग करतो व बुद्ध धम्माचा स्वीकार करतो.
२०) बुद्धधम्म हा सद्धम्म आहे अशी माझी खात्री पटलेली आहे.
२१) आज माझा नवा जन्म होत आहे असे मी मानतो.
२२) इत:पर बुद्धाच्या शिकवनुकी प्रमाने वागेन अशी प्रतिज्ञा करतो.........
डॉ. बाबासाहेब आंबेडकरानी १४ ओक्टोम्बर १९५६ साली नागपूरच्या नागभूमित आपल्याला बौद्धधम्मदीक्षा देते वेळेस या बावीस प्रतिज्ञा दिल्या.
(जो व्यक्ति या बावीस प्रतिज्ञानुसार आपले आचरण करतो तोच बाबासाहेबांचा खरा अनुयायी आणि तोच खरा आंबेडकरवादी........!)