tag:blogger.com,1999:blog-328741429405106784.post2156949074436386509..comments2024-01-19T11:50:16.576-08:00Comments on ADV. RAJ JADHAV: श्रीधर बळवंत टिळक हेच खरे ’लोकमान्य’!Adv. Raj Jadhavhttp://www.blogger.com/profile/11488155990903362266noreply@blogger.comBlogger4125tag:blogger.com,1999:blog-328741429405106784.post-1208803061692090912015-09-10T02:36:53.004-07:002015-09-10T02:36:53.004-07:00श्रीधरपंतांनी २५ मे १९२८ रोजी भांबुर्डा येथे मुंबई...श्रीधरपंतांनी २५ मे १९२८ रोजी भांबुर्डा येथे मुंबई-पुणे एक्स्प्रेसखाली जीव दिला. त्यांनी आत्महत्येआधी तीन पत्र लिहिली; एक पुण्याच्या कलेक्टरला , दुसरे विविधवृत्त साप्ताहिकाला आणि तिसरे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना. कलेक्टरला लिहिलेल्या पत्रात त्यांनी आपल्या मृत्यूचे कारण सांगितले आहे. '... मला असे नेहमी वाटे की माझा जन्म माझ्या देशाची, माझ्या समाजाची व माझ्या भाषेची सेवा करण्याकरिता आहे. माझ्या माता पितरांचीही याहून भिन्न कल्पना नव्हती. माझा जन्म वकील आणि कायद्यांची कोर्टे यांचे असहाय खेळणे बनण्याकरिता नव्हता... एखाद्या गरीब अपरिचित शेतकऱ्याच्या झोपडीत माझे जीवितकार्य पुरे करण्याकरिता माझा पुनर्जन्म होवो, अशी मी आशा बाळगतो.'

त्यावेळी ट्रस्टी आणि टिळक बंधू यांच्यात तीव्र स्वरूपाची वादावादी, बाचाबाची आणि प्रसंगी धक्काबुक्कीपर्यंत प्रकरणे चालली होती. अरसपरस फिर्यादींचे सत्र चालू होते. वाड्यातल्या राजकारणामुळे श्रीधरपंत नेहमी वैतागलेले असत. 'केसरी माझ्या हातात आला तर पुन्हा महाराष्ट्राला आगरकरांचा अवतार दखवीन' असे त्यांचे म्हणणे असल्याचा उल्लेख प्रबोधनकार ठाकरे करतात. श्रीधरपंतांचा(बापूचा) स्वभाव त्रासिक असला तरी फार सोशिक होता.

मनातली खळबळ, संताप आणि चीड सगळे गाठोडे विश्वासाने आणि मनमोकळेपणाने आणून ओतण्याचे, श्रीधरपंतांना अवघ्या पुण्यात प्रबोधनकार ठाकरे आणि त्यांचे बिर्हाड हे एकच ठिकाण होते. वाड्यात ट्रस्टी लोकांशी काही गरमागरम बोलाचाली, तंटाभांडण किंवा रामभाऊंबरोबर हातघाईचे प्रकरण झाले का बापू तडाड उठून प्रबोधनकार ठाकरेंकडे यायचे. अगदी मध्यरात्रीसुद्धा. पुणेरी राजकारणाच्या कंकासाला कंटाळून पुण्याला रामराम ठोकून ठाकरे दादरला आले नसते, तर कदाचित बापूने आत्महत्या केलीच नसती.

असत्य, अन्याय, अप्रामाणिकपणा त्याला बिलकूल सहन होत नसे. तो एकदम उखडायचा. त्याच्या कित्येक तक्रारी गंभीर असल्या, तरी पुष्कळशा अगदी क्षुल्लक असत. त्यांचा पाढा तावातावाने त्याने ठाकऱ्यांपुढे ओकला का धीराच्या नि विवेकाच्या चार उपदेशाच्या गोष्टींची मात्रा चाटवून ते त्याला शांत करीत असत. हरएक बऱ्यावाईट घटनेचे चक्र त्याच्या डोक्यात सारखे गरगरत असायचे. मनस्वी विचार करणाऱ्या मंडळीना मनातले विचार आणि भावना मोकळ्या करण्यासाठी एखादा स्नेहीसोबती आप्त जवळपास नसला , म्हणजे ते लोक मनांतल्या मनांत कूढू लागतात. असल्या कुढण्याच्या अतिरेकानेच श्रीधरपंत टिळकांची आत्महत्या ही दुदैवी घटना घडली!Adv. Raj Jadhavhttps://www.blogger.com/profile/11488155990903362266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-328741429405106784.post-89781489444589591782015-09-10T02:35:59.454-07:002015-09-10T02:35:59.454-07:00लोकमान्यांचा गणपती ट्रस्टींच्या तुरुंगात.
सकाळी ए...लोकमान्यांचा गणपती ट्रस्टींच्या तुरुंगात.

सकाळी एकदोन वेळा वाड्यात येऊन बेलिफाने रामभाऊ नि बापू यांना नोटीस घेण्याबद्दल विनंती केली. दोघांनीही बाहेर बस, आत वाड्यात पाऊल टाकलेस तर याद राखून ठेव, असे धमकावून त्याला बाहेर घालवला. एकदा तर रामभाऊ त्याच्या अंगावर धावून गेले. सामोपचाराने बेलिफाला नोटीस लागू करता येणार नाही, असे दिसतातच, ट्रस्टींपैकी एकाने कोर्टाकडे धाव घेऊन खुद्द नाझरलाच वाड्यात आणले. त्यांनी टिळकबंधूंशी शक्य तितक्या सभ्यतेने आणि शांततेने चर्चा केली. हा प्रकार गणपतीच्या पिंजऱ्याजवळच चालला होता. रामभाऊंनी एक मोठा हातोडा सदऱ्याखाली लपवून आणला होता. नाझर साहेबांचा कायदेबाजीचा सगळा वेदान्त ऐकल्यावर रामभाऊ ठासून म्हणाला, अहो नाझर साहेब, आमच्या थोर वडिलांची सारी हयात तुमच्या सरकारने तुरुंगातच खतम केलीत ना? आता सहन होणार नाही, तुमची नोटीस ठेवा तुमच्या खिशात. आमचे काम हेच. असे म्हणून रामभाऊने ताडकन हातोड्याचा प्रहार करून पिंजऱ्याचे टाळे फोडले आणि सगळा पिंजरा उखडून दूर भिरकावून दिला. बिचारा नाझर काय करणार ? आला तसा निमूट परत गेला.

याच दिवशी संध्याकाळी पांडोबा राजभोज यांचा अस्पृश्यांचा श्रीकृष्ण मेळा गायकवाड वाड्यात जाणार होता. वरील प्रकार झाल्यानंतर मेळा बरोबर आणल्याशिवाय पुन्हा इकडे फिरकू नकोस. मी आहे येथे खबरदार, असे बजावून रामभाऊने श्रीधरपंतांना प्रबोधनकार ठाकऱ्यांकडे जाऊन बसण्यास सांगितले. वाड्यात काय चालले आहे याची माहिती श्रीधरपंतांनी प्रबोधनकारांना दिली. श्रीधरपंत सबंध दिवस ठाकऱ्यांकडे बसलेले होते.

संध्याकाळी दिवेलागणी होताच श्रीधरपंत पुणे कँपात भोकरवाडीला गेला. रात्री ८ वाजता मेळ्याला घेऊन ते प्रबोधन कचेरीवर आले. तेथे सडकेवरच मेळ्याच्या गायनाचा कार्यक्रम झाला. कचेरी असलेल्या सदाशिव पेठेसारख्या ब्राम्हणी अड्डयात अस्पृश्यांच्या मेळ्याचा कार्यक्रम एक चमत्कारिक आकर्षणाची बाब होती. आजूबाजूला बघ्यांची खूप गर्दी जमली होती. मेळा तेथून गायकवाड वाड्यात जाणार असा सगळीकडे बोभाटा झालाच होता.

इकडे गायकवाड वाड्याच्या दरवाजावर दोन गोऱ्या सार्जंटांच्या अधिपत्याखाली एक पोलिसपार्टी अडसरासारखी उभी होती. रामभाऊ वाड्याबाहेर दरवाजासमोर एकटाच शतपावली घालीत फिरत होता. आमच्याकडून एक सायकलस्वार ५-५ , १०-१० मिनिटांनी तिकडे फेऱ्या घालून रामभाऊंच्या सूचना आणीत होता. खुशाल या , असा रामभाऊचा सिग्नल मिळताच मेळा गाणी गात वाड्याकडे निघाला. रस्त्यात बघ्यांची गर्दी होतीच. छत्रपती मेळ्याची मंडळीही वाड्यासमोर चंग बांधून तयार होती.

मेळा गात गर्जत वाड्याजवळ येताच बापू(श्रीधपंत टिळक) आणि रामभाऊ आघाडीला उभे राहिले. दरवाजाजवळ येताच पोलीसपार्टीने दरवाजाला आपले कूस घातले. एका सार्जंटाने दोन्ही हात पसरून 'यू कॅनॉट एंटर द वाडा' असा दम भरला. रामभाऊने एक मुसंडी मारून त्याला बाजूला सारले आणि पोलिसांची फळी फोडून तो आत घुसताच बरीच मंडळीही घुसली. त्या प्रचंड जनप्रवाहाला पाहून पोलिस नि सार्जंट बाजूला झाले. मेळा गणपतीसमोर जाऊन थांबताच पद्य-गायनाला जोरात सुरूवात झाली. सुमारे अर्धा तास कार्यक्रम झाल्यावर, गुलाल प्रसाद वगैरे शिष्टाचार झाले आणि मेळा शांतपणे आला तसा बाहेर गेला. कार्यक्रम चालू असतानाही बिचारा कोर्टाचा बेलीफ दोन तीन वेळा नोटिशीचा कागद हालवीत बापूजवळ आला. त्याने त्याला हुसकावून बाजूला बसायला सांगितले गेले. मेळा निघून गेल्यावर तो पुन्हा बापूजवळ आला. वास्तविक ज्या कामाची मनाई करण्यात आली होती ते काम तर झालेच होते. बापूने नोटिशीचा कागद हातात घेतला आणि टरटर फाडून टाकला.

मेळा गेल्यावर बापू आणि इतर ५-६ मंडळी प्रबोधन कचेरीत आली. हा शुक्रवारचा दिवस होता. प्रबोधनकारांनी केलेल्या लोकहितवादी साप्ताहिकाचा अंक दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी बाहेर पडायचा होता. मेळ्याची सविस्तर माहिती देण्यासाठी शेवटचे ८ वे पान राखून ठेवण्याचे बापूने सांगितले होते. मंडळी छापखान्यात येताच बापूने झाल्या हकीकतीचा वृत्तान्त सांगितला आणि तो श्रीपतराव शिंद्यांच्या चिरंजीवाने (माधवरावने) लिहून काढला. कंपोझिटर्स तयार होतेच. मजकूर कंपोझ होऊन, 'गायकवाड वाड्यावर अस्पृश्यांच्या मेळ्याची स्वारी', या मथळ्याखाली लोकहितवादी साप्ताहिकात सबंध पानभर हकीकत छापून वक्तशीर बाहेर पडली.

१९२७ मध्ये महात्मा फुलेजयंतीचे शताब्दीवर्ष होते. त्यानिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी फार मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत होते. अशाप्रकारच्या कार्यक्रमांत श्रीधरपंतांचा सहभाग होता. मुंबईत गिरगाव व परळ या भागांमध्ये सभा झाल्या. त्यामध्ये श्रीधरपंतांची उपस्थिती लोकांचे लक्ष वेधून गेत होती. या भाषणात त्यांनी व्यक्त केलेल्या विचारांमुळे त्यांची जनमानसातील प्रतिमा अधिकच उजळून निघाली.Adv. Raj Jadhavhttps://www.blogger.com/profile/11488155990903362266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-328741429405106784.post-51098025518969940762015-09-10T02:35:07.777-07:002015-09-10T02:35:07.777-07:00श्रीधर बळवंत टिळक ( मार्च १, १८९६ - मे २५, १९२८) म...श्रीधर बळवंत टिळक ( मार्च १, १८९६ - मे २५, १९२८) मराठी लेखक, आणि सामाजिक कार्यकर्ते होते. ते लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांचे धाकटे पुत्र होते. श्रीधरपंतांचा जन्म १८९६ साली झाला असावा, असे अनुमान केले जाते. आतापर्यंत त्यांची जन्मतारीख निश्चित स्वरूपात कळलेली नाही. १९२८ साली त्यांनी मुंबई-पुणे एक्स्प्रेस-खाली आत्महत्या केली.

श्रीधरपंतांचा लोकमान्यांशी पहिला खटका त्यांच्या लग्नात उडाला. ब्राम्हणांच्या आग्रहावरून टिळकांनी प्रायश्चित्त म्हणून पंचगव्यप्राशनाची तयारी केली. श्रीधरपंतांनी त्याला विरोध केला. 'माझ्या लग्नासाठी जर प्रायश्चित्त घेणे, तर ते लग्नच न झालेले बरे.’ हा विरोध फार काळ चालला नाही. पण पुढे टिळकवाड्यात अस्पृश्यांसोबत सहभोजन घडवून त्याचेही प्रायश्चित्त त्यांनी घेतले.

टिळकवाड्यातले सहभोजन , समतासंघाची स्थापना तसेच गणेशोत्सवात बहुजनमेळाव्याचा कार्यक्रम घेणे ही पुण्यासाठी क्रांतीच होती. पण सामाजिक चळवळी करणाऱ्यांनी राजकीय चळवळींत अडथळे बनू नये, असा परखड सल्लाही ते सुधारणावाद्यांना देण्यास कचरत नसत. त्यांची भूमिका कायम सुधारणांसाठी आग्रही पण समन्वयवादी होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, केशवराव जेधे, जवळकर असे ब्राह्मणेतर चळवळीचे अनेक अध्वर्यू त्यांचे जवळचे मित्र होते.

समता संघाची स्थापना[संपादन]
१९२५ नंतर श्रीधरपंत आंबेडकरांकडे ओढले गेले. त्यांच्या अनेक कार्यक्रमात श्रीधरपंत हजर असल्याचे उल्लेख बहिष्कृतमध्ये आहेत. महाड चवदार तळ्याच्या सत्याग्रहातही श्रीधरपंतांची शुभेच्छांची तार सर्वांत आधी वाचून दाखवण्यात आली होती. लो. टिळक यांचे पुत्र रामचंद्र आणि श्रीधर हे दोघे बंधू मुंबईस आले तर साहेबांना ( आंबेडकरांना ) भेटल्याशिवाय पुण्यास जात नसत. साहेब पुण्यास गेले तर साहेबांना गायकवाडवाड्यातील आपल्या राहात्या घरी घेऊन जाण्याचे ते प्रयत्न करीत. माझ्यामुळे तुम्हाला त्रास होईल, असे त्यांना समजावून सांगून साहेब त्यांना परत पाठवीत.

१९२५ साली प्रबोधनकार ठाकऱ्यांच्या पुण्यातील वास्तव्यात श्रीधरपंत टिळकांनी त्यांची पहिल्याच दिवशी भेट घेतली. त्या भेटीत मागास बहुजनसमाज आणि प्रामुख्याने अस्पृश्य समाज यांच्या उत्कर्षाविषयी आपली कळकळ त्यांनी मनमोकळी व्यक्त केली होती.

श्रीधरपंत टिळकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चवदार तळ्यावर सत्याग्रहात सहभाग घेतला होता. ८ एप्रिल १९२८ रोजी समता संघाची पुण्याची शाखा त्यांनी स्वतःच्या गायकवाड वाड्यात सुरू केली. उद्घाटनाकरिता स्वतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर हजर होते.

समतासंघाच्या स्थापनेच्या वेळच्या त्या सहभोजनाच्या वेळी ग्रंथालयाच्या सभागृहात जेवणाच्या पंक्ती मांडल्या होत्या. दलित नेते पां. ना. राजभोज तेथे होते. श्रीधरपंतांनी टिळकवाड्यात समाजसमता संघाची स्थापना केल्यामुळे आणि सहभोजनाच्या कार्यक्रमामुळे पुराणमतवादी मंडळींना राग आला व त्यांनी अनेक तर्हेने श्रीधरपंतांना त्रास देण्यास सुरुवात केली. सहभोजनाच्या वेळी वीजपुरवठा खंडित करण्यात आला. खोट्या अफवा उठवल्या गेल्या, पण गोड्या तेलाचे दिवे पेटवून डॉ. आंबेडकरांसह सहभोजन आनंदाने पार पडले.

टिळकांच्या वाड्यात अस्पृश्यांचा मेळा[संपादन]
टिळक बंधू यंदा अस्पृश्यांचा मेळा गायकवाड वाड्यात घेऊन येणार अशी भुमका पुण्यात पसरली होती. आणि ती खरीही होती. एकीकडे दंगलबाज छत्रपती मेळ्याची दहशत आणि त्यातच टिळक बंधूंचा हा उपद्व्याप! ट्रस्टी मंडळी भेदरून गेली. ब्राम्हणेतर मंडळींच्या पाठिंब्याने रामभाऊ आणि बापू मनात आणतील ते करतील ही त्यांची खात्री असल्यामुळे, त्यांनी दोन मार्ग पत्करले. पहिला अस्पृश्य मेळा वाड्यात आणू नये असा मनाई हुकूम बजावून घेतला. पण टिळक बंधूंनी असे हुकूम बेधडक झुगारून फेटाळण्याचा आणि परिणामांना तोंड देण्याचा धीटपणा अनेक वेळा दाखविला होता. तो अनुभव लक्षात घेऊन ट्रस्टींनी दुसरी एक शक्कल काढली. फौजदारी प्रतिबंधाला ठोकरून त्या पोरांनी मेळा आत घुसवलाच, तर निदान गणपतीबाप्पाला अस्पृश्यांच्या स्पर्श तरी होऊ नये, एवढ्यासाठी वाड्यातल्या गणपतीच्या मखराभोवती लोखंडी पिंजरा उभारुन त्याला भलेभक्कम टाळे ठोकले. पण हे टाळेही फोडले तर? त्याचाही एक मनाई हुकूम ट्रस्टींनी मिळवून तो टिळक बंधूंवर बजावण्यासाठी बेलिफाला वाड्याच्या दरवाजावर आणून बसवला.Adv. Raj Jadhavhttps://www.blogger.com/profile/11488155990903362266noreply@blogger.comtag:blogger.com,1999:blog-328741429405106784.post-67536327071221640022015-09-10T02:33:18.180-07:002015-09-10T02:33:18.180-07:00https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E...https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%B0_%E0%A4%AC%E0%A4%B3%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4_%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%95Adv. Raj Jadhavhttps://www.blogger.com/profile/11488155990903362266noreply@blogger.com